Skip to main content

समाज

स‌त्तेत‌ली मिश्किली आणि विवेक

लेखक मन यांनी सोमवार, 26/06/2017 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल‌ माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस‌ क्ल‌बात‌. त्यांनी "एक असाधारण वाचक" साद‌र‌ केलं. हा "अॅल‌न‌ बेनेट‌" लिखित‌ ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उप‌स्थित राह‌णं हा नित‌ळ सुंद‌र‌, निव्व‌ळ अप्र‌तिम‌ अनुभ‌व होता. पुरंद‌रे ताई थोर आहेत‌. ग्रेट्ट आहेत‌. मी त्यांचा प‌ंखा/फॅन आहेच. विविध‌ भाषांव‌र‌ची त्यांची हुकुम‌त‌ , व त्या- त्या भाषेत‌लं स‌हित्य‌ स‌म‌जून घेणं हे स‌ग‌ळं त‌र‌ त्यांच्याठायी आहेच‌ प‌ण एका भाषेत‌ला म‌ज्कूर‌ दुस‌ऱ्या भाषेत‌ नेम‌क्या आश‌यास‌ह‌ पोच‌व‌णं हे काम‌ लै अव‌घ‌ड‌. प‌ण ह्या त्यात‌ही वाक‌ब‌गार आहेत‌. असो.

अदृष्य हात

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 17/06/2017 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
चाले कशी काय ही अर्थव्यवस्था चाले कशी काय? अदृष्य हाताची ही सारी सारवासारव नव्हे काय? पैसा म्हणजे काय, सांगा पैसा म्हणजे काय? मानवनिर्मित मूल्यवाचक, म्हणजे पैसा नव्हे काय? पैसा करतो काय, सांगा पैसा करतो काय? ज्याचे जसे कर्म तैसे त्याचे माप तो भरे नव्हे काय? कर्म म्हणजे काय सांगा, कर्म म्हणजे काय? भांडवल जमीन वापरून श्रमदान म्हणजे कर्म नव्हे काय? कर्म करते काय सांगा, कर्म करते काय? वस्तू आणि सेवा कर्मच निर्माण करी नव्हे काय? त्याला मिळते काय, सांगा कर्मचाऱ्याला मिळते काय? मालक फेकेल तेवढा तुकडा, त्याचाच नव्हे काय? श्रेष्ठ नव्हे काय, त्याचे योगदान श्रेष्ठ नव्हे काय? योग्यतेने नव्हे, श्रेष्ठत
काव्यरस

नामकरण.. (एक प्रेमकथा - भाग १ )

लेखक दिपक लोखंडे यांनी रविवार, 11/06/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा.. ..................................................... अहो ऐकलत का?.. तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे... कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?.. अरे देवा!... या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही.. विसरला का तुम्ही? आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी.. अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो.. .......................................................... - २० मिनिटानंतर... (गाडीमध्ये सागर व त्याची बायको..) सागर.. तुम्हाला काही विचारु का? काय गं, यात परवानगी कसली घ्यायची..

निव्वळ गर्दी

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 09/06/2017 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : पुण्यातील रेसकोर्स काळ : १९७१-७२ दरम्यानचा एक दिवस प्रसंग : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची जाहीर सभा त्यावेळी मी शालेय विद्यार्थी होतो. १९७१ च्या भारत-पाक युद्धात आपण विजयी झाल्यानंतर काही काळाने इंदिराजींची जाहीर सभा तेथे आयोजित केली होती. आपल्या पंतप्रधानांना पाहणे हे एक जनतेचे जबरदस्त आकर्षण असते. त्यामुळे सभेला तोबा गर्दी झालेली. एवढी प्रचंड गर्दी अनुभवण्याचा तो माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग होता. त्या गर्दीत आम्ही लहान भावंडे एकमेकांची बोटे घट्ट धरून आमच्या पालकांसमवेत तेथे वावरत होतो. सुमारे तीन तास आम्ही तेथे घालवले असावेत.

