गाणी : खणखणीत नाणी
काही गाणी हृदयाचा ठाव घेतात. काही सतत गुणगुणावीशी वाटतात. काही नकळत पाठ होतात. काहींचा ठेका आपल्याला भारून टाकतो. काय असतं त्यामागचं गौडबंगाल? का करतात ही गाणी मनावर गारूड?
पूर्वी नव्या सिनेमांतली गाणी सिनेमा आल्यानंतरच ऐकायला मिळायची. किंवा आकाशवाणीवरून. नंतर "छायागीत' वगैरे प्रकार सुरू झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी "झी'वर "टॉप टेन' आलं. नवीन गाणी ऐकण्यासाठी मी अक्षरशः अशा कार्यक्रमांवर झडप घालायचो. "छायागीत'मध्ये आता कुठलं गाणं लागणार, याची कोण उत्सुकता असायची! "मटा'वगैरे मधल्या जाहिरातींतून "आज या चित्रपटातील गाणे "छायागीत'मध्ये पाहा' असा उल्लेख असायचा.
मिसळपाव
आज ३१ जुलै! माझ्या अत्य॑त लाडक्या गायकाचा, रफीसाहेबा॑चा स्मृतिदिन! त्या॑च्या पवित्र स्मृती॑ना माझे लाख लाख प्रणाम..
अल्पचरित्र -
२४ डिसेम्बर १९२४ रोजी, अमृतसर जवळच्या कोटला सुलतानपूर ह्या छोट्याश्या गावात हाजी अली मह॑मद या॑ना सहावे पुत्ररत्न झाले. त्यावेळेस कोणीच ही कल्पना करू शकले नसेल की हेच मूल अखिल विश्वात महान गायक म्हणून नाव गाजविणार आहे.. मह॑मद रफी!!
लहानपणापासूनच रफीसाहेबा॑ना गाण्याची आवड होती. त्या॑चा गोड गळा त्या॑च्या मेव्हण्याने, मह॑मद हमीदने हेरला व त्या॑ना स॑गीत-शिक्षेसाठी प्रोत्साहन दिले.