Skip to main content

समाज

जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!

लेखक साऊ यांनी बुधवार, 20/03/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आता सांगायच म्हणजे फारा वर्षापुर्वीची गोष्ट. आता किती वर्षापुर्वीची म्हणता? तर बघा त्या सिद्दी जौहरनं ते वेढा घातला होता किनी पन्हाळ्याला तेंव्हाची. तेंव्हाची म्हणा किंवा त्या आधीचीही असेल, पण मला आपली वाटते; तेंव्हाची, म्हणुन तेंव्हाची!! तर तेंव्हा काय झाल तर सारा मुलुख लुटला गनिमांनी. बायाबापड्या बाटवल्या. मंदिरं तोडली. देवादिकांच्या मुर्ती फोडल्या. उभी पिकं कापुन न्हेली हत्ती घोड्यांना चारायला. जित्रापंच्या जित्रापं पळवली कापुन खायला. असा वणवा पसरावा तशी पसरली त्यांची फौज दख्खनावर. कुठं कुठं आसरा र्‍हायला नाही. माणसं सैरावैरा पळाली रानोमाळ. शिवाजी राजा सुद्धा संकटात पडला.

जॉली एल एल बी

लेखक जयवी यांनी मंगळवार, 19/03/2013 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी ह्या सिनेमाबद्दल बोलणं झालं आणि सिनेमा बघायचाच असं ठरलं. तसा आज सिनेमा बघूनही झाला. आवडला !! एक कलाकृती म्ह्णून सिनेमा आवडलाच ! कथानक काही वेगळं नव्हतं खरं तर. नेहेमीचेच गरीबांवरचे अत्याचार आणि कायदा आंधळा असल्याचा फायदा घेणारे धूर्त वकील आणि त्याविरुद्ध लढा देणारा नायक !! सोबत एक छान नायिका, साथ देणारे त्याचे मित्र आणि शेवटी त्याला मिळणारा विजय. अगदी नेहेमीच्याच वळणाने जाणारी स्टोरी. पण तरीही काहीतरी वेगळं होतं !! मला वाटतं, सिनेमा ज्या सहजतेने पुढे सरकत जातो त्यामुळे कथेत पुढे काय होणार हे आधीच समजत असूनही आपण पुढे काय होणार ह्याची वाट बघतो.

भीषण दुष्काळ...

लेखक निश यांनी सोमवार, 18/03/2013 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
गेलो होतो असाच एकदा कामासाठी ऐका गावी जिकडे तिकडे नुसतीच धुळ पाण्याविना करपली होती शेत, हिरवाई जरासुध्दा नाही. लागली होती तहान म्हणुन ठोठावले एक दार म्हटले, ताई द्याल का पाणी भागवावयास तहान ? ताई घरात वळली डोळ्यात तिच्या आसवांची दाटी. थोडसच पाणी घेऊन ती बाहेर आली. म्हणाली ऐव्हढच आहे पाणी, ठेवल होत लेकरासाठी, ते देते आहे तुम्हाला. तहानलेल्याला पाणी देण पुण्य मानतो आम्ही. ऐव्हढच पाणी का ते मात्र विचारु नका नदी कधीच आटली बघा जगण आता सोसवत नाही. सरकारी मदतीसाठी धनी गेले आहेत तालु़क्याला आमच्या वाटणीच पाणी दिल मंत्र्याच्या कारखान्याला. हे सांगताच ती माय धाय मोकलुन रडली पाण्यासाठी तिची वणवण म

राख आणि रक्षण ....

लेखक मन यांनी शनिवार, 16/03/2013 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
तो श्रीमंत होता. तसा त्या नगरातील तो एकटाच, एकमेव श्रीमंत वगैरे नव्हता. पण इतरांच्या, विशेषतः चोर,गुंड ह्यांच्या डोळ्यांवर यावी इतकी संपत्ती तरी नक्केच बाळगून होता. तसंही संपत्ती बाळगून असायला काय जातय? ती त्यानं कमावलेली नव्हतीच. पडली होती आपली पिढीजात त्याच्याकडं. कधी योगायोगानं, कधी मेहनतीनं तर कधी चक्क पालथे,निंद्य उद्योग करुन त्याच्या पूर्वजांनी ती कमावली होती म्हणे. श्रीमंतच तो. त्यातही जन्मजात पैशेवाला. त्याचे शौक काय कमी असणार ? एकदा त्याला आपल्याला झोपेत असताना सतत कुणीतरी संरक्षण पुरवावं असं वाटू लागलं. खर तर त्याला असं वाटावं हेच अलगद कुणीतरी योजलं होतं.

वाट

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 15/03/2013 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची वाट पाहायची तिला सवय झाली होती. नेहमी. येणं नक्की झालंय म्हणताम्हणता किती वेळा रद्दही व्हायचं. आणि मग तो आला की भरपूर गर्दी. ओळखीचे आणि अनोळखीही त्याला भेटायला यायचे. येणा-या गर्दीच्या डोळ्यांत अभिमान असायचा; चेह-यावर हसू असायचं; वातावरणात आनंद भरून जायचा. ते पाहताना ‘तो फक्त आपला नाही’ याचं दु:ख ती विसरून जायची. एक दिवस तार आली. तो गेला होता.

वाड्यातील भांडणे-भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 14/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.
काव्यरस

शाळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 12/03/2013 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥ कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥ नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी नुस्त्या फळ्याला चौकट लाकडी... मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥ शाळेत शिक्षक इकडे तिकडे, यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे! बि.ए.
काव्यरस

इमोशनल फुलांच्या देशा…

लेखक रामबाण यांनी सोमवार, 11/03/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत असं वाटतं. आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे. आपल्या भावनिक कोशंटचे किस्से असंख्य. 40- 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजधानीत राहिलेले बॉलिवूड स्टार्स कधीतरी कुठल्यातरी दबावाखाली एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात. एखादं वाक्य तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात. आमचे कान धन्य होतात. लगेच चर्चा अरे बच्चन मराठी बोलला, किंवा ती राणी मुखर्जी मराठीत बोलली.. अय्या!!! किंवा इंग्लंडची राणी मराठी बोलली, काय...

दुष्काळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 11/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस अडतो, माती काळी

कातर वेळी, रिक्त झोळी 

 

थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ

मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ

 

वितभर पोटास, पेरभर अन्न

मुठभर काळीज, सुन्न सुन्न

 

झकपक विज, शहरी वेग

गाव आंधळे, भुईला भेग

 

राऊळाशी रांग, लांबच लांब

विठू न राखे, त्याचाच आब

 

कां रे असे, जगणे विटाळ?

रात्र काळ, दिवस दुष्काळ! 

 

|- मिसळलेला काव्यप्रेमी -| 

(०५/०३/२०१३) 

काव्यरस

बलात्कार ... स्त्री ची कमजोरता की पुरुषाची लैगिकता

लेखक सप्पुभाई यांनी रविवार, 10/03/2013 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस विचार करत होतो, या विषयावर लिहावे की..नको... पण आजच्या वर्तमान पत्रात पुन्हा एकदा बातम्या वाचल्या... "जुहू मध्ये एका ३वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बस मध्ये बलात्कार" "नागपुर मध्ये दरडेखोरांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार"... आणि स्वताला रोखूच नाही शकलो.. रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच.... या वासनान्ध राक्षसांपासुन आपला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र देखील वाचू शकला नाही.... नुकताच दिल्लीतिल त्या काळ्या घटनेला एक महिना पूर्ण झाला... मेणबत्ती मोर्चा काढून किती आणि काय परिणाम होतो माला नाही माहीत...