कृष्ण
कृष्ण पाडवांच्या विंनती नूसार हस्तिनापूरला दुर्योधनासमोर पांडवांचा संधी प्रस्ताव घेऊ निघाले होते... त्यांच्या सारथी दारुक कृष्णाला विचार मग्न पाहून विचारतो की "महाराज, आपण दुखी आहात की आनंदी हे आपल्या चेह-याकडे पाहून मला समजले नाही कृपया आपण स्वतःच सांगा"
"सारथी दारुक!
तो बघ अस्ताला चालेला सुर्य !
प्रभात काळी तो विजेता असतो.. एकदम तेजस्वी...व जेव्हा अस्ताला चालेला असतो तेव्हा देखील तो अक्राळस्तेपणा न करता धीर गंभीर पणे.. शांत... रक्तमय लालीमा अंगावर खेळवत... आपला पराजय खुल्या मनाने स्वीकारत.... पुन्हा लढण्याची... उद्या उगवण्याची तयारी करत चाललेला असतो ! ह्याच पध्दतीने कधी मानव आपला पराभव स्वीकार खुल्या मनाने करु शकेल ?..... संधी वार्ता मी करण्यासाठी चाललो आहे पण त्या दुर्योधनाकडे अशी सुर्यासारखी तेजमय प्रतिभा नाही आहे.. ना आपला विजय व पराजय पचवण्याची ताकत ! काय होईल तेथे हे मला माहीत आहे पण समाज म्हणेल की मुरलीमनोहर ने अटळ युध्द टाळण्यासाठी एकदाही प्रयत्न केला नाही... हे लांच्छन मला नको आहे म्हणून मी तेथे जात आहे !
एक राजा, सम्राट... पुत्रप्रेमाने अंधळा होऊन.. लहान भावाच्या मुलांचे हक्क नाकारतो आहे.... एक पितामहा तो व्यक्तीशी नाही तर त्या हस्तिनापूर च्या सिहासनाशी प्रतिबध्द आहे... दुर्योधन, कर्ण व शकुनी आपल्या कपटी व धुर्त कार्यात मग्न आहेत व पांडवाना समुळ नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत... पांडव आपले राज्य मिळवणे व प्रतिष्ठा पुनः संपादीत करणे ह्याची तयारी करत आहे... द्रोपदीला झालेल्या अपमानाचा बदला हवा आहे... तर भिम आपल्या शक्तीचे प्रदर्शन करुन दुर्योधनाचा वध करुन द्रोपदीचा बद्ला पुर्ण करु इच्छीत आहे.. युध्द अटळ आहे .. कोण कोणाच्या बाजूने लढणार हे देखील स्पष्ट आहे... पण तरी ही एक निकराचा प्रयत्न म्हणून ही संधीवार्ता!
चल येथे थांबून आपण विश्राम घेऊ ! "
हस्तिनापूरचे सभागृहामध्ये दुर्योधनाने जशी शंका होती त्याच प्रमाणे पांडवाचा संधी प्रस्ताव नाकारला व उलट एक सुईच्या टोका येवढी सुध्दा जमीन देखील देणार नाही त्यांना जर राज्य हवे असेल तर त्यांनी दे युध्दभुमी वर जिंकावे असा सल्ला देखील दिला तेव्हा कृष्ण म्हणाले " पितामह, मी माझा प्रयत्न निकराने केला, पण हा बालक बुध्दी दुर्योधन व त्यांचे साथी मी काय सांगायचा प्रयत्न करत होतो तेच समजवून घेत नाही आहेत... विनाश हा विनाकारण केलेल्या हट्टामुळेच होतो.... युध्द लवकरच सुरु होईल व संपेल ही लवकर पण.. त्या युध्दानंतर ह्या राज्यात असे एक ही घर नसेल ज्या घरातून मृत्युचा प्रवेश झालेला नसेल... ! अजून ही वेळ आहे, तुम्ही हस्तक्षेप करा, समजवा दुर्योधनाला.. त्यांने केलेल्या प्रत्येक अपराधाला क्षमादान पांडव देत आहे... कोणाला माहीत नाही की ह्यांने पांडवांना मारण्यासाठी लहानपणा पासून नेहमी प्रयत्न केले.. छल करुन जुगारामध्ये हरवले.. राज्य हिसकावून घेतले.. त्यांच्या पत्नीचा भर सभेत अपमान केला.. त्यांना १३ वर्ष चा वनवास दिला तरी ही पांडव झाले गेलेले सर्व विसरुन ह्याला क्षमा देत आहेत हे तुम्ही ह्याला समजवा.. आजची रात्र मी येथे आहे उद्या सकाळी मी निघेन येथून पण ... अजून वेळ गेली नाही प्रयत्न करा ! "
