Skip to main content

तंत्र

ताकुमा बॉयलर

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 13/09/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
ताकुमा बॉयलर ताकुमा बॉयलर ह्या जगप्रसिद्ध जापानी कंपनीचे मालक श्री ताकुमा ह्यांनी त्यांच्या जवळची सर्व पुंजी ताकुमा बॉयलर बनविण्यात घालवली पण तो बॉयलर काही केल्या चाचण्या पार पाडू शकत नसे. व त्यामुळे तो बॉयलर विक्रीसाठी उपलब्ध करुन देता येत नव्हता. अगदी कफल्लक झाल्यानंतर त्यांनी एक शेवटचा उपाय म्हणून कोरियात राहणाऱ्या एका मित्राकडे काही कर्ज मागायचे ठरवले व पुढील चाचण्या व संशोधन करता येईल असा विचार केला. झाले, ते एका बोटीवर चढले व कोरियाला निघाले. तरीही त्यांच्या मनात धाकधूक होतीच, मित्राने कर्ज नाही दिले तर काय, ह्या विचाराने रात्रभर झोप नाही आली.

वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 08/09/2009 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
वैशिष्ट्यपुर्ण तारीख : ०९/०९/०९ * हि तारीख ०९ सप्टेंबर २००९ ला, उद्या येते आहे. हा वर्षाचा २५२ वा दिवस आहे. २५२ च्या आकड्यांतली बेरीज ९ येते आणि ०९/०९/०९ ची बेरीज = ९+९+९=२७=९ ! * ०९/०९/०९ ही तारीख १००१ वर्षातली तसेच शेवटची एकेरी तारीख आहे. * हि तारीख सप्टेंबर च्या बुधवारी येते. ईंग्रजीत सप्टेंबर व बुधवार या स्पेलींगमध्ये (September व Wednesday) ९च अक्षरे आहेत. आधार : अर्थातच, आंतरजाळ

एका कॉम्पूटरची ईमेज दुसर्‍या कॉम्पूटरवर कशी घ्यावी

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/08/2009 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्रूपया एक मदत हवी आहे. मला एका कॉम्पूटर वर असलेल्या वापरात असलेल्या सॉफ्टवेअर ची प्रणालीसहीत (विंडोज व्हिस्टा) ईमेज दुसर्‍या कॉम्पूटरवर हवी आहे. पुर्वी घोस्ट ईमेज नावाचे सॉप्टवेअर होते तसले (GNU किंवा लायसन्स्ड) काही आजकाल उपलब्ध आहे का? ते कुठे मिळेल? व ते कसे वापरावे? काय काळजी घ्यावी जेणे करून डाटा लॉस होणार नाही. ज्या कॉम्पूटरवर ही कॉपी करायची आहे त्याची हार्डडिस्क नवीन कोरी आहे. दोन्ही कॉम्पूटर ऑनलाईन नाहीत. माहीती देणार्‍यांचे आधीच धन्यवाद.

सुधारणा कशा कराव्या?

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 02/08/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधी ज्यात सुधारणा करायची आहे त्या परिस्तितीतील परस्पर व अपरस्परसंबंध तपासावे लागतात. जसे, जगामध्ये कोट्यवधी माणसं व घटक आहेत आणि ह्यामुळे ह्या दोघांतील परस्पर संबंधसुद्धा अनंत असतील. ढोबळतेने ह्या संबंधांचे दोन विभाग करता येतील- परस्परसंबंधीत व असंबंधीत. परस्परसंबंधीत घट्कांमध्ये एखादा उद्देश असु शकतो व त्याचा तर्क लावता येऊ शकतो- उदा- १. कारण आणि परिणाम: आगीचे कारण सिगारेटचे थोटूक होते २. विरोध: आग आणि पाणी ३. साधर्म्य: लाकडी आणि लोखंडी फडताळ ४. घनिष्टता: टेबल आणि खूर्ची चटकन आठवण्यासाठी ह्याचा संबंध लावून बघा: (क्रम मुद्दाम बदलला आहे) १. भावंडं २. पति आणि पत्नी ३. मित्र ४.