फिक्सींग

लेखक रघुनाथ.केरकर यांनी गुरुवार, 08/06/2017 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
राजा: हळु रे .... कित्या इतको राग काढतय... शिवा: मेल्या तुका आदी मी वळखाकच नाय मरे.... राजा: सांगतय काय...? तेवाच मायझया ह्यो वाकर काढलय मानेर शिवा : सॉरी सॉरी हा.... चुकान झाला रे.... राजा: मेल्या भगभगता कसला.... कितकी ती धार काढलय शींगांका. येक दिवस शाप झरान जातली. इतक्यात शिवा ने जोर कमी केला. राजा बैल अजुन तसाच मस्तक रेटत शिवा बैलाला पुढे ढकलत राहीला. दोन्ही बैलांचे मालक हातात कासरे धरुन झुंज बघत होते.

लोक काय म्हणतील ?

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 06/06/2017 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
आपले नुकसान कशाकशाने होऊ शकते? आळशीपणा, कामचुकार वृत्ती, लबाडी, अविचारी धाडस, स्वैरवर्तन, कमकुवतपणा .....अशा कितीतरी गोष्टी नुकसानीस कारणीभूत ठरतात. आपले नुकसान हे अनेक आघाड्यांवर होऊ शकते. जसे की आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक, इत्यादी. नुकसान झाल्यावर आपण खडबडून जागे होतो. मग नुकसानीचे खापर दुसऱ्यावर फोडू पाहतो. नंतर आत्मपरीक्षण करतो. त्यातून स्वतःमध्ये काही बदल घडवतो आणि स्वतःला सुधारतो. पण, जर का सुधारणे आपल्याला जमले नाही तर मात्र आपली अवस्था केविलवाणी होते. नुकसान करणाऱ्या वरील कारणांशिवाय अजून एक कारण आपल्या मनात दडून बसलेले असते.

जय महाराष्ट्र बोला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/06/2017 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला कुणाच्या बापाची भीती नाय बोला दणकूण बोला तुम्ही जय महाराष्ट्र बोला अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही उगा पिरपिर करू नका नाहीतर एकच ठेवून देवू टोला बोला बोला जय महाराष्ट्र बोला बापजादे खपले आमचे सीमालढा देवून लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून खोटे गुन्हे नका दाखल करू कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा बोला बोला जय महाराष्ट्र बोला मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो सोईचे नियम केले हो केले दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले खेळी केली अन गावं खिशात घा
काव्यरस

पैलवान-२

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 02/06/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
पैलवान-१ "ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू...

शामराव

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी सोमवार, 29/05/2017 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
बायको बाळंत झाली अन शामराव गायब झाला. कुणी म्हणायचं सोन्या चांदीची दुकानदारी शिकायला परराज्यात गेलाय. कुणी म्हणायचं राजस्थानात दिसला. आता शेठ झालाय. कुणी म्हणायचं त्यानं आता तिकडच बाई ठेवलीय. पण शामराव काय गावाला कधी नजरं पडला नाही. बायकोनं मात्र नुसत्या आठवणीवर पोटाची खळगी भरण्यासाठी गावाचा रोजगार करून पोरगा वाढवला. पुढ कधीतरी त्याच्या पोराचं लग्न पण झालं. शामरावला नातवंडे झाली. एव्हाना काळाच्या ओघात गाव शामरावला विसरून गेला. पण लेकानं न पाहिलेल्या बापाला शोधायसाठी सारी दुनिया पालथी घातली. बाप पाहिलेली भावकीतली लोकं घेऊन मैलोन मैल रल्वेने प्रवास केला.

पैलवान-१

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 26/05/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी. "....तरीबी पब्लिक कुस्तीच्या रिंगणाजवळ एवढ दाटीवाटीनं बसल्यालं की एकाला ढकाल्ला असता तरी वळीन सगळी सांडली असती. कुस्तीच आशी आजाब लावल्याली! गावबी आजाबच म्हणायच! म्याबी लका पैलवान हाय, पण आपलीबी छाती झाली नस्ती त्या डोंगराच्या बगलत मान द्यायची. ह्ये मोठ्ठा तगडा राक्षिसावनी गडी आन दुसरं कोनतरी फाळकं होतं. पर अर्धा तास उलाटला तरी त्यो चिपाड काय पडना गड्या! त्या ढोल्यानं कुस्तीतले आसत्याल नसत्याल तेवढे डाव लावले पण ह्यो दुसरा काय दाद दिना!