Skip to main content

संगीत

एक गाणे आणि शुभेच्छा

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 22/08/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. सर्व मिपाकराना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या लाडक्या मिपाला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. असो,तर मुळ सांगायचा मुद्दा असा की आत्ता झी टॉकीजवर आयुष्यावर बोलु काही चे पुनःप्रक्षेपण चालु आहे. आणि मगाशीच मी त्यात एक गाणे ऐकले. हे गाणे खरेतर मी काही दिवसापुर्वीच यु नळीवरुन उतरवुन घेतले आहे, व सध्या त्याचे पारायण चालु आहे,अगदी या गाण्याव लिहायचे,त्याचे रसावलोकन का रसग्रहण जे काही म्हणतात ते करायचेच असे ठरवुन मनात लेखही तयार केला होता.

गणेशवंदना

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 22/08/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया! काही दिवसापूर्वी देवकाकांनी 'एखादी ५-६ ओळींची छोटीशी बंदिशीसारखी रचना केलीस का? असं विचारलं, आणि नुकतीच मशकूर अली खान यांची मालकौंसातली "मुरख मन मेरे" ही बंदिश ऐकून तिच्यात मराठी शब्द बसवता येतील का, असा विचार करता करता ही गणेशवंदना मनातून कागदावर उतरली. उद्या गणेशचतुर्थी, आणि मिपाचा वर्धापनदिन.
काव्यरस

मर्मबंधातली ठेव ही...

लेखक अन्वय यांनी मंगळवार, 18/08/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतातील प्रत्येक रागाला एक नादप्रकृती असते. त्यातून भावनिर्मिती होते. मानवी भावनेला घट्ट कवटाळण्याचे विलक्षण सामर्थ्य यात असते. जसा यमनकल्याण आर्जवी, गोरख कल्याणमध्ये प्रासादिक तर भैरवीमध्ये समर्पण भाव आहे. या रागांतील प्रत्येक स्वर आणि त्याचा नाद माणसाच्या अंतरंगात त्या त्या भावनांचे तरंग उमटवितो. असाच पटदीप हा वियोगाची भावना व्यक्त करणारा राग आहे. मात्र ही भावना तो आक्रस्ताळेपणाने मांडत नाही. आपले गाऱ्हाणे तो कळकळीने सांगतो; पण वेदनेत अडकूनही पडत नाही. मर्मबंधातली ठेव ही...

विलक्षण ...साहिर.

लेखक राजा रानडे यांनी मंगळवार, 18/08/2009 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
'संसार से भागे फिरते हो' हे चित्रलेखा या चित्रपटातईल गाने,शब्द रचना आणि संगीत या दोन्हीमुळे माझी अत्यंत आवडते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त वंदे मातरम्! आणखी दोन बाल कलाकार

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 16/08/2009 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
आठवड्याभराच्या भरपूर कामानंतर बाहेर पडायचा कंटाळा, बाहेर धुवांधार पाऊस, आणि सॅटेलाईट टीव्हीचा गायब सिग्नल, या सर्वांचा परिपाक म्हणजे आंतर्जालावर भटकणं, आणि भटकतांना सापडली ही दोन रत्नं! सुरूवात बहुतेक बालपणापासून केली असणारे हे दोघं आता कुमारवयाचे आहेत. पहिली स्मरणिका (ही बहुधा दिल्लीच्या पब्लिक स्कूल मधली विद्यार्थिनी असावी, व्हिडीओज् चे tags पहाता). हिचे, तिच्या वय वर्षे ९ ते १२ या कालावधीतले, यू ट्यूब वरचे instrumental वादनाचे व्हिडिओज सापडले.

एक मराठी गाणे हवे आहे..

लेखक अरुण वडुलेकर यांनी बुधवार, 12/08/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरहो, नमस्कार मला " एकदा सार्‍या प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता सभापति मधोमध उभा" हे गाणे (त्या गाण्याचा ओळी) हव्या आहेत. माझ्या नातीला हे गाणे शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांत म्हणायचे आहे. दुर्दैवाने मला हे गाणे पूर्णत: आठवत नाही. तेंव्हा विनंती ही की, ज्या कोणाला हे गाणे आठवत असेल त्यांनी कृपया ते मिपावर द्यावे किंवा मला व्यनिने पाठवावे. कळावे. अरुण वडुलेकर.

जयपूर घराण्याचे बुजूर्ग पं. पईंना देवाज्ञा

लेखक मोहन यांनी सोमवार, 10/08/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी जयपूर घराण्याचे दिग्गज व बुजूर्ग गायक पं. रत्नाकर पईं यांचे अल्पशा आजारानंतर मुंबई निवासी निधन झाले. अत्यंत अवघड अशा जयपूर गायकीचा जाणकार गेला. पं. मोहनराव पालेकरांचे शिष्योत्तम आणि पं. अभिषेकी, अश्विनी भिडे-देशपांडे, यांच्या सारखे शिष्य तयार करणार्‍या पं. पईंना मिपाकरां कडून आदरपूर्वक श्रध्धांजली. मोहन

गोरख कल्याण

लेखक अन्वय यांनी रविवार, 09/08/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
गोरख कल्याण हा अनेकांप्रमाणे माझाही अत्यंत आवडता राग आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहारात गातात असे म्हणतात. (अचूक वेळ माहीत नाही. याबाबत तात्या अधिकाराने बोलू शकतात.) पण या रागाची सुरावट ही रात्रीच्या वातावरणाला अजिबात पोषक नाही, असे माझे मत आहे. याविषयी कुणाचे म्हणणे वेगळेही असू शकेल. पण मला हा राग ऐकला किंवा पेटीवर वाजविला की उत्तर रात्री अगदी पहाट होताना एकाद्या मंदिरातून संगीत ऐकू यावे, असा भास होतो. हा राग मी पहिल्यांदा कोणत्याही मंदिरात वगैरे एकलेला नाही. प्रथम संजीव अभ्यंकरची ध्वनिफित ऐकली होती. त्यानंतर जसराज ऐकले आणि नंतर अनेक गायकांना ऐकले आहे.

एक समृद्ध राग ... राग कंबलबहार.. त्यातलं एक परिपूर्ण गीत

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 05/08/2009 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं. फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.

लट उलझी सुलझा जा बालमा ...

लेखक बामनाचं पोर यांनी मंगळवार, 04/08/2009 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांनी दर्शनी पानावर यु-ट्युब वरच्या त्याच्यांच सदस्यत्वात अपलोड केलेल्या तेलगु गाण्याची माहिती दिली. सहज उत्सुकता म्हणुन तात्यांनी अजुन काय यु-ट्युबवर ठेवले आहे पाहीले तर " बिहाग " रागातली " लट उलझी .. " ही तात्यांनी गायलेली अफाट लोकप्रिय बंदिश सापडली... क्या बात है..!! मग काय आजच्या दिवसाचे तरी खाद्य मिळाले मेंदुला.. बिहाग हा एक शृंगारीक राग.. तो फार दिवसांनी घरी परततोय.. "ती आतुरतेने वाट पाहात असेल" लवकर पोहचावे म्हणून तो आडमार्गाने जाणारी पायवाट पकडतो.. झाडी-झुडपातून जाणारी वाट.. मधे एक छोटासा ओढा लागतो.. अन तो थबकतोच . कारण पलीकडे ती उभी आहे..