चहाची पाने आणि वाफप्रक्रीया

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 01/08/2009 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
चहाच्या पानापासुन चहा पावडर करेपर्यंत ज्या अनेक क्रिया-रीतींतुन चहाचे पान जाते त्यावर एक ग्रंथ लिहीता येईल. ह्या रीतींमुळेच चहाचे अगणित प्रकार, चवी, वास, रंग, तयार झाले. ह्या सर्व उत्पादन पद्धती अर्थातच एकदम विकसित झाल्या नाहीत व अनेक डोकेबाज माणसांनी त्यात अनेक आवश्यक बदल घडवून आणले आहेत. अशीच एक छोटीशी गोष्ट. पुर्वी तोडून वाळवलेल्या चहाच्या पानांवर वाफेचा फवारा मारला जाई. वाफेतील उष्णते व आर्द्रतेमुळे, सुरुवातीची अतिशय कडक झालेली चहांची पाने मऊ होऊन त्यात ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरु होई. ह्यानंतर पुन्हा ऑक्सिडेशनची प्रक्रिया ठराविक काळानंतर थांबवण्यासाठी ती पाने वाळवली जाई.

वाघोबा :)

लेखक झकासराव यांनी बुधवार, 29/07/2009 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
हा आहे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयातील वाघ. एक पांढरा आणि एक पिवळा पट्टेरी. जरी तो बंद कुंपणा आड असला तरी त्याचा रुबाब कमी नाहि होत. काय म्हणता खालील फोटु बघुन. :) एखादा माणुस मंतर मारल्यासारखा गुंग होतो म्हणजे काय होतो ह्याचा अनुभव ह्या कुंपणा आडच्या वाघाने दिला बॉ. आता ओढ आहे ती असाच वाघ जंगलात बघायची ह्याचीच. पहिल्यांदा हा पाहिला पांढरा वाघ. एकदम रुबाबात बसला होता. त्याचे डोळे पाहिले का?? वेगळेच आहेत.

गुगल क्रोम - काय असेल ?

लेखक वाचक यांनी मंगळवार, 28/07/2009 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
'क्रोम' गुगलनी 'क्रोम' ची घोषणा केली आणि एकच हलचल माजवली. कुणाला वाटले की हा हल्ला मायक्रोसॉफ्ट वर आहे त्यांच्या OS चा वाटा कमी करण्यासाठी तर कुणाला वाटले आता अ‍ॅप्लिकेशन्स नंतरची गुगलची ही नवी खेळी आहे data वर कब्जा करण्याची. गुगलने इतकी कमी माहिती (म्हणजे जवळ जवळ नाहीच) उपलब्ध केलेली आहे 'क्रोम' बद्दल की शंकाकुशंकांना नुसते उधाण आले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लढवून काहीतरी विचार मांडतो आहे मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे असणार ? :) गुगलने सांगितले की ही प्रणाली 'नेटबुक' म्हणजे कमी शक्तीच्या पण अत्यंत हलक्या आणि प्रामुख्याने प्रवासात वापरल्या जाणार्‍या वैयक्तिक संगणकांसाठी आहे.

ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/07/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्केमर : या धाग्यावर, आपण ओळखीचे असा नसा, आपण अवांतर प्रतिसाद देवू शकतात. माझी काहीच हरकत नाही. मला ईंधन देई नळावर आलेले अनूभव देत आहे. त्यात कसे काय अवधान राखले पाहिजे ते कळेल व त्या द्वारे आपण आपले द्रव्य (ईंधन व मुल्य) कसे वाचेल हे समजेल. मी एकदा ईंधन देई नळावर दोन चाकी वाहनात ईंधन भरावयास गेलो होतो. पाऊस चालू होता म्हणून काही वाहनांची रांग पण नव्हती. ईंधन देई नळावर वरती छत असल्याने पाऊस लागत नव्हता. माझ्या आधीच्या गड्याने ईंधन विकत घेतले. (ए भाऊ, ३० चे पेट्रोल टाक रे). त्यानंतर माझा क्रमांक होता, म्हणून मी ईंधन टाकीचे झाकण उघडे ठेवून गाडी नळापुढे उभी केली.