श्रद्धांजली - डॉ. वसंत गोवारीकर
लेखनप्रकार
(छायाचित्र दुवा - इसकाळ)
आत्ताच वाचनात आले की डॉ. वसंत गोवारीकर यांचे वृद्धापकाळातील आजारपणामुळे निधन झाले.
कधीकाळी भारतात पाऊस किती आणि कसा पडेल यावरून कसेही अंदाज वर्तवले जात असताना, भारतीय वातावरणाशी निगडीत असलेल्या विविध गोष्टींचा विचार करून डॉ. गोवारीकरांनी तयार केलेले मॉडेल हे उपयुक्त ठरले. ते "गोवारीकर मॉडेल" म्हणून प्रसिद्ध झाले.
इस्रोच्या "Solid Propellant Technology" चे जनक असे त्यांना संबोधिले जाते. ज्या काही मान्यवर मराठी शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय आणि जागतिक किर्ती मिळाल्यावर देखील मराठी आणि मराठीशी असलेली नाळ तोडली नाही त्यातील गोवारीकर हे एक श्रेष्ठ नाव आहे. मराठी विज्ञान परीषदेचे अध्यक्षपद त्यांनी १९९४ ते २००० पर्यंत सांभाळले. १९९१-९३ ते पंतप्रधानांचे सल्लागार होते, तसेच ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगूरूपद देखील होते.
त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाले होते.
गोवारीकरांच्या स्मृतीस अभिवादन आणि श्रद्धांजली...
वाचने
3773
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
अरेरे ! वाईट बातमी..
भावपूर्ण श्रद्धांजली.
__/\__
विनम्र श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
भावपूर्ण आदरांजलि
शन्ति लाभो......
शन्ति लाभो......
भावपूर्ण आदरांजलि __/\__
_/\_
भावपूर्ण आदरांजलि
भावपूर्ण आदरांजली _/\_
श्रद्धांजली
भावपूर्ण आदरांजलि __/\__
डॉ गोवारीकर यांना विनम्र