Skip to main content

वादळवारा

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.

काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो

अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.

अचानक पुणे-३० कट्टा

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 16/04/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.

मागच्या काही दिवसांपासून पुण्यनगरीत मुक्काम आहे. पुण्यात आलो तसे मिपाकर मित्रांचे फोन यायला सुरूवात झाली.

"काय मग? कधी भेटताय?"
"पुण्यात आलास, कळवत पण नाही. बघून घेऊ आम्ही पण."
"या वेळी भेटायचंच बरं का, मागच्या वेळी टांग दिलीस."

एक ना दोन. मलापण भेटायचंच होतं मिपावरच्या काही महान, थोर इ.इ. व्यक्तिमत्वांना. काल थोडा वेळ मिळाला म्हणून जरा फोनाफोनी केली दुपारी. परा, दाढे डॉक्टर आणि श्रावण मोडक एवढे मासे गळाला लागले. म्हणलं, आधी पराला भेटू. तिथून डॉक्टरकडे जाऊ आणि मग मिष्टर मोडकांना भेटू. थोडका आणि आटोपशीर कार्यक्रम ठरवून निघालो.

राज ठाकरेंनी नाशिक मुक्कामी मराठी माणसांसाठी हाक मारली

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/04/2009 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंनी नाशिक मुक्कमी मराठी माणसांसाठी हाक मारली

raaj in nashik

नाशिक दि. १३ एप्रिल ०९ (मि.पा. विशेष प्रतिनिधी ) : तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी मनसे ला आपले मत द्या असे अवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केले.
मनसेच्या नाशकातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पवननगर - नाशिक येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्र सोडले.

पुणे युनिर्व्हसिटी - अजब कारभार -सत्यघटना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/04/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.

(पुणे युनिर्व्हसिटीच्या अजब कारभाराची खालील घटना माझ्या सोबत घडलेली सत्यघटना. वाचा.)

माझ्या एका नातेवाईकाने पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे युनिर्व्हसिटी गेल्या जुन ०८ मध्ये सोडली. नातेवाईक नाशिक सोडुन दुसर्‍या गावी कॉलेजला निघुन गेला. जातांना त्याने पुणे युनिर्व्हसिटीतून मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी अर्ज करायला सांगीतला.

जय हो "आंतरराष्ट्रीय" अभिव्यक्ती-स्वातंत्र्य!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 13/04/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.

'स्लमडॉग मिलेनियर' हा चित्रपट भारतीयांनी बघितला. त्याला ऑस्कर मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून. तसेच 'जय हो' या गाण्याला ही पुरस्कार मिळालेत.

या चित्रपटाकडे एका दृष्टीकोनातून बघितल्यास असे वाटते की, यात भारतातील सत्य पण वाईट गोष्टी म्हणजे झोपडपट्टी, गरिबी, दंगे, बाल गुन्हेगारी असे प्रकार दाखवलेत. या पूर्वी लगान ऑस्कर मध्ये जावूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही कारण त्यात इंग्रज लोकांविरुद्ध आपण जिंकतो असे दाखवले आहे. लगान हा सगळ्याच बाबतीत 'स्लमडॉग मिलेनियर' पेक्षा सरस होता. या चित्रपटामुळे भारतात फक्त गरिबी, घाण, गुन्हेगारी हेच फक्त आहे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे वगैरे.

प्रवीण महाजनचा "माझा अल्बम'

लेखक अन्वय यांनी रविवार, 12/04/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रवीण महाजन याच्या पुस्तकातील अंश लोकसत्तात वाचायला मिळाले. वाचून धक्का बसला. ही वस्तुस्थिती असेल काय, अशी शंकाही आली. सत्य काय ते प्रमोद आणि प्रवीण महाजन यांनाच माहिती असेल. आता प्रमोद महाजन नाहीत; पण प्रवीण आहे. त्याने आपली कैफियत मांडली आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4391117.cms
https://beta.esakal.com/2009/04/12113323/Home-Pravin-Mahajans-biograp.h…

पुस्तक परिचयः कालगणना

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 11/04/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.


पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.

पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही. विविध संस्कृतींनी निर्माण केलेल्या पंचांगांचा इतिहासही मनोरंजक आहे.

कावड , टरबुज अन शक्ती !

लेखक पहाटवारा यांनी गुरुवार, 09/04/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.

आम्ही या नव्या घरी रहायला येउन २-३ आठवडेच झाले होते.
काल संध्याकाळि घरि येताना गल्लीच्या तोंडाशी थोडि गजबज जाणवलि. तिथे एक मारुतिचे मंदिर आहे.
एरवी एक पुजारि अन एक दोन वयस्क सोडले तर कुणी फारसे दिसले नव्हते.
हिला विचारले, "आज कोणवार गं, बुधवार ना ?"
"ह्म्म !" दिवसभराच्या ऑफिसच्या रगाड्यामुळे दमलेल्या आवाजात तिने ऊत्तर दिले.
"मग बरोबर आहे. ऊद्या हनुमान जयंती ना ! त्याचीच गड्बड असेल." मी थोडेसे मनाशीच बोलल्यासारखे म्हणलो.
"तुला काय माहित? कालनिर्णय तर सापडत नाहिये नविन घरात आल्यापासुन"