Skip to main content

वाङ्मय

वॉल्डन...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 02/09/2018 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
- नुकतेच हेन्री डेव्हिड थोरोच्या वॉल्डन या पुस्तकाचा अनुवाद व त्याचे चरित्र लिहून संपवले... बरेच दिवस लिहित होतो. भाषा जुन्या वळणाची असल्यामुळे कळण्यास अवघड वाटली पण या अनुवादाच्या प्रवासात बरेच विचार मंथन घडले. काही गोष्टी पटल्या तर काही नाही. ज्या पटल्या नाहीत त्याचा आता हल्लीच्या युगात काही संदर्भ राहिला नसल्यामुळे. पण ज्या पटल्या त्या मात्र कायमच्या उपयोगी पडणार्‍या आहेत हे निश्चित... असो. त्यातील काही परिच्छेद येथे टाकत आहे.... मी झपाटल्यासारखे ही सगळी पाने लिहिली त्यामुळे प्रकाशक मिळेल का इ इ. विचारच केला नाही.. :-) बघूया आता... मिळाला तर बरे...

निघताना....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 23/08/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

‘स्त्री – पुरूष संबंधांची गीता’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/08/2018 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ हे पुस्तक वाचल्याने कोणाचाही तथाकथित वंशाभिमान समूळ डळमळल्याशिवाय राहणार नाही. या विषयावरची इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची टिपणे 1923 साली पुण्याच्या ‘चित्रमयजगत’ नियतकालिकात छापली गेली. टिपणांच्या आधाराने त्यांचे या विषयावरील विस्तृत निबंध ‘संशोधन’ मासिकात 1925 साली छापायला सुरूवात झाली. पुढे एका पुस्तकाच्या संदर्भान्वये कॉ. एस. ए. डांगे यांनी सुचवल्यामुळे हे पुस्तक 31 डिसेंबर 1976 ला डांगे यांच्या दीर्घ, विस्तृत, चिंतनशील आणि विवेचक प्रस्तावनेसह पुण्याच्या प्रागतिक पुस्तक प्रकाशनाने (नंतर लोकवाड्‍.मय गृहाने) प्रकाशित केले.

भारांच्या जगात... ४

लेखक अजिंक्य विश्वास यांनी सोमवार, 13/08/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
भारांच्या जगात... ४ उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी- भा. रा. भागवत उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.

भारांच्या जगात... ३

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 09/08/2018 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारांच्या जगात... ३ मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत मुक्काम शेंडेनक्षत्र ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा दुसरा रोमांचकारी भाग!.

भारांच्या जगात... २

लेखक अजिंक्य विश्वास यांनी बुधवार, 01/08/2018 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
भटांच्या वाड्यातील भुतावळ- भा. रा. भागवत भटांच्या वाड्यातील भुतावळ भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.

भारांच्या जगात... १

लेखक अजिंक्य विश्वास यांनी मंगळवार, 31/07/2018 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यावर स्वारी? - भा रा भागवत. . माझा प्रिय मित्र सागर ह्याने माझ्या डोक्यात काही वर्षांपूर्वी भागवतांच्या संक्षेपाचे मूळ रूप शोधायचे खूळ डोक्यात घातले, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार आणि उपकार कमीच आहेत!

शेती

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/07/2018 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बाजरी, गहू, हरभरा, ऊस, कामोड्या (कापूस), मका, दादर, कांदे आणि काही प्रमाणात भाजीपाला अशी आमची उत्तर महाराष्ट्र वासियांची पारंपरिक शेतातली पिकं होती. जळगाव भागात केळी, नाशिकच्या जवळपास (निफाड, पिंपळगाव बसवंत आदी भागात) द्राक्ष, अशीही त्यातल्यात्यात विभागणी असायची. आमच्या गावात शेताच्या कडेला उभं राहिलं की नजर जाईल तिकडे एकच एक पिक दिसे. खरिपात बाजरी आणि रब्बीत गहू. गावकर्‍यांनी केलेली सामुहीक शेती म्हणजे पाट थळ आणि ज्याची त्याची खाजगी शेती अशा पिकांनी बहरलेली दिसायची. या पिकांना सेंद्रिय खते (लेंडी खत, मेंढी खत, शेण खत, गाळ खत, पुंजं खत, सोन खत, राख आदी) दिली जायची.

वाहनं आणि प्रवास

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/07/2018 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे खेड्यापाडयातला पूर्वीचा प्रवास बैलगाड्यांतून होत असे. अगदी लग्नाचे वर्‍हाड सुध्दा या गावातून त्या गावी बैलगाडीने निघायचं. घर ते शेत आणि आजूबाजूच्या चार- पाच मैलांवर असलेल्या खेड्यापाड्यात कामेकाजे जाण्यासाठी पायी चालण्याचा तो काळ होता. याच काळात इकडे कुठे कुठे सायकलीही दिसू लागल्या. त्यावेळी अनेक कर्मचारी रोज वीस- पंचवीस मैलांचा प्रवास आपल्या सायकलींनी करत असत. 30 ते 40 वर्षांपूर्वी या प्रदेशातल्या ग्रामीण भागात क्वचित मोटरसायकली सुध्दा दिसू लागल्या होत्या. जावा आणि राजधूत कंपनीच्या या मोटारसायकलींना ग्रामीण भागात फटफट्या म्हटलं जायचं.

स्वैपाकघरातून पत्रे ३

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 30/06/2018 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!