गुलामीची १२ वर्षे..
नमस्कार !
बर्याच प्रयत्नांनंतर मी एक पुस्तक अॅमॅझॉन किंडलवर टाकले आहे. पुस्तकाचे नाव आहे... गुलामीची १२ वर्षे. मूळ लेखक आहे सालोमन नॉरथप आणि मी त्याचा अनुवाद केला आहे. पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे जरा समजून घ्यावे.
...हा इतिहास मोठा विचित्र आहे. त्यातील सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षा ही अद्भुत आहे. जरा विचार करा, तीस वर्षे या माणसाने स्वातंत्र्यात काढली. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते ज्यातून त्याला हाकलण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. दुर्दैवाने त्यानंतर १२ वर्षे तो गुलाम झाला, दुसर्याची मालमत्ता झाला.
मिसळपाव