Skip to main content

संगीत

हेमंत

लेखक अन्वय यांनी शनिवार, 26/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
फासले ऐसे भी होंगे, ये कभी सोचा न था... सामने बैठा था मेरे, लेकिन वो मेरा न था... आपलं असूनही कुणी आपलं नाही, ही वेदना कुणालाही बेचैन करते. हेमंत राग ही वेदना फार तीव्रतेने व्यक्त करतो. आशा आणि निराशा यातील अवकाश म्हंजे हेमंत! त्यात बेचैनी, व्याकूळता, विरहवेदना आहेच; पण तो येईल कधीतरी... होईलच आपला, हे समाधान आणि आसही त्यात आहे. हेमंत रागाला व्यक्त करणारी माझिया प्रियाला प्रीत कळेना...

तीन काळी गाणी

लेखक प्रदीप यांनी गुरुवार, 24/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ही गाणी 'काळी' आहेत, कारण त्यांना दु:खाची तीव्र झालर आहे. नैराश्याची, वैफल्याची गडद छटा ह्या गाण्यांवर आहे. ही तिन्ही गाणी चित्रगुप्त ह्या थोड्या दुर्लक्षिलेल्या पण अत्यंत गुणी संगीतकारांकडे रफीसाहेबांनी अप्रतिम गायिलेली आहेत. दु:खाच्या चढत्या श्रेणीने (माझ्या मते, अर्थात) मी ती येथे देतो. पहिली दोन गाणी राजेंद्रकृष्ण ह्यांची आहेत. तिसरे साहिरचे. गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, त्यानंतर संगीत, गायन इ. सर्व. तेव्हा ह्या गाण्यांचे शब्द देत आहे, त्या नादात अपरिहार्यपणे लेख मोठा झाला आहे. पहिले गीत आहे 'मेरा क़सूर क्या है?

मालवून टाक दीप

लेखक अन्वय यांनी गुरुवार, 17/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
भूप म्हणजेच भूपाली. हा राग रात्रीच्या वेळी गायला जातो, असं म्हणतात. परंतु आपल्याकडे असंख्य भूपाळ्या आहेत. त्या याच रागातल्या. त्यामुळे हा राग रात्रीचा की पहाटेचा हा वादाचा विषय आहे. --- उत्तर रात्र उलटून गेलीय. पक्षांचा किलबिलाटही अद्याप सुरू व्हायचा आहे. काही वेळानंतर झुंजूमुजू होणार आहे. अशा धीरगंभीर वातावरणात भूपाळ्यांचे स्वर मनप्रसन्न करतात. या वातावरणातील शांत आणि गंभीर पण प्रसन्नभाव भूपमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. हीच भूपची नादप्रवृत्ती असावी. सा रे ग प ध सा हे सहा स्वर असलेला हा राग त्यामुळेच उत्तररात्रीनंतर पहाटपर्यंत गायला जात असावा, असे वाटते. असो.

ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे निधन

लेखक खडूस यांनी बुधवार, 16/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे आज सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी आत्ताच वाचली. या थोर कलाकारास आमची विनम्र श्रध्दांजली .

रसूल अल्लाह आणि तो

लेखक अन्वय यांनी सोमवार, 14/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
रसूल अल्लाह या बंदिशीचा जालावरील धागा मिळविण्यासाठी चर्चा टाकाली होती. ही बंदिश मिळेल का नाही ही शंकाच होती. ती मिळाली. त्यासाठी हुप्प्याचे विशेष आभार! या बंदिशीने मला खूप पूर्वीपासून वेड लावले आहे. या विषयावर असंख्य मिपाकरांचे प्रतिसाद मिळाले. त्यावरून रसूल अल्लाह बंदिशीवर लोक किती प्रेम करतात, हेच दिसून आले. त्यामुळे मला या संबंधीचा एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो आहे. हा किस्सा मी फारसा कुणाला सांगितलेला नाही.... एकदा रात्रपाळीचे काम उरकून आम्ही तिघेजण (त्यातील एक मिपाकर आहेत.) आत्म"शांती' करण्यास बसलो होतो. अर्थातच हॉटेलमध्ये. आमची संगीतावर चर्चा सुरू झाली.

आशाताईंना ७७व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

लेखक sujay यांनी मंगळवार, 08/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
८ सप्टेंबर, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताईंचा ७७ वा वाढदिवस, त्यांना मिपा परीवारा तर्फे "वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा" ह्या आवाजावर आपल्या सारख्या रसिकांनी निस्सीम प्रेम केलयं आणी करत राहू. आशाताईंची तब्येत अशीच ठणठणीत राहो व त्या शतायुषि होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना .

मोहक दरबारी

लेखक अन्वय यांनी रविवार, 06/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या हवेत, अगदी नीरव शांततेत चांदण्यांनी भरलेले आकाश न्याहाळताना दुरावलेल्या प्रेयसीचा आठव यावा. तिच्या सहवासात घालविलेला क्षणन्‌ क्षण पुढ्यात उभा राहावा, असे दरबारी कानडाचे रुप वाटते. हा राग मंद्र आणि मध्यम सप्तकात रमणारा असल्याने यात आतर्तबरोबरच गंभीरताही आहे.

नुक्ता चीं हैं गमे दिल..

लेखक संजय अभ्यंकर यांनी शनिवार, 29/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ता चीं हैं गमे दिल उनको सुनाये ना बने... ह्या गझलची जादू अशी की तीने अनेक गायक, संगीतकारांना वेड लावले. हि मिर्झा गालीबची गझल, अनेक संगीतकारांनी चालीत बांधली. अनेक गायकांनी ती गायली. ह्या गझलच्या अनेक छटांचे संकलन करण्याचा मानस आहे. ह्या पैकी सुरय्या, नुरजहाँ, रफी साहेब व सैगल साहेबांच्या आवाजातील गझल यु ट्युब वर उपलब्ध आहेत. हि गाणी येथे ऐकता येतील. आणखी गायक, संगितकारांच्या छटा हव्या आहेत. कृपया मिपाकरांना माहीत असल्यास दुवे द्यावेत.

मूर्छना

लेखक शुभान्कर यांनी बुधवार, 26/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारतीय संगीतात मूर्छना ही एक खुपच सुंदर कल्पना आहे. मूर्छना म्हणजे एका रागाच्या एका स्वरावरुन दुसरा राग तयार होणे. उदा. मालकंस या रागाच्या सर्व पाचही स्वरावरुन भुप्,दुर्गा,मेघ,धानी असे राग मिळतात. उदा. दाखल धुंद मधुमति रात रे हे गाणे मालकंस आणि भुप या दोन्हि रागात सुन्दर बसते. फक्त त्याचा सा बदलतो. तीच गोष्ट पन्ख होति तो उड आती रे ह्या गाण्याची. मला ह्या मुर्छना पद्धती वर एखादे चांगले पुस्तक हवे आहे. कुणी सांगु शकेल काय? धन्यवाद.

टॅलेंट सर्च कंटिन्यूज.. मॅसेच्युसेट्स मधली दाक्षिणात्य अनुषा

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 23/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी सापडलीय मॅसेच्युसेट्सची एक बहुतेक कानडी सात-एक वर्षांची चिमुरडी, अनुषा (ती कदाचित तामीळही असू शकेल, इथली 'विकास' वगैरे मंडळी बहुतेक खात्री करू शकतील). मला ती सापडली, ते लता मंगेशकरांचं मोगरा फुलला यू ट्यूब वर load होत नव्हतं म्हणून 'दुधाची तहान ताकावर' या न्यायाने समोर आलेल्या व्हिडिओवर क्लिक केल्यावर.