Skip to main content

शास्त्रीय संगीत

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 13/12/2008 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मि पा वर काही शास्त्रीय संगीताचे धागे मिळाले. आपल्या पैकी कोणाकडे हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, यांच्या व्यक्तिशः किंवा जुगलबंदी च्या ध्वनिमुद्रणाचे धागे मिळू शकतील का?

दिलखुलास

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 19/11/2008 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज झी मराठी च्या लिट्ल चॅम्प्स चा कार्यक्रम पाहिला आणि शंकर महादेवनला मानला! शंकर महादेवन आजचा पाहुणा परिक्षक होता आणि शंकर महादेवनने आपल्या दिलखुलासपणाने सर्वांना जिंकुन घेतले. एका प्रथितयश कलाकाराने उमलत्या कलाकारांना ज्या उस्फुर्तपणे, ज्या उत्साहाने आणि ज्या पद्धतिने दाद दिली त्याला तोड नाही. परिक्षक हे बहुधा स्पर्धकांचे कौतुकच करतात, काही सल्ल्ला वा सुचना देतात आणि प्रोत्साहनही देतात, कधी सौम्यपणे त्रुटी नजरेस आणुन देतात. मात्र 'मी' पण विसरुन सर्व बालस्पर्धकांचे कौतुक शंकर महादेवनने केले त्याला दाद दिलीच पाहिजे. अगदी पहिली फेरी हिंदी गाण्यांची होती.

प्रभात राग रंगती...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या पहाटे 'ललत' षड्ज मध्यमी मूर्च्छना चालली 'भटियारा'ची प्रभातरंगी अर्चना डमडम डमरूची आली 'भैरवा'ची स्वारी तीव्र मध्यम वाढवी 'रामकली'ची खुमारी कारुण्यमय 'तोडी'ची 'आसावरी'शी संगती 'अहिरभैरवा' संगे प्रभात राग रंगती..! -- तात्या अभ्यंकर.
Taxonomy upgrade extras

आनंद मना!

लेखक मनोजवम् यांनी मंगळवार, 11/11/2008 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो तसा मी या संकेतस्थळावर नवीनच! म्हणजे येउन बरेच आठवडे झाले...पण नुसतंच वाचन झालं...ते ही कधी कधी...सबबी भरपूर आहेत. पण त्यात वेळ न घालवता मुद्याचं सांगतो. आज ब-याच दिवसांनी पंडित कुमार गंधर्वांचे मनाला अल्लद भिडणारे आणि सुरांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घ्यायला लावणारं अत्यंत तरल असं गाणं ऐकलं आणि जमेल तेवढयांना सांगावसं वाटलं. म्हणून हा खटाटोप. गाण्याचे बोलः "आज आनंद मना, मोरा जो पिया घर आया" मालकंसातली ही रचना. इथे गाण्याची फाइल जोडण्याची व्यवस्था असती तर जरुर पाठवली असती.

बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम

लेखक शिंगाड्या यांनी गुरुवार, 06/11/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा शास्त्रिय, नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम.. (राहूल देशपांडे हे वसंतराव देशपांडेंचे नातू होत..) स्थळ :रवीन्द्र कलाक्षेत्रा तारीखः ३० नोव्हेंबर सकाळी १० ते १.३० तिकिट दरः ३००,२००,१५०,१००,७५ तिकिट संपर्क:shripad.k.ghate@intel.com (मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)

सजणा...दूर व्हा ना....दूर व्हा ना.... जाऊ द्या... सोडा... जाऊ द्या

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 04/11/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच झी मराठी चॅनलवरील "सारेगमप लिटिल चॅम्प्स" हा लहान शाळकरी मुलांच्या संगीत स्पर्घेचा कार्यक्रम पाहिला. त्यात कुमारी आर्या आंबेकर या चिमुरड्या शाळकरी मुलीने ग. दि. माडगूळकरांची सजणा‌‌‍ऽऽऽऽ दूर व्हा ना‌‍ऽऽऽऽ दूर व्हा नाऽऽऽ जाऊ द्याऽऽऽ सोडा‌ऽऽऽ, जाऊ द्याऽऽऽऽऽ ही लावणी सादर केली आणि तिच्या गाण्याने तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकच नव्हे तर परीक्षकसुद्धा तिचे गाणे ऐकून "हैराण" झाले. तिचा आवाज, नज़ाकत, सादरीकरण सारे काही केवळ अप्रतिम होते. तिने या लावणीने तमाम मराठी रसिकांच्या "कानाचे पारणे" फेडले.

पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न, मिपावर अजून एकदा दिवाळी साजरी होणार... श्री. तात्या अभ्यंकर

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 04/11/2008 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव सुरू झाले बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज आणि भारतिय अभिजात संगीताच्या क्षेत्रातले महापुरूष आदरणिय पं. भीमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने. आत्ताच टीव्हीवर आलेल्या बातमीनुसार, पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न हा भारत सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाला आहे. मिसळपावचे मालक श्री. तात्या अभ्यंकर यांच्याशी आत्ताच झालेल्या बोलण्याप्रमाणे, मिपावर परत एकदा दिवाळी साजरी करण्यात येईल. व्यक्तिशः माझ्या तर्फे पंडितजींना शतशः नमन. आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते.