Skip to main content

डॉ.विद्याधर ओक

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 03/07/2008 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.विद्याधर ओक हे नांव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुपरिचित आहे. स्व.गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहेच, शिवाय प्राचीन शास्त्रीय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यासू वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुध्दीचा संशोधक, या क्षेत्रात नव्या दिशा चोखाळणारा आणि दाखवणारा द्रष्टा, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करणारा उद्योजक अशी अनेक प्रकाराने त्यांची ओळख करून द्यावी लागेल.

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 22/06/2008 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात... आजची संध्याकाळ बेळगावकरांच्या आयुष्यातील एक अनोखी, अविस्मरणीय संध्याकाळ ठरली आहे. रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा यांनी आज बेळगावमध्ये एक कार्यक्रम सादर केला. बेळगावात सध्या वास्तव्यास असलेले जुन्या चित्रपट गीतांचे रसिक संग्राहक विजय नाफडे यांनी हा योग जुळवून आणला. त्यांनी निवडलेली तीस जुनी गाणी पद्मिनी परेरा यांच्या अप्रतिम निवेदनासह रसिकांनी छोट्या पडद्यावर पाहिली.

कृपया ह्या गाण्या बद्दल माहिती द्या..

लेखक संजय अभ्यंकर यांनी शुक्रवार, 20/06/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो! कृपया दुव्यातील ह्या नितांत सुंदर गाण्याचे संगीतकार कोण व चित्रपट कोणता? http://www.dishant.com/sharemailsong.php?songid=52381

पं यशवंतबुवा महाले, एक आभाळाइतका मोठा माणूस!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 10/06/2008 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे तू येणार होतास ना? कधी येणार आहेस? अरे किती रे वाट पाहयची तुझी! एकदा घरी येऊन माझ्या तंबोर्‍यांच्या जवारीचं काम तेवढं कर की रे जरा!" "हो महालेसाहेब. आता एकदा नक्की येतो, जमवतो!" महालेसाहेबांच्यात आणि माझ्यात फोनवर असा संवाद अनेकदा झाला आहे. त्यांचा फोन आला की मलाच अपराधी वाटतं आणि कामांची सगळी गडबड बाजूला सारून महालेसाहेबांकडे आता अगदी नक्की जायचंच, असं मी ठरवतो! पं यशवंतबुवा महाले. गाण्यातला एक मोठा माणूस! परंतु हे नांव अगदी सर्वांनाच माहिती नाही.

गोपाला मेरी करूना...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 28/05/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
१९९३/९४ सालचा सुमार असेल, तेव्हाची गोष्ट. "ग्रँटरोडचा नॉव्हेल्टी सिनेमा माहीत आहे ना? त्याच्याजवळच रेल्वे हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्याजवळ एस पी सेन्टर म्हणून साड्यांचं दुकान आहे. तीच बिल्डिंग! ये हां नक्की, मी घरीच आहे!" दस्तुरसाहेब मला फोनवरून पत्ता सांगत होते! पं फिरोज दस्तूर आणि त्यांच सुंदर गाणं! या माणसाच्या मी गेली अनेक वर्ष प्रेमात होतो. त्यांना एकदा भेटावं असं मला खूप वाटत होतं. आणि एके दिवशी तो योग आला. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार मी ग्रँटरोडला त्यांच्या घरी पोहोचलो. लाकडी गोलाकार जिने असलेल्या त्या बिल्डिंगमधलं त्यांचं ते टिपिकल पारशी पद्धतीचं घर.

आमची संगीता

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 28/05/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
अणुशक्तीनगरातली वसाहत वसवायला नुकतीच सुरुवात झाली होती त्या सुमारासच आम्ही तिथे रहायला गेलो. त्या काळात वाहतूकीची आणि संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती. सगळेच रहिवासी नव्याने आलेले असल्यामुळे विशेष ओळखी नव्हत्या. त्यामुळे आपण आपल्या माणसांपासून दूर कुठल्या आडरानांत रहात असल्यासारखे वाटायचे. त्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत आपल्या लोकांसारखी दिसणारी, बोलणारी आणि वागणारी माणसे भेटली की जरा चांगले वाटत असे. त्या काळात तिथे लिमये कुटुंबाची अशीच भेट झाली आणि स्नेह जमला. श्रीयुत त्यांच्या कामात मग्न असायचे तसेच त्यांना ब्रिज, बॅडमिंटन वगैरे खेळांची आवड होती. सौ. गृहकृत्यदक्ष गृहिणी होत्या.

सुंदरा मनामधे..

लेखक ऋचा यांनी गुरुवार, 22/05/2008 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
हा दुवा पहा http://www.youtube.com/watch?v=e7zWwlSZPHo ही लावणी मला अगदी लहानपणा पासुन म्हणजे १० असल्यापासुन आवडते. (१० ही कविता होती मराठीत) ह्यातीम उपमा फारच सुंदर आहेत.

माझे मन तुझे झाले...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 21/05/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, कृपया यूट्यूबवरील हा दुवा पाहा. यात एक सुंदर गाणं आहे, त्या गाण्याबदल मी दोन शब्द लिहिणार आहे! काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर थोरल्या माधवरावांवरची 'स्वामी' ही मालिका दाखवली होती, त्यातल्या एका भागात हे नितांतसुंदर गाणं होतं. गेले अनेक दिवस मी या गाण्याच्या शोधात होतो. आज जालावर मुशाफिरी करताना अचानक यूट्यूबवर स्वामी मालिकेचा हा भाग आणि हे गाणं कानी पडलं व विलक्षण सांगितिक तृप्ती अनुभवली. तिच इथे आपल्यापुढे मांडायचा एक छोटेखानी प्रयत्न करत आहे.

दु:खद निधन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 13/04/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध स॑गीतकार श्री. दशरथ पुजारी या॑चे काल डो॑बिवली येथे कर्करोगाने देहावसान झाले. पुजारीसाहेबा॑चे नाव घेतले की आठवितात त्या॑नी निर्मिलेली साधी-सोपी, पण अवीट गोडीची भावगीत॑ आणि सात्विक वृत्तीची भक्तिगीत॑. त्या॑च्या गाण्याशिवाय आकाशवाणीचा तर दिवस जात नसेल. पुजारीसाहेबा॑नी स॑गीत दिलेली सुमन कल्याणपुरा॑च्या सुमधूर आवाजातील किती तरी गीत॑ रसिका॑ना आठवत असतील. 'रिम झीम करती श्रावण धारा' 'गरजत आले वारे' 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' ' अजुन त्या झुडुपा॑च्या मागे' यासारखी एक से एक सरस भावगीते आजही मनास व्याकूळ करतात. सकाळी आकाशवाणीवर 'केशवा माधवा' 'देव माझा विठू सावळा' 'हरि भजनाविण काळ' इ.