Skip to main content

तंत्र

सॉक्रेटीस आणि त्याची प्रश्नातुन शिक्षणपद्धत

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 17/04/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
[खालील लेख भाषांतरीत आहे.] सॉक्रेटीस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही हटके होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco" चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्व पटते. आज त्याच्या प्रश्नावलीबाबत आपल्याला जी माहिती आहे ती त्याच्या शिष्योत्तमामुळे. प्लॅटो व ऍरीस्टॉटल हे त्याचे शिष्य होते.

शेतीविषयक सल्ला :- कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/04/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी बंधूंनो पाषाणभेद चा नमस्कार. आज आपण 'आपली माणसं व त्यांची माती ' या कार्यक्रमात "कपाशीवरील बोंड अळी -लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय" याविषयावर तांबडवाडीचे प्रगतीशील शेतकरी श्री. भाऊराव गव्हाणे यांचे विचार एकणार आहोत. पाषाणभेद: नमस्कार भाऊराव. भाऊराव: रामराम. पाषाणभेद: भाऊराव, आपण उस ह्या पिकाबरोबरच कपाशी हे मुख्य नगदी पिक घेतात. आपल्या भागात कपाशीवरील रोगांमध्ये 'कपाशीवरील बोंड अळी' ह्या रोगाची समस्या फार मोठ्या प्रमाणात उद्धभवते. याविषयी आपण काय सांगाल? भाऊराव: कपाशीवर पाने खाणारी अळी, मर रोग, मावा, तुडतूडे, खोड पोखरणारे भुंगे तसेच बोंड अळी या रोगांचा प्रार्दुभाव होतो.

चला लेखक होउया !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 11/04/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :- आमचे कार्यालय वेळ :- कुठलीका असेना ? कोणाला काम करायची आहेत ? पात्र :- खुद्द आम्ही आणी आमचा एक नविनच आमच्या आग्रहा खातर मिपा जॉइन केलेला सहकारी. मित्र :- काय रे मिपा मिपा चालु आहे का ? आम्ही :- हाना राव ! दुसरे धंदे काय आपल्याला ? त्यात आज एक लेख टाकलाय, प्रतिक्रीया वाढतायत का नाही त्यावर पण सारखे लक्ष ठेवुन आहे. मित्र :- यार मला पण तुम्हा सगळ्यांचे बघुन काहितरी 'लै भारी' लिहावे असे वाटायला लागले आहे. प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे :( आता लिहिते व्हायला पाहिजे. मागच्या वेळी किती मेहनतीने एक विषय 'मटा' मधुन उचलला होता.

मि.पा. ला जालिंदर जलालाबादींच्या विरोधकांचा विळखा...

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 09/04/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस मी मि.पा. चे संकेतस्थळ पाहतोय. नवीन सदस्य या स्तंभात सतत तेचतेच पाच नविन सदस्यांचीच नावे दिसत आहेत. (GAURIBHADE, असुगो, अल्पना, सचिन घुले, मंजुश्री अशोक बनकर) त्यामुळे मि.पा. च्या कार्यप्रणाली मध्ये काहीतरी बदल झालेला दिसतोय. नाहितर आठ दिवसात एकही नविन सदस्य नोंदणी करु शकत नाही असे होउ शकत नाही.

ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 05/04/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका ’मिटींग देवी’, तुमची कहाणी कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनु. दिनु मोठा कष्टाळु. शिक्षण झाले, दिनु नोकरीला लागला. दिनु होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनु. नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनु ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो!

महाजालावर कोल्हापुर

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 28/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझे मित्र राजे हे आमच्या गावाबद्दल अर्थात कोल्हापुरबद्दल खुप लिहित आहेत त्यामुळे अनेकाना कोल्हापुरबद्दल उत्सुकता असेल ती उत्सुकता ऑनलाइन भागवण्यासाठी हा लेख सध्याचे युग हे संगणक युग आहे यापुढे सर्व व्यवहार संगणकावर होणार आहेत त्यामुळे सध्या महाजालावर कोल्हापुरची स्थिती काय आहे याचा यानिमित्याने आढावा घेणे आगत्याचे ठरते आणि म्हणुनच एक नेटीझन म्हणुन घेतलेला हा आढावा तर प्रथम आपण गुगल कडे वळु गुगलवर एखाद्या गावाला योग्य स्थान असणे म्हणजे त्याबद्दलची योग्य माहिती उपलब्द्ध असणे महत्त्वाचे आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरची दखल गुगल कडे आहे गुगल मॅप द्वारे(

नाही!

लेखक अजय भागवत यांनी गुरुवार, 26/03/2009 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
[कधीतरी मंदीबाबतच्या आकडेवाऱ्या, शिक्षण, बाल-मानसशास्त्र असे विषय/प्रतिसाद लिहुन मिपाकरांना बोअर केल्यानंतर जरा वेगळे काही जमते का हे पाहण्यासाठीधी जरा ५ फुटात उडी मारुन पोहायला जमते आहे का ते पाहतोय. वाचकांना हा प्रयत्न आवडला नाही तर समाचार घ्या.] मन्या, तुझे काय चाललेय, बरेच कानावर येतेय सध्या...वैतागुन पाहू नकोस, आज तुला विचारायचेच असे वाटले. मी नाक खूपसत आहे असे वाटले तर सोडून देतो विषय. काय ऐकले आहे रे? हेच ना की, तिच्याबरोबर रोज वाद होतायेत असेच आणि बरेच! म्हणुनच तुला एकदा विचारुन घ्यावे असे वाटले. माझी काही मदत व्हावी असे वाटत असल्यास सांग प्रॉब्लेम काय आहे तो.