Skip to main content

समाज

आली गौराई अंगणी

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 30/08/2017 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या चतुर्थीपासून उभ्या महाराष्ट्रात वातावरण कसे गणेशमय झालाय ना, आता कालपासून त्यात भर पडलीय गौरींची. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवलीत का? आपला लाडका बाप्पा महाराष्ट्रभर घरोघरी येत नसला तरी त्याचे लाड आणि साजशृंगार मगाराष्ट्राभर जवळ जवळ जवळ जवळ सारखेच केले जातात. पण माहेरवाशीण बनून येणारी गौरीचं तसं नाहीये, ती घरोघरी येते आणि तिचं कोडकौतुक मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिचं स्वरूपही वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आमच्या साध्या भोळ्या गौराईची ओळख करून द्यावी. तर आमच्या गौरीच्या आगमनाची तयारी श्रावण संपतानाच चालू केली जाते. सुरुवात होते घमेलंभर तांबडमातीपासून.

स्वातंत्र्य लढा २.०

लेखक उमेश धर्मट्टी यांनी मंगळवार, 29/08/2017 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
चला झाला स्वातंत्र्यदिन!! जोडून आलेल्या सुट्या पण संपल्या. देशभक्तीचा पूर आता ओसराला असेल आणि सगळं कसं पूर्ववत होऊन जाईल. सगळया थोरामोठ्यांचा तसबिरीवरच्या फुलांच निर्माल्य विसर्जन त्याच्या विचारसहित करून पुढच्या स्वातंत्र्यदिनाची वाट बघू या. ७० वर्षाचा झाला आपला देश आणि आता पंचाहत्तारीकडे वाटचाल. एका मनुष्याच्या आयुष्यात हा एक आयुष्याचा उतरणीचा काळ असतो, पण देशासाठी तेही आपल्या देशात जेथे तरुणाची संख्या प्रचंड आहे, तो देश म्हातारा न होता तारुण्याने सळसळत असतो. इथून पुढचा काळ आहे आपला आहे, जगात आपण आपला ठसा उमटवू शकतो आणि महासत्ता होऊ शकतो.

सामूहिक अधः पात

लेखक sudhirvdeshmukh यांनी रविवार, 27/08/2017 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
#सामुहीक_अध:पात एक काळ होता साधेपणा, विरक्ती, सभ्य भाषा व उदात्त विचारसरनी ही संतांची लक्षणे समजल्या जायची. आता त्याची जागा भपकेबाजी, पैश्याचे कीळसवाने प्रदर्शन, उग्र भाषा याने घेतली आहे. असे का झाले ? साधी, सरळ राहणी जगणाऱ्या व्यक्तीला पूर्वी समाजात मान होता. आताच्या काळात आपल्या समाजाचे सामुहिक स्खलन झालेले आहे. कुठल्याही मार्गाने धनाढ्य झालेल्या ऐतखाहू माणसाला समाजात जो पर्यन्त डोक्यावर घेतल्या जाईल तोपर्यन्त फक्त 'पैसा' हाच या समाजाचा धर्म राहील. अश्या अध:पात झालेल्या समाजात आदर्श म्हणून स्वीकारावे अशी लोकं अपवादानाचेच निर्माण होतील. आपले आदर्श जर चुकीचे असतील तर ती चूक आपली आहे.

लिंगायत समाज हिंदू धर्मा पासून वेगळा होऊ इच्छितो. पण का ?

लेखक साहना यांनी बुधवार, 23/08/2017 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
लिंगायत समाजाने आपणाला वेगळा धर्म अशी ओळख मिळावी अशी मागणी केली आहे. भारताच्या इतिहासात हि काही पहिली घटना नव्हे, ह्या आधी रामकृष्ण मिशन ने तीच मागणी केली होती. येत्या काही वर्षांत हि मागणी इतर अनेक पंथ करतील ह्यांत काहीही शंका नाही. वीरशैव लोकांनी सुद्धा हि मागणी करायला सुरुवात केली आहे. पण लिंगायत समाज कसा हिंदूच आहे आणि हि मागणी कशी निरर्थक हे अनेक लोक साक्षी पुरावे देऊन मांडतील पण त्याला काहीही अर्थ नाही. ह्या मागणीची "वरवरची करणे" आणि खरी कारणे वेगळी आहेत. हि मागणी नक्की का केली जात आहे त्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

