जिंगल्स ते सिनेमा
चला म्हणल आज डीएसके गप्पांना जाउ यात. डीएसकेंना मराठी मध्यमवर्ग-उच्चमध्यमवर्गाची नाडी अचुक सापडलीय म्हणुनच ते गेली १०-११ वर्ष सांस्कृतिक गप्पांचा महोत्सव करतात. चकटफु असल्याने आम्ही अर्थातच गेलो होतो. या वेळी सगीतकार अशोक पत्की यांच्याशी गप्पांनी पहिले पुष्प गुंफले."जिंगल्स ते सिनेमा' या गप्पांच्या कार्यक्रमात पत्की यांच्याशी राजेश दामले आणि मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला. वयाच्या पाच वर्षापासुन बॆंडवाल्यांचे आकर्षण असलेल्या अशोक पत्कींना आपल्यातील सुप्त गुणांची चाहुल लागली.
मिसळपाव
नूतनचे सर्वच चित्रपट एक से एक होते. पण तिचा ''सुजाता'' फार गाजला. मला विशेष लक्षात राहिला कारण एरवी कडक धोरणे असणार्या आमच्या शाळेत तो आम्हाला चक्क चित्रपटाची रीळे आणून सभागृहातील पडद्यावर दाखवला गेला.