फडफड फडफड फडकतो.....
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते.
थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा. म्हणजे एकाने 'अमुक अमुक देश / गाव कुठे आहे' असं विचारायचं आणि मग दुसर्याने ते शोधून काढायचं. मग झेंड्यांचा खेळ. तसाच. एखादा झेंडा दाखवायचा आणि हा कुठल्या देशाचा असं विचारायचं. तेव्हा पासून वेगवेगळ्या देशांचे झेंडे आणि त्यातली विविधता, प्रतीकात्मकता इत्यादी प्रकार खूप छान वाटायचे. मन त्यात रमून जायचं. ते देश कसे असतील, संस्कृती कशी असेल असले विचार मनात यायचे. त्यातूनच हळूहळू वाचत गेलो आणि संपूर्ण जगभरातल्या बर्याचशा झेंड्यांबद्दल छान छान माहिती मिळाली.
मला वाटतं जेव्हापासून मानव टोळ्यांमधे किंवा समूहांमधे रहायला लागला तेव्हा पासून 'आपले' आणि 'परके' ही कल्पना वास्तवात आली असावी. मग आपले कोण आणि परके कोण हे पटकन कळावं म्हणून काही खुणा, संकेत, वेश इत्यादी प्रकार सुरू झाले. त्या बरोबरच मग आपल्या समूहाचे एक प्रतीक म्हणून किंवा खूण म्हणून काही निशाणं किंवा नुसतीच रंगीत कापडं इत्यादींचा वापर झाला असावा. आपल्याकडे रामायण / महाभारतात पण ध्वजाची संकल्पना आहेच. प्रत्येक वीराच्या शंखाचे जसे वर्णन आहे तसे ध्वजांचे पण वर्णन आहे. अर्जुनाच्या रथावरच्या ध्वजावर साक्षात मारूतराय वास्तव्यास होते.
जसजशी मानवसमूहांमधे उन्नती होत गेली तसतशी या निशाणांबद्दलच्या मान्यता / कल्पना याही उन्नत होत गेल्या असाव्यात. एखाद्या जातीचा / देशाचा / टोळीचा झेंडा म्हणजे अगदी सर्वस्व, जीव की प्राण इथपर्यंत गाडी आली. ध्वजावरून एखाद्या सरदाराची ओळखच नाही तर दर्जा पण कळायचा. त्या त्या सरदाराच्या सैन्या करता तो झेंडा म्हणजे सर्वस्व झाला. युध्दांमधे निशाण सर्वात महत्वाचे असायचे. निशाण शत्रूच्या हाती पडणे म्हणजे नामुष्की किंवा सपशेल पराभवच. शरणागतीचा ध्वज पांढरा.
तर असा हा ध्वज किंवा बोलीभाषेत झेंडा. लहानपणापासून कुतूहल वाटत असलेला. थोडाफार छंदच लावलेला म्हणा ना... मला आवडलेल्या आणि / किंवा लक्षात राहिलेल्या झेंड्यांबद्दल, त्यांच्याशी निगडीत असलेल्या कथांबद्दल थोडंसं लिहिणार आहे...
हिंदवी स्वराज्य
सुरूवात करूया एका अशा ध्वजापासून जो मीच काय पण कोणताही मराठी माणूस कधीच विसरणार नाही. थोरल्या महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज. केशरी रंगच खरंतर खूप सुंदर दिसतो. हाती अक्षरश: काहीही नसताना एक नव्हे अनेक शत्रूंशी लढत उभारलेल्या सुंदर स्वराज्यासाठी याहून चपखल असा रंग तो काय असणार. आज भग्नावस्थेत असलेल्या गडकिल्ल्यांवर तो किती डौलाने फडकत असेल, कल्पनाच करावी आपण आता फक्त. भगव्याला त्रिवार मुजरा!!!
भारतीय प्रजासत्ताक
भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर पासूनच भारताचा झेंडा कसा असावा याबद्दल चर्चा चालू होती. माझ्या माहिती प्रमाणे मादाम कामा यांनी तयार केलेला ध्वज हा या दिशेने पहिला प्रयत्न होता. पण स्वातंत्र्यानंतर मात्र काँग्रेसच्या ध्वजाशी अतिशय साम्य असलेला तिरंगा आपला राष्ट्रिय ध्वज म्हणून घोषित झाला.
मला आठवतंय, आमच्या शाळेत आपल्या तिरंग्यातल्या रंगांबद्दल "केशरी हा त्यागाचं, पांढरा हा शांतीचं आणि हिरवा हा समृद्धीचं प्रतीक आहे. मधले निळे चक्र हे प्रगतीचं प्रतीक" असं लिहिलं होतं. मी एकदा आमच्या शेजारच्या संघिष्ट काकांना असं सांगितलं तर ते मला हसले आणि त्या झेंड्याचा धर्माधिष्ठीत असा नवीनच अर्थ सांगितला. काहीही असो, मला आपला हा तिरंगा खरंच आवडतो, डौलदार दिसतो बेटा. (अर्थात हा संस्काराचा भाग आहेच).
नेपाळ
आत्ता आत्ता पर्यंत जगातील एकमेव सार्वभौम हिंदू राजा असलेला हा देश. नुकताच एका प्रजासत्ताकात परिवर्तित झालेला. या झेंड्याची वैशिष्ट्यं म्हणजे जगातला एकमेव असा झेंडा जो त्रिकोणाकृती आहे. या झेंड्यावर नेपाळच्या चांद्रवंशिय राजघराण्याची चंद्रिका आणि त्यांचे अनेक शतके पेशवे असलेल्या सूर्यवंशिय राणा घराण्याचा सूर्य विराजमान आहेत. हेही एक वैशिष्ट्यच. या चंद्रसूर्याचा असाही अर्थ लावला जातो की सूर्य-चंद्र असे पर्यंत हे राष्ट्र राहिल.