आबा (क्रमश)

लेखक शेवटचा डाव यांनी मंगळवार, 22/08/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत 'आबाा' यांंचावर बरच लिहल गेलय पण हे जरा वेगळ आहे चार भाग लिहतोय त्यातील भाग एक तिन्ही बंगल्यांच्या म्होर वावरात आबा बशेल व्हता
मन भरुन बंगले पाता पाता आबाला हुंदका आला आन आबान माग वळुन पाह्यल तसा आबा भूतकाळाच्या गर्द झाडीत शिरला
      "दादा य दादा"
दिगु न त्याच्या मोठ्या भावाला हाक मारलि
" काय झालर दिग्या "
विहरी जवळ गेलेल्या पुरुषोत्तम दादा ने वो देत प्रश्न केला
"आर पंकु बेसुध झालीय अन आबा अन भागु तिला दामुनानाच्या  बैलगाडी त घेऊन वैद कड नेताल "
 दादान सायकला टांग मारली अन तडक वैद्या कड गेला

संस्कृती vs अंधश्रद्धा

लेखक योगेश कोयले यांनी मंगळवार, 22/08/2017 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझ्या मनातील द्वंद्व आहे काही दिवसांपासून.. शीर्षक कदाचित साजेसं नाही (मी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणारा विध्यार्थी आहे लेखनाबाबत अजूनतरी प्रगल्भता आलेली नाही) परंतु जे मला सांगायचं आहे त्यासाठी तेच बरोबर वाटतं! झालं असं आहे की या आठवड्यात गणपती येतायत सगळी कडे लगबग सुरू आहे.. घरी असतो आमच्या गणपती.. सुरुवात मीच केली आहे त्याची किंवा माझाच हट्ट होता त्यासाठी काही वर्षांपुर्वी.. त्यामुळे तयारीही माझ्याचकडे असायची.. साफ सफाई, सजावट सगळंच.. गणपती आले की एकंदरीत सगळं छान असतं, प्रसन्न वाटतं मग मित्रमंडळी, आप्तेष्ट, पाहुणे, आणि अगदी काही जवळची माणसे☺(ज्यांना इतर वेळी घरी बोलावणं अवघड) यांना आम

लिखाण

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 21/08/2017 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

असं असतं थाई लग्न!!

लेखक बाजीप्रभू यांनी रविवार, 20/08/2017 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात की एखाद्या देशाचं अंतरंग, समाजमन, संस्कृती कशी आहे हे जाणून घ्यायची असल्यास तेथील भाषिक सिनेमे, नाटक किंवा लोककला पहा. यात मी अजून एक सुचवेन ते म्हणजे स्थानिक "लग्न सोहळा" पहाण्याची. धर्मश्रद्धा किंवा परंपरा त्यातून प्रतीत होणारे समाजमन अनुभवण्याची उत्तम संधी यानिमित्ताने मिळते असं मी म्हणेन. अर्थात अशी संधी सगळ्याच मिपाकरांना प्रत्यक्ष मिळेलच असं नाही म्हणून मग धृतराष्ट्राला संजयने जसा युद्धाचा आँखों देखा हाल सांगितला तसाच मी तुम्हाला एका थाई लग्नाचा सांगणार आहे. (बाकी लग्न आणि युद्ध तसे समानर्थीच शब्द आहेत, फार फरक नाहीये दोघांत).

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 20/08/2017 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे.

चॅलेंज - भाग ५ अन्तिम

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 17/08/2017 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज भाग ५ (अंतिम) एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला. “हो हो, मी येतेच थोड्या वेळात” म्हणून तिने फोन ठेवला. सगळ्यांच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्ह पाहून तिने म्हटलं, “रसिक, बुकस्टोअरवाला” “तो कशाला तुला फोन करतो?” शौनकने तत्काळ प्रश्न केला. “बुकस्टोअरवाला कशाला फोन करेल! पुस्तकांबद्दलच करेल ना!” दिगंतने परस्पर शौनकला उत्तर दिलं. “नाहीतर काय! मी पुस्तकं मागवली होती. ती आली आहेत. ते थोड्या वेळाने दुकान बंद करतील. म्हणून लवकर येऊन घेऊन जायला सांगत होता.