Skip to main content

समाज

दिव्यांची कहाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/08/2019 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.

'पागोळी वाचवा'-अंमलबजावणी

लेखक सुनिल प्रसादे यांनी गुरुवार, 01/08/2019 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
'पागोळी वाचवा अभियान' अंमलबजावणी करताना - 'पागोळी वाचवा अभियान' जसं जसं पुढे सरकत आहे, तसं तसं लोकांनी त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आमलात आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरवात केली आहे. एखाद्या गोष्टीचा विचार करणं, ती समजून घेणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं वेगळं. एखादी गोष्ट प्रत्यक्षात करायला सुरुवात केली की त्यातले बारकावे समोर येतात आणि काहीवेळा संभ्रमाच्या स्वरूपात आपल्यासमोर उभे ठाकतात. 'पागोळी वाचवा अभियान' ची अंमलबजावणी सुरू करणारे काही लोक ह्याचा अनुभव सध्या घेत आहेत.

'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान

लेखक सुनिल प्रसादे यांनी मंगळवार, 30/07/2019 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे.

चांगुलपणा !

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/07/2019 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
‘इंटरनेट’मुळे एक बरं झालंय. एखादा संदर्भ, एखादी गोष्ट, सहज सापडत नसेल, तर ‘सर्च इंजिन’वर जायचं. मग लगेच त्या शब्दाचे सारे संदर्भ समोर येऊन उभे राहतात. थोडक्यात, ‘शोध सोपा झाला!’ हे माहीत असल्यामुळेच, हा लेख लिहिण्याआधी सहज एका सर्च इंजिनवर एक शब्द टाईप केला... ‘चांगुलपणा’! शेकडो रिझल्टस समोर आले. पण पाहिजे तो संदर्भ त्यातून शोधण्यासाठीही खूपच मेहनत करावी लागली. इतकी, की इंटरनेटच्या सर्च इंजिनवरूनही चांगुलपणा हरवत चालला आहे की काय, अशी शंका येऊ लागली. काही संदर्भ आढळले.

पाण्याची शेती कशी कराल ? पाणी पेरलंत, तरंच उगवेल !

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 24/07/2019 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
जलसंवर्धनासाठी पूरक असलेली आपली पारंपरिक शेती काळाच्या ओघात नष्ट होत असल्यामुळे आता आपल्या सर्वांवर प्रत्यक्ष *पाण्याचीच शेती* करण्याची वेळ आली आहे. 'पेरलंत तरंच उगवेल' हा पारंपरिक शेतीचा मंत्रच ह्या पाण्याच्या शेतीलादेखील लागू होतो. *"पाण्याची शेती"*, जी करण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही, ती करणे सर्वसामान्यांसाठी सोपे कसे होईल हे संगण्यासाठीच हे *"पागोळी वाचवा अभियान".* आम्ही लोकांपुढे ठेवलेल्या *"पागोळी वाचवा अभियानाला"* लोकांनी खूप सकारात्मक आणि कृतिशील प्रतिसाद दिला. दरम्यान लोकांच्या मनातल्या काही शंकादेखील समोर आल्या ज्यांचे समाधान होणे आवश्यक आहे.

आपल्यातलेच.... पण आदरणीय !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 24/07/2019 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. त्यातले काहीजण त्यांच्या कामात चांगले यश मिळवतात. त्यानुसार त्यांची दखल विविध माध्यमांतून घेतली जाते. गौरव, सत्कार, पुरस्कार अशा अनेक प्रकारे त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यामुळे या व्यक्तींना एक वलय प्राप्त होते. आता थोडे सामान्य पातळीवर येऊ. आपल्या रोजच्या पाहण्यातही काहीजण आपला कामधंदा सोडून अन्य क्षेत्रांत झोकून काम करत असतात. त्यातले काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अशा अनेकांचे कार्य खरोखर समाजोपयोगी असते.

बनपाव की करवंट्या.......?

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार

लेखक जालिम लोशन यांनी सोमवार, 22/07/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
उत्सव बालपणीचा मीरा फाटक माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत.

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 17/07/2019 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

पागोळी वाचवा अभियान

लेखक सुनिल प्रसादे यांनी मंगळवार, 16/07/2019 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
"जमीन पुनर्भरण केंद्र" - विडिओ - https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448 स्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712. दिनांक - 28 जून 2019 छपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू. खड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर. पाहूया कसे ते - संपूर्ण वर्षाऋतुमध्ये कोकणात पडणारा एकूण पाऊस - 350 सें. मी. त्या हिशोबाने 1500 चौ. फू.