Skip to main content

वाङ्मय

मराठी दिन २०१८: मुलखावेगळी ‘पैज’ (ॲन्टन चेकोव यांची अनुवादित कथा - प्रमाण मराठी)

लेखक शशिधर केळकर यांनी शुक्रवार, 02/03/2018 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
मुलखावेगळी ‘पैज’ मूळ कथा - ॲन्टन चेकोव (१८६०-१९०४) १ रात्र टळून चालली होती. तो म्हातारा बँकर आपल्या वाचनालयाच्या खोलीत या टोकापासून त्या टोकापर्यंत येरझारा घालत होता, पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका रात्री त्याने दिलेल्या पार्टीच्या आठवणी मनात जाग्या करीत होता. त्या पार्टीला आलेल्यांत विद्वान मंडळी कमी नव्हती. विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यातही विशेषतः ‘फाशीची शिक्षा असावी की नसावी’ याबाबत भरपूर चर्चा झाली. आलेल्या पाहुण्यांमधे कोणी उच्चविद्याविभूषित होते, काही पत्रकार होते, आणि बहुतेकांचा कल फाशीची शिक्षा नसावी याकडे होता.

मराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/03/2018 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
अहिराणी भाषेचा गोडवा लोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे.

मराठी दिन २०१८: टापा (मावळी)

लेखक भीडस्त यांनी गुरुवार, 01/03/2018 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
टापा सांगायचं म्हनश्यान तं गोश्टि जव्हा आम्हि सम्दि नयतर्नी व्हतो कनि ना त्या टायमाला तव्हाच्या ह्येत. रोज सवसान्चं भाकर खाउन्सनी आम्हि सम्दि गाबडी त्या बाळुनानाच्या बिरडिण्गीमो-हं जमुनसनी टापा झोडित बसायचो. तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या. मंग आम्हाला काय राच्च्याला टायिमच टायिम घावायचा. राच्च्या येकदोन वाजेपोहत टापा चालु र्ह्यायच्या. कुढं याचंच माप काढ , कुढं त्याचीच रेवडि उडव. म्या कॉन्हची जिरावली, मपलि कोन्ह्या जिरावली ह्येच सान्गायच आन आयकायचं काम. निर्हा धिंगुड्शा आसाय्चा.

मराठी दिन २०१८: समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... (उखाणे)

लेखक नूतन यांनी बुधवार, 28/02/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.

समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता....

कथा, कादंबऱ्या, काव्य, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, लघुनिबंध, नाटकं, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी विविध प्रकारांचा साजशृंगार चढवून आपली मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. पण बहुधा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीतच आढळणाऱ्या एका प्रथेत सादर होणारा साहित्य प्रकार म्हणजे - शुभप्रसंगी उखाण्यात नाव घेणं. साहित्य प्रकार म्हणून जरी याची विशेष गणना होत नसली, तरीही मराठी भाषेच्या साजशॄंगारातील हा एक छोटासा पण सुबक दागिना. उखाण्यात पतीचं नाव घेण्याची सुरुवात सहसा मुलीच्या लग्नापासून होते. (अर्थात नाव घेण्यात पुरुषांचाही समावेश असतोच).

मराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ? (झाडीबोली)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 28/02/2018 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
माले का मालूम भाऊ? 'कोनं बगरवलन बे माह्या सपनाईचा कचरा? डुंगा करूनस्यानी ठेवलो होतो जाराले सोपा जाते. कोनं बगरवलन बे?' माले का मालूम भाऊ! 'साला सपना त सपना सपन्याचा कचरा बी डबल मेहनत कराले लावते!' येवड्या जल्दीमदि कोटी चाल्लास गा? पिक्चर पावाले कोनाय हिरोहिरोईन? भाई अना कतरीना मानुसमाऱ्या वाघ हिंडून रायला ना बे? माले का मालूम भाऊ! टायगर त कसाबी जिंदा रायल, पर तू जिंदा रायसीन का? 'गारा पडतीन म्हून माहीत नोहोता माहित राहून बी का तोफ झाडला रायता मना' अगा बंड्या, गारा काहून पडते गा?' ​'​माले का मालूम भाऊ!​'​ अबे विकास!
काव्यरस

मराठी दिन २०१८ - आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 27/02/2018 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
'आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा.' आजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोन्ही सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते.

प्रिय मायमराठी

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 27/02/2018 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

पुस्तक परिचय - द मराठाज्

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 26/02/2018 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एक अतिशय वेगळ्या विषयावरील चांगले पुस्तक वाचले. डाॅ. स्टुअर्ट गाॅर्डन लिखित आणि र.कृ.

रावणायन कादंबरीचा थोडक्यात आढावा

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 22/02/2018 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रायणी सावकार यांचे रावणायन नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल. रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते. रावण मंदोदरी यांची प्रेमकथा आणि प्रेम विवाह कसा झाला हे सुध्दा यात आपल्याला कळते.