Skip to main content

समाज

पुणे युनिर्व्हसिटी - अजब कारभार -सत्यघटना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/04/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
(पुणे युनिर्व्हसिटीच्या अजब कारभाराची खालील घटना माझ्या सोबत घडलेली सत्यघटना. वाचा.) माझ्या एका नातेवाईकाने पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे युनिर्व्हसिटी गेल्या जुन ०८ मध्ये सोडली. नातेवाईक नाशिक सोडुन दुसर्‍या गावी कॉलेजला निघुन गेला. जातांना त्याने पुणे युनिर्व्हसिटीतून मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी अर्ज करायला सांगीतला. नियमाप्रमाणे मी मायग्रेशन साठी अर्ज नाशिक विभागीय कार्यालयातुन रु. २०/- ला विकत घेतला. तो एक्सर्टनला (बहीस्थ) होता म्हणुन त्याला टी.सी. साठी सुद्धा अर्ज करावा लागेल असे विभागीय कार्यालयातुन कळाल्याने तो अर्ज रु. २०/- ला घेतला. (रेगुलर विद्यार्थ्यांचा टी.सी.

जय हो "आंतरराष्ट्रीय" अभिव्यक्ती-स्वातंत्र्य!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 13/04/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
'स्लमडॉग मिलेनियर' हा चित्रपट भारतीयांनी बघितला. त्याला ऑस्कर मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून. तसेच 'जय हो' या गाण्याला ही पुरस्कार मिळालेत. या चित्रपटाकडे एका दृष्टीकोनातून बघितल्यास असे वाटते की, यात भारतातील सत्य पण वाईट गोष्टी म्हणजे झोपडपट्टी, गरिबी, दंगे, बाल गुन्हेगारी असे प्रकार दाखवलेत. या पूर्वी लगान ऑस्कर मध्ये जावूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही कारण त्यात इंग्रज लोकांविरुद्ध आपण जिंकतो असे दाखवले आहे. लगान हा सगळ्याच बाबतीत 'स्लमडॉग मिलेनियर' पेक्षा सरस होता.

प्रवीण महाजनचा "माझा अल्बम'

लेखक अन्वय यांनी रविवार, 12/04/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रवीण महाजन याच्या पुस्तकातील अंश लोकसत्तात वाचायला मिळाले. वाचून धक्का बसला. ही वस्तुस्थिती असेल काय, अशी शंकाही आली. सत्य काय ते प्रमोद आणि प्रवीण महाजन यांनाच माहिती असेल. आता प्रमोद महाजन नाहीत; पण प्रवीण आहे. त्याने आपली कैफियत मांडली आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4391117.cms http://beta.esakal.com/2009/04/12113323/Home-Pravin-Mahajans-biograp.ht…

पुस्तक परिचयः कालगणना

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 11/04/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही.

कावड , टरबुज अन शक्ती !

लेखक पहाटवारा यांनी गुरुवार, 09/04/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही या नव्या घरी रहायला येउन २-३ आठवडेच झाले होते. काल संध्याकाळि घरि येताना गल्लीच्या तोंडाशी थोडि गजबज जाणवलि. तिथे एक मारुतिचे मंदिर आहे. एरवी एक पुजारि अन एक दोन वयस्क सोडले तर कुणी फारसे दिसले नव्हते. हिला विचारले, "आज कोणवार गं, बुधवार ना ?" "ह्म्म !" दिवसभराच्या ऑफिसच्या रगाड्यामुळे दमलेल्या आवाजात तिने ऊत्तर दिले. "मग बरोबर आहे. ऊद्या हनुमान जयंती ना ! त्याचीच गड्बड असेल." मी थोडेसे मनाशीच बोलल्यासारखे म्हणलो. "तुला काय माहित? कालनिर्णय तर सापडत नाहिये नविन घरात आल्यापासुन" "अगं, शुक्रवारिच तर रामनवमीची सुटि होती ना? मग रामनवमी पासुन सहा दिवसांनी हनुमान जयंती!

मिपाकर भगिनींना नम्र विनंती..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 08/04/2009 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती.. आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा. त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल.

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 08/04/2009 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.