गुटेनबर्ग

लेखनविषय:
लेखनप्रकार
. पुस्तकं वाचायला सर्वांनाच आवडतात पण आपल्याला ही पुस्तके कोणामुळे वाचता येणे शक्य झाले आहे हे मात्र बर्याच जणांना माहित नसते. त्याच कलंदर अवलियाची ही ओळख! १५व्या शतकाचा सुरुवातीचा काळ! र्‍हाइन आणि माइन नद्यांच्या संगमावर वसलेलं छोटंसं टुमदार गाव, 'माइन्झ'! फ्रिडरिश ( फ्रिलं) ग्लेन्सफ्लाइश आणि एल्स वायरीश हे सोनारकाम करणारे दांपत्य तिथं सुखानं नांदत होते. त्यांना तीन मुले फ्रिलं (ज्यु), एल्स (ज्यु) आणि सगळ्यात धाकटा योहानेस (योहान)!

विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?

लेखनप्रकार
आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?) इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले. तरी विद्वान म्हणवून घेण्यासाठी काय करावे ?

ई बे वरिल ऑनलाईन खरेदी

लेखनविषय:
लेखनप्रकार
ई बे वर नुकताच मी एक मोबाइल फोन खरेदी केला. फोन ची कंडीशन व पर्फोर्मन्स हे दोन्ही पण योग्य वाटत आहे. हा फोन इम्पोर्टेड असल्यामुळे तो बराच स्वस्त मिळाला. (२६००० रुपये ओरिजनल किंमत असलेला फोन १२००० ला मिळाला ) फोन चेक केला असता तो unsealed होता. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले कि हे फोन इम्पोर्टेड असल्यामुळे त्यांचे कस्टम कडून चेकिंग होते. तसेच या फोन मधले अक्सेसरीज देखील थोडी वेगळी आहेत. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले कि हे सर्व अक्सेसरीज भारतासाठी नसून ते इतर देशांसाठी केले जातात त्यामुळे ती वेगळी आहेत. हे सर्व त्याने त्याच्या जाहिरातीमध्येही नमूद केले होते.

प्रिंटरवर छापलेल्या विमानातून प्रवास करायला तयार व्हा !

लेखनविषय:
लेखनप्रकार
डोळे चोळू नका. तुमचे डोळे ठीक आहेत... आणि इथे टंकनचूकही झालेली नाही ! तंत्रज्ञांनी विमानाचे इंजिन "छापण्याचे" तंत्र विकसित केले आहे आणि जवळच्या भविष्यात तुम्ही त्या तंत्राने बनवलेले इंजिन आणि इतर भाग वापरून बनवलेल्या विमानातून प्रवास करू शकाल ! .

त्रिमिती छपाई (3D printing) अथवा संयोगी वस्तुनिर्माण (Additive Manufacturing, AM)

तसे बघितले तर 3D छपाई ही काही नवीनं गोष्ट नाही. हे तंत्र १९८० मध्ये नागोया मुनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (जपान) मधील हिदेओ कोदामा या तंत्रज्ञाने विकसित केले.

देवस्थाने आणि भटजी....

लेखनप्रकार
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.

आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२

लेखनविषय:
आर्ट ऑफ द स्टेट भाग -०१ http://misalpav.com/node/29885 ' हेम्या, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर' भाग -०२ 'माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा, शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या. मेव्हणा खिडकीत उभा राहुन टॅबकडं पाहात होता वेड्यासारखा.

आर्ट ऑफ द स्टेट

लेखनविषय:
लेखनप्रकार
नेहमी सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती. मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो. एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं आमच्या आयुष्

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

लेखनविषय:
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही.

  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २

लेखनविषय:
लेखनप्रकार
  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २ पहीला भाग इथे पाहता येईल h एक चुकलेली बस, ते पकडलेली पहिली बस. बस आत्ताशी सुरु होत होती, अजून पुढे बराच प्रवास बाकी होता. रेडबसचे बिझनेस मॉडेल अगदी नवीन नव्हते. ऑनलाइन तिकीट एजंट सिस्टीम जगभर सर्वत्र विमानांच्या तिकीटांसाठी वापरली जाते. बहुतांश इंटरनेट सुशिक्षित वर्गाला या कार्यपद्धतीची कल्पना असते.
Subscribe to तंत्र