Skip to main content

तंत्र

बाप आणि मुलगी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 13/04/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहायला मिळालेली एक सुरेख अ‍ॅनिमेशन फिल्म : बाप आणि मुलगी! ह्या लघुपटात तशी दोनच पात्रे आहेत, पण आजूबाजूचे माणसांचे संदर्भही प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष रीतीने येत राहतात. बाप आणि मुलीच्या अनोख्या नात्याचं, त्यांच्यातील भावस्पंदांचं इथे पहावयास मिळणारं चित्रण कालातीत, अप्रतिम!

Ubuntu मदत new problem update

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 10/04/2010 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
Ubuntu काल download व install केल पण mouse चालत नाही,हा frequent problem असल्याच कळल blogs,forums वाचुन.तेथे solution दीलेले पण सर्व command line बद्दल होती व ती नक्की कुठे लिहायची ते नाही कळल.मी computer वगैरेचा course केला नसल्याने HTML codes,command lines वगैरेच फार ज्ञान नाही. Ubuntu चांगल असल्याच एकलय पण ह्या mouseच्या अडचणीमुळे नाही वापरावस वाटत.हा problem अजुन linux कडुन fix करायच बाकी आहे अस वाटत.पण कोणी माहीतीगार माहीती असेल तर सांगेल का?

गुडबाय एट हंड्रेड..

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 07/04/2010 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
युरो ४ वा भारत ४ मानक पूर्ण करू शकत नसल्याने मारूती ८०० हे मॉडेल भारतातील प्रमूख शहरांतून बंद करण्यात आले आहे. लवकरच तिची निर्मितीही थांबवण्यात येईल असे मला वाटते. १९८४ पासून अतिशय लोकप्रिय असलेल्या ह्या गाडीचा प्रवास आता थांबत आहे. भारतातील चार-चाकी वाहनविश्वात क्रांतीचा अग्रदूत असलेली ही कार एकेकाळी अनेक लोकांची ड्रीम्-कार होती. त्याअगोदर सर्वसामान्यांना उपलब्ध असलेल्या गाड्या म्हणजे प्रिमियर पद्मिनी, अ‍ॅम्बॅसिडर, कॉन्टेसा व जीप.

माझी निघाली वार्‍यावरची वरात: पुढील मदत हवी आहे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/04/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला. खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का? माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.

या संज्ञेचा अर्थ काय?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 02/04/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
फोटॉग्राफित हायलाईट क्लिपींग अशी एक संज्ञा आहे. त्याचा अर्थ काय? कुणाला माहित असल्यास सांगावे ही विनंति.

दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 31/03/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले? आजचा दै. सामना ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली. saamana ya kaantipur? सामना या कान्तिपूर?? (वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै. सामनाच्या ई ईडिशनवर बघू शकतात.) वेळ सकाळची ९:०० वाजता. कान्तिपूर हे नेपाळ मधले वृत्तपत्र आहे. हे सामनाचे असे दिसणे म्हणजे दै.