Skip to main content

तंत्र

नाहीच जमत बुवा काही गोष्टी!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 20/03/2009 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी खरं तर (यावरून काही अंदाज बांधता येतोय का?) विद्युत अभियांत्रिकीमध्ये एका बर्‍यापैकी नावाजलेल्या शासकीय महाविद्यालयातून (पुण्याचे नव्हे!) पदवी प्राप्त केलेला अभियंता आहे. पदवी मिळवून आता नऊ वर्षे होत आलीत. त्यानंतर त्याकाळच्या शिरस्त्याप्रमाणे इकडे-तिकडे फुटकळ उमेदवारी करून मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एका अत्यंत निरुपद्रवी आणि जिथे तांत्रिक गोष्टींचा अगदी कमी संबंध येतो अशा परंतु डोक्याचा भुगा करणार्‍या कार्यक्षेत्रात घुसलो. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम सुरू करून मला पाच वर्षे झालीत. तसं माझं संगणकाच्या किंवा संगणकप्रणाली विकसित करण्याच्या तांत्रिक अंगांचं ज्ञान अगदीच नगण्य आहे.

दररोजच्या भाजीच्या कटकटीपासून मुक्ती

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 17/03/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील ग्रूहीणी होणे म्हणजे फार कठीण आहे. त्यातल्या त्यात नोकरी करणारी स्री म्हणजे तारेवरची कसरतच. दररोज घर आवरणे, लहान मुलांचे करणे, घरातल्यांची मर्जी सांभाळणे ह्या फार अवघड गोष्टी आहेत. त्यात भर म्हणजे दररोज जेवणात / डब्यात काय भाजी करावी ही कटकट. या भाजीच्या काळजीवर मी माझ्या परीने (वतीने) मी खालील उपाय सांगत आहे. एक पदार्थांची यादी बनवायची. (मेनु कार्ड नव्हे.) त्यात सगळ्या भाज्या / न्याहारीचे पदार्थ / बनवण्याच्या पध्दतीनुसार वर्गीकरण (नुसत्या भाताचे १५० च्या वर प्रकार आहेत.) यानुसार एक यादी बनवायची.

जाधव सर

लेखक प्रमेय यांनी शनिवार, 07/03/2009 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
पल्या आयुष्यात अनेक मार्गदर्शक/शिक्षक असतात. पण थोडेच जण असे काही भक्कम असतात की कितीही झाले तरी दीपस्तंभाप्रमाने सतत ध्येयाची/मार्गाची आठवण करून देतात. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासातील एक महत्वाची व्यक्ती, ज्यामुळे माझ्या सरळ धोपट अभ्यासाला चांगला मार्ग मिळाला, ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे 'जाधव सर’. माझ्या मोठ्या भावाची ७वी. या वयातल्या मुलांसाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे ' ७वी स्कॉलरशिप'. पप्पांनी आधीच 'जाधव सरांची' भेट घेउन अमेयाचा प्रवेश पक्का केलेला. क्लासचा पहिला दिवस अणि अमेयाला सर खूप आवडून गेले.

'वीज बचत' आणि 'सुरक्षा'

लेखक लक्ष्मणसुत यांनी बुधवार, 25/02/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
'वीज बचत' आणि 'सुरक्षा'- आज अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. भारनियमनावरचे विडंबन वाचले आणि लिहावेसे वाटले. आपल्या घरात, कार्यालयात आणि इतर ठिकाणी विजेचा वापर करताना योग्य प्रकारे काळजी घेतली तर आपणांस वीज कंपनीवर ताशेरे ओढायची वेळ येणार नाही. साधारणपणे शंभर चौरस फुटांच्या खोलीत १४ ते १८ वॅट क्षमतेचा दिवा (सी.एफ.एल.) पुरतो. तर संडास/ बाथरूम मध्ये ५ वॅटचा सी.एफ.एल भरपूर प्रकाश देतो. 'शीतकपाटांची' (फ्रीज) तापमानकळ नेहमी लघुत्तमवर ठेवली तरी चालते. तसेच सर्वजण हॉलमध्ये आणि बेडरूम वकिचनचे दिवे पंखे चालू अशी परिस्थिती असते. या सर्व बाबींचा विचार करायलाच पाहिजे.

यशाचे सूत्र : वॉच गॉड

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 22/02/2009 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
यशाचे सूत्र : वॉच गॉड दचकलात शिर्षक वाचून ...? थांबा सांगतो !! जीवनातील यशाचे सूत्र खालील गोष्टींत आहे- वॉच गॉड म्हणजे WATCH GOD. W -विलपॉवर - इच्छाशक्ती A -ऍटीट्यूड (पॉझिटीव्ह) - सकारात्मक दृष्टीकोन T -टाईम मॅनेजमेंट - वेळेचे योग्य व्यवस्थापन C - कॉन्संट्रेशन - एकाग्रता H - ओनेस्टी - प्रामाणिकपणा , ह्युमऍनिटी - माणुसकी G - गुडनेस - चांगुलपणा , गोल्स सेटीग - ध्येय निश्चिती O - ऑप्टीमिझम - आशावादी वृत्ती , ऑब्लिगेशन - जबाबदारीचे भान D - डेटरमिनेशन - निर्धार , डेरिंग - हिम्मत काय वाटते आपल्याला? पटतंय का?

"कुठे काय" विषयी थोडेसे...

लेखक वाचक यांनी बुधवार, 11/02/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार (ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.) मी मराठीतली काही प्रमुख संकेतस्थळे नेहेमी वाचतो. अर्थात प्रत्येक वेळी सर्वच मजकूर वाचायला जमतो असे नाही. पण गेल्या काही महिन्यांमधे मी वैयक्तिकरीत्या जास्त कार्यमग्न झालो आणि त्याचप्रमाणे संकेतस्थळांवर होणार्‍या लिखाणाची वारंवारिताही वाढलेली दिसली. बराच चांगला मजकूर वाचायचा राहून जाउ लागला आणि प्रत्येक वेळी सगळीच्या सगळी स्थळे बघणे अवघड होउन बसले.

मला आवडलेल्या माहितिपुर्ण डॉट कॉमच्या साइट

लेखक A1April यांनी मंगळवार, 27/01/2009 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेल्या माहितिपुर्ण डॉट कॉमच्या साइट Books http://www.scribd.com/ http://www.esnips.com IP Checker http://whatismyipaddress.com how to http://www.howstuffworks.com www.ask.com ms office http://www.cctglobal.com/download_samples/download_windows_samples.htm

विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 12/01/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच सकाळी पेपरात वाचले की गुगल मुळे कर्बवायुच्या उत्सर्जनात भर पडते आणि एकदम अश्चर्य वाटले. ती बातमी बीबीसीच्या स्थळावर वाचता येईल. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीनुसार आपण एकदा गुगलवापरुन शोध घेतला की ७ग्रॅ कर्बवायूची भर वातावरणात पडते. गुगलच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार सांगीतला गेलेला हा आकडा फार मोठा असून तो वास्तवात केवळ ०.२ग्रॅम इतकाच आहे. बातमीमध्ये, अमेरिकन संशोधकांच्या मते सध्या आयटीचा जागतिक कर्बवायू उत्पादनात २ टक्क्याचा वाटा आहे. तो आकडा वास्तविक काहिही असो.

भेट

लेखक प्रविनमौति यांनी गुरुवार, 08/01/2009 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक ती भेटली, नेहमी सारर्खीच हसली, डोळ्यातूनच सारे काही बोलली, जाताना मात्र दुसर्याचे नाव लावणर्या , तिच्या डोळ्यातले माझेच पाणी लपवत गेली.