Skip to main content

समाज

विकल्प

लेखक चंद्रकांत यांनी सोमवार, 14/08/2017 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
विकल्प आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यात विसावणाऱ्या क्षणांचे प्रयोजन आपल्यासाठी नेमके काय असते, याचा आपण ठरवून सखोल वगैरे विचार कधी केलेला असतो का? मुळात ते असते की, फक्त समाधानासाठी तसं म्हणायचं असतं? तसेही समाधान शब्दाचे निश्चित असे परिमाण सांगता येईल, असे वाटत नाही. समजा या प्रयोजनांचं उत्तर कृतकृत्य होणे वगैरे असे काही असेल, तर सगळ्यांच्या वाट्यास ते सारखेच असते, की प्रेत्येकासाठी भिन्न? बरं, या क्षणांचं मोल मोजून घेण्याचं शहाणपण सगळ्यांना सारखं अवगत असतं का, की ज्याच्या-त्याच्या वकुबाने त्याचे स्तर ठरतात? निश्चित विधान करणे जरा अवघड आहे.

चेलिया

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 13/08/2017 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
चेलिया परवा रात्री माझी मुलगी बँकॉक वरून आपल्या मामा कडून परत येत होती तिला आणायला मी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेलो होतो. विमान पोहोचे पर्यंत तेथे काय करायचे म्हणून सहारला वळायच्या रस्त्यावर गाडी उभी केली आणि समोर असलेल्या हॉटेलात कॉफी प्यावी म्हणून गेलो. तेथे असलेल्या पेनिन्सुला आणि पर्शियन दरबार या तारांकित हॉटेलच्या शेजारी असलेले एक छोटेसे हॉटेल म्हणजे हॉटेल न्यू एअरपोर्ट. सौ. बरोबर होती तिला घेऊन या हॉटेलात शिरलो. गल्ल्यावर एक मुसलमान मालक होता त्याने हसून स्वागत केले.

मटणवाला

लेखक अक्षरमित्र यांनी रविवार, 13/08/2017 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीच्या समोरचा रस्ता ओलांडला की मटणवाल्याचे दुकान दिसायचे. मटणवाल्याला आम्ही अमजद खानच म्हणायचो. कोंबडी आधी की अंडं आधी ह्या यक्षप्रश्नाप्रमाणे अमजद खान आधी की मटणवाला आधी या प्रश्नाचे उत्तर मला कधी मिळायचेच नाही. मी लहान असल्यापासून त्याला उभा किंवा चालताना किंवा इतर क्रिया करतांना बघीतलेलं नव्हतं. जेव्हा बघावं तेव्हा तो मटणाचे तुकडे करण्याच्या लाकडी ओंडक्यासमोर बसलेला असायचा. अंगात बोकडाच्या रक्ताने लाल झालेलं आणि कधी काळी विकत घेतलं तेव्हा सफेद असावं असा संशय येण्याजोगं बनियान आणि खाली लाल चौकडयाची लुंगी असा त्याचा अवतार असे.

आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञ

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 11/08/2017 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांत मला अनेक ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांनी शहरांत उपलब्ध असणार्‍या वैद्यकीय तज्ञांबद्दल शंका विचारल्या. तेव्हा असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे: १. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात. २. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS ३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत.

साडेपाच इंच !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 09/08/2017 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . . आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . . काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . . मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो ! कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ? कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं ! जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . . आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?

पुढील पाच मिनिटात

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 08/08/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुढील पाच मिनिटात, हे मानवते "अ" अतिरेकी काळिमा फासतील तुझ्या तोंडाला "ब" बलात्कारी झुकवतील तुझी मान शरमेने खाली "क" कोवळी बालपणं विकली जातील बाजारात "ड" डोकी फुटतील धर्ममार्तंडांच्या एका भृकुटीभंगाने तुझ्या डोळ्यादेखत ई-पेपर्स सांगून थकतील "अ" "ब" "क" "ड" च्या मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या किंमती रोम-रोम जळताना तुझ्या जीर्ण-शीर्ण त्वचेच॑ हे उत्सवी फिड्ल कोण वाजवतंय न थांबता?
काव्यरस

चॅलेंज - भाग ३

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 08/08/2017 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज भाग ३ दिगंत म्हणाला, “who’s next?”. शौनकने मीरा आणि अवनीकडे बघितलं. त्यांपैकी कोणीच पुढे होत नाहीये असं पाहिल्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, मी वाचतो,” आणि त्याने वाचायला सुरुवात केली. “लिहिणंबिहिणं मला कठीणच आहे. दिगंत, तुम्हा फिलॉसॉफर लोकांना बरं जमतं असं लिहिणं. आम्ही डॉक्टर म्हणजे three times a day लासुद्धा TDS लिहिणारे.... बघूया कसं जमतंय. बुधावारचं ओ. टी. (ऑपरेशन थीएटर) चालू होतं. हर्नियाची mesh लावताना मधेच श्रीखंडे सरांनी मला विचारलं, “काय मग, या महिन्यात काय?”.

चॅलेंज भाग 2

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 03/08/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुन्हा महिन्याचा शेवटचा शनिवार. सहाला अजून पाच मिनिटं होती. पण शौनक आणि दिगंत वेळेआधीच पोहोचले होते. “कधी वेळेवर येणार रे या मुली?” शौनकने म्हटलं. “अजून सहा वाजायचे आहेत. त्या बघ त्या दोघी रिक्षातून उतरतायत.” दिगंतने कॅफेच्या मोठ्या काचेच्या खिडकीकडे हात करत शौनकला दाखवलं. अवनी आणि मीरा रस्त्याच्या दुसर्या बाजूला रिक्षातून उतरत होत्या. बोलत बोलत रस्ता ओलांडून दोघी कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्यांचे चेहरे बघून त्या काहीतरी महत्त्वाचं बोलतायत असं वाटत होतं. मीराचा चेहरा तर फारच ओढलेला दिसत होता. त्या दोघी कॅफेच्या आत शिरल्या.

जनरेशन गॅप आणि निळाई

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी बुधवार, 02/08/2017 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

श्री महेश गिरी आणि श्री विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे अभिनंदन.

लेखक साहना यांनी मंगळवार, 01/08/2017 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षां पासून "शिक्षणाचा अधिकार कायदा" रद्दबातल करावा आणि ९३वी घटनादुरस्ती रद्दबातल करावी ह्यावर आमचे बरेच काम चालू आहे. ह्या संसदीय सत्रांत ह्या दृष्टीने बरीच प्रगती झाली (थोडी का असेना पण प्रगती आहे). भाजपचे श्री महेश गिरी ह्यांनी खाजगी बिल आणून ९३वी घटनादुरुस्ती रद्दबातल करण्याची मागणी केली.