स्वैपाकघरातून पत्रे १
अन्नपूर्णा,
(तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.)
आज म्हटलं तुला लिहावंच. अगं, जी कामं मी एकटी करायची, ती करण्यासाठी तू हा केवढा महागाचा सुऱ्यांचा सेट घेऊन आलीस! छोटी, मध्यम, मोठी. एक हे कापायला, एक ते चिरायला, एक बारीक बारीक तुकडे करायला! कम्माल आहे बाई तुम्हा आत्ताच्या बायांची!
आमच्या जमान्यात अस्सं नव्हतं हो! एकदा का तुझ्या सासूने मला एका मांडीखाली घेतलं कि सगळं सगळं चिरून व्हायचं! खोबरं खोवून, मिरची बारीक चिरून, कांदा तर पाहिजे तसल्या आकारात, मऊ टोमाटो, वाळलेल्या खोबऱ्याचे अवघड तुकडे, झालंच तर गूळसुद्धा चिरून व्हायचा पुरणासाठी!
मिसळपाव
दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट बघत होतो. आमच्या डोंबिवली तल्या चन्दुमामाने मला एका लोकल लायब्ररीत नोकरी करतो का असं विचारलं. वाचायची आवड होतीच. म्हटलं भरपूर पुस्तकं वाचायला मिळतील. व्यवहारज्ञान आलेलं नव्हतं पण पैसे न मोजता हे करता येईल याचा कोण आनंद होता. महिना दीड महिना केली असेल नोकरी मी ती. पण ते असं पुस्तकांच्या संगतीत दिवसभर राहणं मला खूप आवडून गेलं होतं. ती लायब्ररी जणू माझं पहिलं प्रेमच होतं.
उद्या २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन. या निमित्ताने मराठी ईपुस्तक प्रकाशक शैलेश खडतरे यांच्याशी मी (कौशिक लेले) संवाद साधला.