आर्ट ऑफ द स्टेट भाग -०१ http://misalpav.com/node/29885
' हेम्या, आय अॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर'
भाग -०२
'माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा, शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या. मेव्हणा खिडकीत उभा राहुन टॅबकडं पाहात होता वेड्यासारखा.