सारथीने पाहीले की महाराजांच्या चेह-यावर अजूनही काहीच बदल घडलेला नव्हता... जसे येथे येताना स्मित हास्य ह्यांच्या चेह-यावर होते ...तसेच हास्य येथून परत जाताना ही आहे ?... येणारा काळ ह्यांना दिसत असावा.. हे विचार चक्र चालू असतानाच कृष्ण म्हणाले " सारथी दारुक, जेव्हा काळ येतो तेव्हा मानवाची बुध्दी भ्रष्ट होते.. असेच काहीतरी दुर्योधनाबरोबर देखील घडत आहे, त्याला कळत नाही आहे की काय करावे, मुर्खासारखा तो फक्त युध्दाचा जाप करत आहे.. जे होईल ते आपण फक्त पहात राहणे ईतकेच आपल्या हाती आहे. चल जलद चल पांडवाना हे कळवणे महत्वाचे आहे की युध्दाची वेळ आली आहे कौरव वंश समाप्त होण्याच्या मार्गावर आला आहे "
कृष्ण विश्राम घेत होते तेव्हा थोड्या वेळाने दुर्योधन त्याच्या डोक्याजवळ येऊन बसला व अर्जुन त्यांच्या पायाशी येऊन बसला .... जसे कृष्णाने डोळे उघडले तसे त्यांनी प्रथम अर्जुनाला पाहीले व विचारले " अर्जुन तु अधी आलास ? " तोच दुर्योधन म्हणाला " वासुदेव, प्रथम मी आलो आहे व तुमच्या कृपेचा प्रथम मानकरी मी असावयाला हवे " तेव्हा कृष्ण म्हणाले " ह्म्म, अरे अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे तेव्हा प्रथम तो मागेल व मग तुझी मागणी.. बोल अर्जून काय हवे... एका बाजूला मी आहे .. निशस्त्र.. व एका बाजूला माझी सहस्त्र लाख सेना.. बोल काय हवे ? " दुर्योघनाचा श्वास तेथेच अडकला तो विचार करु लागला.. अरे ह्या अर्जुनाने जर सेना मागितली तर ह्या कृष्णाला घेऊन मी काय करणार.. ना हा युध्दात लढणार ना.. मनाने माझ्या बाजूने रहणार... अरे रे हे काय झालं .... तोच अर्जुन म्हणाला "वासुदेव, मला तुम्हीच हवे... सेना नको ! " दुर्योधनाला आकाश ठेगंणे वाटू लागले... हा अर्जुन मुर्खच आहे... सहस्त्र लाख सेना सोडून ह्या निशस्त्र कृष्णाला मागितले... महामुर्ख ! दुर्योधन म्हणाला " देव, अर्जुनाने तुम्हाला मागीतले व राहीले.. सैन्य तेच द्या मला.. " व नमस्कार करुन हसत हसत दुर्योधन तेथून बाहेर पडला... कृष्ण म्हणाले.. " हे पार्थ, तु सेना का नाही मागितलीस.. मी तुझ्यासाठी निरुपयोगी आहे ! तुला माहीत आहे ना मी ह्या युध्दामध्ये शस्त्र देखील हाती घेणार नाही मग ? " तेव्हा अर्जुन म्हणाला " मुरलीमनोहर, ज्या बाजूला तुम्ही तेथे सत्य व जेथे सत्य तेथेच विजय ! ह्याच कारणामुळे मी तुम्हाला मागितले... "
वाचने
7854
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
छान
In reply to छान by परिकथेतील राजकुमार
पराशी
In reply to छान by परिकथेतील राजकुमार
कृष्ण हा
छान लिहिले
In reply to छान लिहिले by अवलिया
असेच बोल्तो !
In reply to असेच बोल्तो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो
अहो जाहो
आवडले
छान
In reply to छान by सहज
दुनियादार
खुप सुंदर
अप्रतिम
मजेत
.
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
आता
In reply to आता by दशानन
ओ राजे
In reply to ओ राजे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
लेख छोटे
थोडी दुरूस्ती
In reply to थोडी दुरूस्ती by प्राजु
धन्यवाद. यो
In reply to थोडी दुरूस्ती by प्राजु
आणखी दुरुस्ती!
In reply to आणखी दुरुस्ती! by संजय अभ्यंकर
संजय साहेब
हेच खरे!
छान..
वाह वाह
पितामह
मला सुरुवातीला वाटलं की...
कृष्ण!
कृष्णाच्य
अडीजोशी