Skip to main content

वाङ्मय

प्रिय नर्मदेस

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 24/09/2017 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

चल, घरी चल .....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 22/09/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो. पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस. आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.

प्रिय घरास

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 18/09/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते.

शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -१

लेखक माहितगार यांनी बुधवार, 06/09/2017 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
हि धागा मालिका शुद्धलेखनवादी ट्रोलांसाठी नाही. शुद्धलेखन समर्थक चर्चा या धाग्यात टाळून सहकार्य करावे, हि विनंती वाचूनही मनमोकळे करण्याची इच्छा झाल्यास शुद्द्धलेखनप्रियकर मिपाकरांच्या या धाग्यावर जावे. ज्यांना शुद्धलेखन नियमात विधायक सुधारणा व्हाव्यात असे वाटते त्यांनी बिरुटे सरांच्या या धाग्यावर आपली मते नोंदवावीत.

सेकंड लाईफ - भाग ७

लेखक अक्षरमित्र यांनी मंगळवार, 05/09/2017 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ सेकंड लाईफ - भाग ४ सेकंड लाईफ - भाग ५ सेकंड लाईफ - भाग ६ ------------------------------------------------------------------------------------------------- दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफीसला गेलो.

रुक्मिनि म्हणे

लेखक शरद यांनी मंगळवार, 29/08/2017 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
१९८८ मध्ये श्री. चंद्रकांत काळे यांनी शब्दवेध या संस्थेची स्थापना केली. शब्द व स्वर यांचे वेड असलेल्या माणसांनी एकत्र येऊन पहिला कार्यक्रम केला तो "अमृतगाथा " संतांनी भक्तीरचना रचल्या; त्यातील लोकसंगीताशी नाळ असलेल्या काही रचना एकत्र करून.सुरवात केली. पुढे त्यांनी कै. ग्रेस यांच्या कवितांवर सांजवेळ, प्रीतरंग, शेवंतीचे बन, आख्यान तुकोबाराय असे मराठी कवितांवरचे कार्यक्रम सादर केले. आंतरभारतीचा कार्यक्रम म्हणून गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे भाषांतर व "नाटक्याचे तारे " हा कै.

चॅलेंज - भाग ४

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 17/08/2017 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज भाग ४ “आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं. नेमकं त्याच वेळी कॅफेचं दार कोणीतरी उघडलं आणि वार्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकेने शौनकच्या डायरीचं पान उडालं, ते नेमकं दिगंतने पाहिलं. “अरे तू अजून लिहिलयंस, मग हे का नाही वाचलंस?” “जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं. “अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही.

गावात पहिली लुना

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/08/2017 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी चौथी पाचवीत असेल तेव्हाची गोष्ट. गावात ज्यांच्या जवळ सायकल, हाताला हँडो शँडो घड्याळ आणि घरात फिलिप्सचा रेडिओ तो माणूस श्रीमंत असल्याचे समजले जायचे. रेडिओचा शबनमसारखा लांबलचक पट्टा खांद्याला अडकवून गाणे ऐकत मळ्यात जाणारे लोक पहायला मिळायचे. मळ्यात बारे देताना विविध भारतीवरचे गाणे ऐकणारे सालदारही कुठे कुठे पहायला मिळायचे. अशाच दिवसात माझ्या वडील बहिणीचे लग्न ठरले आणि हुंड्यात कबूल केल्याप्रमाणे दाजींना फिलिप्सचा रेडीओ द्यायचा होता म्हणून आण्णांनी सटाण्याहून दोन मसाल्यांवर चालणारा नवा करकरीत रेडीओ आणला.

मनुस्मृति भाग (३)

लेखक शरद यांनी शनिवार, 12/08/2017 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति भाग ३ पहिल्या दोन भागात आपण १२ अध्यायातील काही श्लोकांचे भाषांतर पाहिले. त्यात एक भाग जाणीवपूर्वक गाळला होता; तो म्हणजे शूद्रासंबंधी मनूचे विचार. आज आपण त्या संबंधातील काही श्लोक पहाणार आहोत. मनूचे विचार वीसाव्या शतकात पटणारे नाहीत. पण मनुस्मृतीवर विश्वास ठेऊन, त्याप्रमाणे वागणारे अनेक लोक भारतात होते. दलितांना मिळणारी वागणुक अमानुष अशीच होती. म्हणून १९२७ साली डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी प्रथमच मनुस्मृति जाहीरपणे जाळली. या घटनेची तुलना मुसलमान आक्रमकांनी नालंदा विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळली त्याच्याशी केली गेली पण ’ज्याचे जळते, त्यालाच कळते" हेच सत्य.

अतींद्रिय अनुभव : Closure

लेखक सत्या सुर्वे यांनी मंगळवार, 08/08/2017 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतून एका वाचकाने आपल्या शब्दांत हि कथा पाठवली आहे. जशाच्या तशी इथे पेस्ट केली आहे.