Skip to main content

समाज

प्रश्न !

लेखक मदनबाण यांनी रविवार, 24/02/2013 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
मेणबत्या पेटवणार्‍यांनो तुम्ही हातात मशाल कधी धरणार ? चिमुरड्यांवर होणारे बलात्कार अजुन किती काळ पाहणार ? स्फोटात लोक हल्ली रोजच मरतात,ती ब्रेकिंग न्युज असते आपण त्यात तसे मेलो नाही,यातच का आपण धन्यता मानणार ? भ्रष्टाचाराने संपुर्ण देश आपला गांजला असा राजकारण्यांच्या पंगतीत आता धुतला तांदुळ शोधणार कसा ? देशाच्या सिमेवर जवानांची क्रुरपणे मुंडकी छाटली जातात तरी सुद्धा आपण त्यांना फक्त इशारेच देत राहणार ? मंगळावर यान पाठवायचे म्हणुन मिशन आखणार पण गरिबाला घास देण्यासाठी प्रयत्न कधी करणार ? कोट्यावधींच्या देशात आता माणसाला नाही किंमत चार जण जसे जगातात तसे तुम्हीपण का जगणार ? जग

यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 22/02/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ... तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...

समवेदना

लेखक अनघा आपटे यांनी बुधवार, 20/02/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
"समवेदना" ते २००३ साल होते. एका अस्वस्थ काळातून मी जात होते. पहिल्यांदाच आयुष्यात मला कोणत्या तरी अशा आधाराची गरज वाटत होती, कि जी नुसतीच मला त्यातून बाहेर काढेल नव्हे तर माझे मनोबल टिकवून देखील ठेवेल. सर्वकाही कोणावर तरी सोपवावे आणि त्याने आपल्याला सावरावे असे कोणीतरी. त्या वेळी देवावर नेहमीपेक्षा जास्त (कारण मुळात मी सश्रद्ध आहे )विश्वास ठेवावा असे कुठेतरी वाटू लागले होते. आणि त्यानुसार मी, सोळा सोमवारचे उपास सुरु करून त्या भोळ्या सांबावर सारा माझा भार सोपवून निर्धास्त झाले. जसजसे दिवस सरत होते तसतसे माझे मनोबलही वाढत होते.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 19/02/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

माझी ऑफीसची डायरी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 17/02/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
५ जुन २०१० शनिवार १६:३० माझ्या केबीनमधे बसुन सोमवारच्या प्रेझेन्टेशनची तयारी करत होतो . नकळत समोरच्या काचेतुन बाहेर पाहिल तर नेहमी बर्‍यापैकी वर्दळ असणारार्‍या त्या ऑफीसच्या मध्यभागी असलेली ती शांतता , सुनसानपणा उगाचच मनाला टोचत होता . बाहेरच्या क्युबीकल वर रीमा ह्याच प्रे़झेन्टेशनची इतर तयारी करत होती . (तिला बघुन मला उगाचच माझ्या करीयरचे पहिले काही दिवस आठवतात ...तेच डेडीकेशन ... तशीच मोठ्ठी स्वप्ने .. त्यासाठी सतत प्रयत्न ....वगैरे वगैरे ) माझ्या कीबोर्ड ची खट्खट अन एसीची इतर वेळी कधीही न जाणवणारी घरघर सोडली तर बाकी सारी शुन्य शांतता होती . अचानक काहीतरी लाईटनिंग झाल्यासारखे वाटले...

आरक्षण

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
अनुसूचित जाती जमातींना शिक्षणात आरक्षण झालं, महिलांना सगळीकडे आरक्षण झालं, आता ठराविक जातींना बढतीत आरक्षण म्हणतायत; असं ऐकलं मी की आणखी काही मंडळी आपापल्यासाठी आरक्षणाचे प्रस्ताव मांडणार आहेत. जसं, जाड्या माणसांना सौंदर्यस्पर्धांमधे आरक्षण नाचता न येणा-यांना नृत्यस्पर्धेत आरक्षण गाता न येणा-यांना गायनस्पर्धांत आरक्षण टक्कल असणा-या लोकांना शॅम्पूच्या अ‍ॅड्स मधे आरक्षण दुचाकीधारकांना कार रेस मधे आरक्षण सॉफ्ट ड्रिंक पिणा-यांना बार मधे आरक्षण.... ...यादी खूप मोठी आहे.

चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 15/02/2013 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत. “आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात. “अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात. “अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय?

उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 14/02/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला. श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.

जोरात उठते कळ....

लेखक अधिराज यांनी बुधवार, 13/02/2013 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आतल्या आत ढवळतं आणि ज्जोरात उठते कळ पण तिच्या मते आजकाल मला लागलाय कवी चळ.. मग, ती समोर असली की करतो थोडी वळवळ आतली वेदना लपविण्यासाठी आणतो उसनं बळ.. पण, ती ही अशी चलाख गाठतेच माझ्या मनाचा तळ म्हणते, बस्स झालं तुझं नाटक नाहीतर मी काढीन इथून पळ.. माझे उर्मी दाबून ठेवण्याचे प्रयत्न होतात निष्फळ तिच्या ओरडण्याने भानावर येतो पण जखम वाहत राहते भळभळ.. अरे, कविता म्हणजे नसते प्रत्येकाच्या हातचा मळ उगाच लिहावसं वाटलं म्हणून सोडायचे शब्दांचे नळ.. काही कामधंदा करू नको नुसत्याच भावना दळ हा रोग जडलाय तुला पण होतोय माझा छळ.. पण मी आता कोडगा होतोय ऐकून सोडून देतो सरळ पुन्हा आतमध्ये ढवळलं की शब्दांचीच