ग्रेट ब्रिटन
दिडशे वर्षं आपल्या आजोबा पणजोबांनी वगैरे ज्या झेंड्याला सलामी दिली तो हा युनियन जॅक. हा दोन पूर्वापार हाडवैरी असलेल्या दोन देशांच्या झेंड्यांचा मिळून बनलेला आहे. लाल रंगाचा जो क्रॉस आहे तो इंग्लंडचा आणि त्याखाली असलेला तिरपा पांढरा स्कॉटलंडचा. या दोन्ही राज्यांना एकत्र केलं गेलं तेव्हापासून हा अस्तित्वात आला आणि त्याला युनियन जॅक हे नावही तेव्हापासूनच मिळालं. त्यातही परत पांढर्या क्रॉसच्या मधोमध एक लाल क्रॉस आहेच, तो आयर्लंडचं प्रतीक. बरेच बदल होत होत आता तो आजच्या रूपात आला आहे. एके काळी जगातील सर्वात जास्त भागावर हा मोठ्या डौलाने फडकला. याचं अगदी वेगळं असं वैशिष्ट्य म्हणजे हा असा एकच ध्वज आहे की तो मूळ देशा व्यतिरिक्त इतरही देशांच्या ध्वजामधे सामवालेला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांच्या ध्वजांवर युनियन जॅक आहेच!!!
अमेरिका (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका)
आजच्या घडीला जगातील सर्वात प्रबळ राष्ट्राचा हा झेंडा. केवळ झेंडाच नव्हे तर कोणत्याही टीशर्ट किंवा कपड्यांवर पण दिसणारा. यातले ५० तारे हे आज घटक असलेल्या ५० राज्यांचं प्रतीक तर एकूण १३ असलेल्या लाल पांढर्या पट्ट्या म्हणजे ज्या १३ मूळ वसाहती एकत्र आल्यामुळे हे राष्ट्र अस्तित्वात आले त्यांचे प्रतीक. आज जगात सर्वात जास्त द्वेष केला जाणारा ध्वज असं पण याचं वर्णन करू शकतो. याचं अजून एक वैशिष्ट्य.... पृथ्वीच्या बाहेर उभारला गेलेला पहिला झेंडा!!!
सोविएत रशिया
एक काळ खूप गाजवलाय बेट्याने. जगातल्या पहिल्या कम्युनिस्ट सत्तेचा मानबिंदू. क्रांतीच्या रक्तवर्णात नखशिखांत भिजलेला आणि शेतकरी कामकरी वर्गाची आयुधं कोयता हातोडा अंगावर अभिमानाने मिरवणारा. एके काळी जगातली किमान ३०-४० टक्के राष्ट्रं याच्या प्रभावाखाली होती.
सौदी अरेबिया
एखाद्या देशाने आपल्याला काय वाटतं, काय भूमिका आहे इ. गोष्टी आपल्याध्वजाद्वारे दाखवायचे याहून उत्तम उदाहरण दुसरे नाही. बहुतेक देश हे एखाद्या रंग, आकृती, चिह्न वगैरेंच्या सहाय्याने आपली भूमिका मांडतात. इथे मात्र सगळा रोखठोक कारभार. हिरवा जर्द रंग, वाळवंटातच खरं हिरव्या रंगाचं महत्व कळतं, तोच रंग धर्माचा होऊन बसला, त्यावर 'ला इलाहा इल्लल्ला मुहंमद रसूल अल्लाह' हे इस्लामचे घोषवाक्य (अरबी मधे त्याला 'शहादा' म्हणतात). आणि त्याखाली धर्मासाठी काय वाट्टेल ते करायची तयारी... तलवार. जणू काही ती तलवार ते वाक्य अधोरेखितच करते आहे. बास्स्स... प्रतीकं वगैरे भानगडच नाही. कोणाला शंकाच नको रहायला.
नाझी जर्मनी
जगातील आत्तापर्यंतचा सगळ्यात नृशंस नरसंहार ज्याच्या नावे झाला तो हा झेंडा. नाझींचा स्वस्तिक ध्वज. आपल्याकडच्या स्वस्तिकापेक्षा उलटे असलेले आणि ४५ अंशात गोल फिरवलेले. पहिल्यांदा बघितलेला 'नाझी भस्मासूराचा उदयास्त' या पुस्तकात. तेव्हा पासून लक्षात राहिलेला.
आणि आता मला ज्यामागची प्रतीकात्मता / कथा सगळ्यात जास्त आवडली आहे असा....
ऑस्ट्रिया
मध्ययुगीन ऑस्ट्रियामधे लिओपोल्ड नावाचा एक योद्धा सरदार होऊन गेला. एका अतिशय महत्वाच्या आणि भयानक युद्धात तो लढत होता. त्याचा पोशाख पांढरा होता. पण लढता लढता तो पूर्णपणे रक्तात न्हाऊन निघाला. त्याचा पोशाख लाल झाला रक्तामुळे. युद्ध संपल्यावर त्याने जेव्हा कंबरेचा शेला काढला तेव्हा त्या भागापुरताच पोशाख पांढरा होता, बाकी पूर्ण लाल. त्या वीराच्या सन्मानार्थ तेव्हापासून ऑस्ट्रियाचा झेंडा असा लाल, पांढरा, लाल. मी पहिल्यांदा ही कथा ऐकली तेव्हा अक्षरशः शहारा आला होता अंगावर. साला, झेंड्यामागे कथा वगैरे असावी तर अशी.
तर असे हे झेंडे....

वाचन
14704
प्रतिक्रिया
0