Skip to main content

समाज

नामांतर

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 25/01/2013 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
n सर्व मिपाकरांना नमस्कार. सदर नोटीशीचा गंभीरपणे विचार व्हावा हि नम्र विनंती.

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व

लेखक शुचि यांनी मंगळवार, 22/01/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते? कारण चित्रपट, कादंबर्‍या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात? वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात.

आनंदसागर

लेखक श्रिया यांनी मंगळवार, 22/01/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे.तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात" आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य,आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!

काकबन

लेखक सोत्रि यांनी रविवार, 20/01/2013 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
एका काकबनात असंख्य कावळे नांदत होते. वेगवेगळ्या मतप्रवाहाचे थवे होते त्या काकबनात. पत्येक थवा आपापल्या मतप्रवाहांवर ठाम होता. त्या मतप्रवाहांमधली विवीधता त्या काकबनाचे वैषिठ्य होते. अनेक नविन कावळे त्या बनात येऊन आनंदाने विहार करायचे. बरेच कावळे त्या काकबनात असलेल्या थव्यांना बिचकूनही असायचे. कारण हे थवे कधी कधी झुंडीने काही वेगळेपणा दाखवणार्‍या कावळ्यांवर तुटून पडायचे. त्या काकबनाच्या इतिहासात असे बरेच वेगळे असणारे कावळे हार मानून काकबन कायमचे सोडून निघून गेले होते. त्यात त्या काकबनाचेच नुकसान झाले. पण हे त्या थवे करुन रहणार्‍या कावळ्यांच्या कधी लक्षात आलेच नाही.

नानाचा अग्रलेख.....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 20/01/2013 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
लैट्स.....!, कॅमेरा.......!!! अक्षन .....!!!!!! फाट्ट .......!!!!!!!! ......याच्या पुढे काय करायचं आणि काय पोपटायचं हे सगळं सांगितलेलं असतं. तोंड रंगविलेल्या बाहुल्यांनी जमेल तितकं पोपटायचं. फार मोठे संवाद नसतात. पाठांतर झेपायला नको ? दोन चार दोन चार वाक्यंच. तुकड्या तुकड्यांनी पोपटायचं. "....एक साला मच्छर आदमीको..हिजडा बना देता है......वेग्रे वेग्रे !! थोडेफार जे काही कपडे अंगावर चढविले असतील ते संभाळत डायरेक्टरने उठ म्हटलं की उठायचं. बस म्हटलं की बसायचं. रड म्हटलं की ग्लीसरीन ओतुन घ्यायचं आणि पड म्हटलं की दरी डोंगरात सुद्धा स्पंजच्या गादीवर अलगद पडायचं. हे कर, करायचं. ते कर करायचं.

देव - सनातन प्रश्न!

लेखक राघव यांनी शनिवार, 19/01/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
देव आहे अथवा नाही? सनातन प्रश्न. चावून चोथा झालेला विषय. त्यात ही आणखी एक भर. असो. प्रत्येकाची धारणा वेगळी. प्रत्येकाचे मत वेगळे. कोणाची बरोबर अन्‌ कोणाची चूक हे आपण कोण ठरवणार? हा अधिकार कोणाचा? त्यातही मी कोणावर विश्वास ठेवायचा? देवाचं अस्तित्व नाकारयचं म्हटलं तर मला आपसुक एक प्रश्न पडतो- संतांचं म्हणणं, वागणं, त्यांचे अनुभव, त्यांनी सांगीतलेलं मर्म; हे सर्व थोतांड होतं असं मी मान्य करू शकतो का? माझ्या ते पचनी पडतं का? कारण तसं नाही झालं तर आपल्याच मताशी अप्रामाणिक असल्यासारखं होईल. मी स्वत: तरी ते करू शकत नाही. कारण संतांवर मी अविश्वास दाखवायचं एकही संयुक्तिक कारण मला सापडत नाही.

पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 19/01/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त... आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल. अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय... ... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं.

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

लेखक मोदक यांनी शनिवार, 19/01/2013 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..

एपिक फॉल

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 19/01/2013 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
कालच ७ वेळा टुर द फ्रांसचा विजेता लॅन्स आर्मस्ट्राँग याने सुरुवातीपासुनच परफॉर्मन्स एन्हॅन्सिंग ड्र्ग्ज घेतले याची कबुली दिली. याआधी त्याने अगदी शपथेवर खोटं बोलुन झालेलं आहे. मुलाखतीत त्याने तो जे प्रकार करत होता त्याविषयी तेंव्हा आपलं काही चुकतंय वगैरे वाटत नसल्याचं सांगितलं. एक लिंक : http://www.youtube.com/watch?v=QTHSFRndS1s आता आमच्या डोक्यात एक किडा वळवळला की बहुतेक खेळाडु टिकुन रहायच्या आशेने असले कैतरी उद्योग करत असतात. क्रिकेट मधे मॅच फिक्सिंक होत होतं / आहे. पण क्रिकेटर्स डोपींग करत असतील का?