Skip to main content

मिपाकर भगिनींना नम्र विनंती..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 08/04/2009 23:54 या दिवशी प्रकाशित केले.

प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती..

आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा.

त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल. अजून चैत्र संपायचा आहे तोवर मिपावर चैत्रगौरींचं ह़ळदीकुंकू धुमधडाक्यात साजरे करीन म्हणतो!

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 08/04/2009 02:37 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.

नर्सरी

लेखक जागु यांनी बुधवार, 01/04/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.

कालच माझ्या मुलीचा नर्सरीतील निरोप समारंभाचा सोहळा पार पडला. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने नर्सरीच्या शिक्षकांनी मिळून मुलांचे काही नाच, कविता, गाणी बोलण्याचे कार्यक्रम ठेवले होते. नाच शिक्षकांनीच मुलांकडून बसवून घेतले होते. रितसर मुलांना खाऊ दिला. काही उत्सुक पालकांनी सगळ्या पालकांकडून पैसे जमा करून शाळे करीता भेट वस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या संचालक शिक्षिकेने आम्हा पालकांना काही मनोगत व्यक्त करायचे असेल तर करायला सांगितले. सगळ्या पालकांच्या वतिने मी बोलण्याचे ठरविले आणि फक्त त्यांचे आभार मानले.

आमने सामने

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 31/03/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.

(सदर लेख हा फक्त मौजमजा आणी मिपाकरांना थोडेसे हास्य क्षण द्यावेत म्हणुन लिहिला आहे. लेखात ज्या ज्या मिपाकरांची नावे आली आहेत त्या पैकी एकाचीही मी ह्या साठी परवानगी घेतलेली नाही. ह्या लेखा मागच्या भावना समजावुन घेउन तुम्ही मला माफ कराल असा मनात विश्वास (म्हणजे आपले पानिपत होणार नाही) आहे.

ह्या लेखात झालेल्या उल्लेखानी कोणी दुखावले गेल्यास मी त्याची आधीच जाहिर माफी मागत आहे. संपादक मंडळास ह्या लेखात काही अनुचीत वाटल्यास ते कुठल्याही क्षणी हा लेख येथुन उडवुन लावु शकतील.)
--------------------------------------------------------------------------------------------

वॉल स्ट्रीट वरील काही वर्षे!!

लेखक गोगोल यांनी मंगळवार, 31/03/2009 05:39 या दिवशी प्रकाशित केले.

खालील लेख जरूर वाचा. इंग्लीश मध्ये असला तरी आपल्या रामदसांसारखा सडेतोड लिहिला आहे.

https://www.printthis.clickability.com/pt/cpt?action=cpt&title=My+Manha…