भाषा आणि संस्कृती: एक अवलोकन
'सध्ध्याचा काळ मोठा कठीण आहे' हे वाक्य तुमचा सततच पाठलाग करायला लागले कि समजावे तुमची तारुण्याची गाडी उताराला लागली आहे. सहसा जगण्याची उस्तवार करताना जो संघर्ष करावा लागतो त्याचा आणि या वाक्याचा फारसा संबंध नसतो. पण जेंव्हा तुमच्या डीएनएचाच भाग बनून राहिलेल्या तुमच्या समजुतींना आता काही किंमत नाही हे कळायला लागते तेंव्हा एक वेळ अशी येते कि अगदी क्षुल्लक करणानेदेखील तुमच्या निग्रहाचा बांध फुटतो आणि ते सुरवातीचे वाक्य आपोआप तुमच्या ओठावर येते.
सुरवातीपासून सुरुवात करायची म्हटले कि प्राथमिक शाळेत विरुध्ध अर्थाचे शब्दांच्या जोड्या जेंव्हा शिकलो ते दिवस आठवतात.
मिसळपाव