Skip to main content

सारेगम ? प !!!

लेखक हेरंब यांनी सोमवार, 20/04/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
इतर ठिकाणी मी लिहिलेल्या लिखाणाचे पुन्हा प्रसिध्दीकरण : - जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोचावे म्हणून. पधनीसारे' चा कार्यक्रम सुरू झाला होता. निवेदिका सांगत होती. " हल्लीच्या मुलांना ध,नी आणि वरचा सा हे ठाऊकच नसतं , अशी आमच्यावर टीका होऊ लागली ,म्हणून आम्ही कार्यक्रमाचे फक्त नांव बदलले आहे, बाकी स्वरुप आधीचेच राहील. सध्या आपण ४५ वरच्या वयाच्या स्पर्धकांना संधी देत आहोत. त्यानंतर यातल्या विजेत्या स्पर्धकांना परीक्षक करून आत्ताच्या परीक्षकांची स्पर्धा घेण्याचा विचार आहे." यावर एकही टाळी न पडल्यामुळे निवेदिकेने हक्काने टाळ्या पाडून घेतल्या.

टॉस द फिदर्स

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 18/04/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
नक्की पहा- आवडेल. मिपाकर महिलावर्गाला खासकरुन आवडेल असे वाटते.

सारेगमप - महाराष्ट्राचा आवाज

लेखक शुभान्कर यांनी मंगळवार, 07/04/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा सारेगमप सुरु झाले आहे. So called प्रोफेशनल गायक गात आहेत. मला व्यक्तिशः कुणाचेच गाणे सफाईदार वाटत नाही. खूप चांगल्या हौशी गायकांसारखे किंवा थोडे अधिक बरे/वाईट. तुम्हाला काय वाटते?

सारेगमप- महाराष्ट्राचा आवाज (अद्ययावत)

लेखक बाकरवडी यांनी मंगळवार, 07/04/2009 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
सारेगमपचे नवीन पर्व सुरू होउन आता २ आठवडे होतील. या पर्वात १० प्रसिद्धीच्या झोतात असलेले नव्या दमाचे तरूण गायक- गायिका आहेत. सर्वजण हा कार्यक्रम पहात असतील.परंतु ह्यावेळी कोणीच धागा सुरू केला नाही. का कोणी हा कार्यक्रम पहातच नाही? का little champs च्या अनपेक्षित निकालाने सगळे कंटाळले काय? असो, आपणास या नव्या पर्वाबद्दल काय वाटते ते सांगा.तसेच नवे परिक्षक असलेले पं.मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याबद्दलही सांगा

गजानन वाट्व्यांचे निधन

लेखक शुभान्कर यांनी गुरुवार, 02/04/2009 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
थोडयावेळापूर्वी कळले की गजानन वाटवे गेले. मराठी भावगीताचा जनक हरवला त्यांना विनम्र श्रद्धांजली.

अर्थ कुणी सांगेल काय?...

लेखक झंडू बाम यांनी सोमवार, 16/03/2009 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
समयीच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायाशी पडते भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे मागेमागे राहीलेले माझे माहेर बापुडे साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये हासशील हास मला, मला हासू ही सोसेना अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का जुना हे गाणे ऐकताना हुरहुर लावते. खूपवेळा ऐकूनही समाधान होत नाही म्हणून वारंवार ऐकावेसे वाटते. मात्र त्यातील शब्दांचा अर्थ काही लागत नाही. गाण्याचे रसग्रहण कुणी करेल काय? किवा अर्थ कुणी सांगेल काय?...

गाणे हवे आहे , मदत करा

लेखक बाकरवडी यांनी सोमवार, 16/03/2009 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाकडे " ....... ओ नाखवा होडीनं फिरवाल का..." या गाण्याचे एम पी ३ आहे का ? लिंक दिली तरी चालेल गाण्याचे बोल मला नक्की काय आहेत ते माहीत नाही सांभाळून घ्या ..

गाण्याचे ट्रॅ़क्स हवे आहेत..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 16/03/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मडळी, कोणाकडे खालील मराठी गाण्यांचे करौके साऊंडट्रॅक्स आहेत का? १. विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी २. वारा गाई गाणे.. ३. गडद जांभळं.. भरलं आभाळ.. एम पी ३ असेल तर उत्तम. जितक्या लवकर मिळतील तितक्या लवकर हवी आहेत. मला माझ्या जीमेल ला पाठवावी ही विनंती. - प्राजु

मोत्झार्टचे शांतिस्तवन (रेक्विएम)

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 10/03/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच बॉल्टोमोर सिंफनी ऑर्केस्ट्रा आणि बॉल्टिमोर कोरल आर्ट्स सोसायटी यांनी एकत्र सादर केलेला कार्यक्रम ऐकायचा योग आला. त्यांनी मोत्झार्टचे रेक्विएम (मृतात्म्यासाठी शांतिस्तवन) सादर केले. या संगीताबद्दलची दंतकथा काही लोकांनी हॉलिवुड-निर्मित "आमादेउस" चित्रपटात बघितली असेलच - तीत कल्पनारम्यता फार आणि तथ्य फार कमी आहे. त्या चित्रपटात मोत्झार्टचा द्वेषयुक्त भक्त त्या काळातला संगीतकार सालिएरी होता, आणि त्याने मोत्झार्टच्या बापाच्या भुताचे सोंग घेऊन भावनिक दडपणाखाली हे संगीत मोत्झार्टकडून लिहून घेतले, अशी काही कथा आहे.