Skip to main content

समाज

लहानपण देगा देवा....

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 03/05/2013 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. आणि या काळात सर्वात जास्त सुख मिळतं ते मे महिन्यातल्या किंवा दिवाळीतल्या सुट्टीत गावी गेल्यावर! त्यातल्या त्यात दिवाळीपेक्षा मे महिन्यात मिळणारी लांबलचक सुट्टी मिळाली म्हणजे आनंदाला उधान यायचं फार!! याचं कारण म्हणजे बहुतेक सगळी नातेवाईक मंडळी त्यांच्या कच्च्याबच्च्यांसह या काळात गावी आवर्जून यायची. वार्षिक परीक्षा संपलेली असायची आणि डोक्यावरचं एक मोठ्ठं ओझं आणि मनावचं एक अनामिक दडपण शतपटीने उतरलेलं असायचं.

सबलीकरण

लेखक आतिवास यांनी सोमवार, 29/04/2013 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते. मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत. मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत. मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही. मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही. माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही. मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत. मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही. मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच,

लग्नाला यायचं हं!

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 26/04/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी शेजारी राहणाऱ्या पाटीलकाकांचा फोन आला. “अरे मुलीचे लग्न ठरलेय रे. तू पत्रिका छापतोस ना?” “काका कामाचा ताण आहे हो खूप, वेळ लागेल.” “ते लोकांना सांग रे. मला नको. उद्या मजकूर ऑफिसात आणून देतो. दोन दिवसात छापून दे लगेच.” एकतर प्रिंटिंगचे कुठलेच काम टाळू वाटत नाही त्यात हे काम जवळ जवळ घरचे असल्यासारखेच, मी हो म्हणून टाकतो. दुसरे दिवशी काका दोन फुलस्केप कागदावर लिहिलेला मजकूर घेऊन हजर होतात. आतापर्यंत तीनचारशे पत्रिका टायपून सराईत झालेला डीटीपी आपरेटर भराभरा कीबोर्ड बडवत काकांनाच सल्ले देऊ लागतो. “जावयांचे नांव कार्यवाहात टाका हो.

अंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल

लेखक साळसकर यांनी रविवार, 21/04/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंड्याने तिसर्‍यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्‍यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा.

हसू

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 19/04/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत पावणे आलते. कशाला कायकी. आमाला कायबाय इचारलं. धडा वाचाया लावला, पाडे इचारले. अंक्या, भान्या, निमी हुशार हायेत बक्कळ. त्यास्नी समदं येतं. माज्या टकु-यात शिरतं, -हात नाय. आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”. गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं! मला विचारलं कायतरी पावण्यानी. भ्याव वाटलं येकदम. कांडल्यावानी झालं छातीत. ठोके नुस्ते. धाडधाड धाडधाड. आवाज खोल हिरीतून आला. पावणे हसले. गुर्जीबी हसले. समदी हसली. म्याबी हसली. पावणे गेले. गुर्जी आले. माजे केस वढत एक ठिउन दिली गालावर. दातच तुटला येक. रडत म्या चिराकले, “काSओ गुर्जी” “बक्षीSस” ते म्हणले.

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग तीन

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 18/04/2013 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग एक ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग दोन  स्फोटा नंतर अतिशय गोंधळाची परीस्थिती होती. अग्निशमनचे सर्व बंब, जवळपास सर्व यंत्रसामुग्री नष्ट झाली होती. त्याचवेळेस या स्फोटामुळे गोदीत, समुद्रात जहाजांवर, आजूबाजूच्या घरांना, झोपडपट्टीला सर्वत्र आगीने थैमान चालू होते.

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 18/04/2013 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 14/04/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वतंत्र भारताला वेगळे वळण देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. लाखो लोक या लोकोत्तर नेत्याला दैवत मानतात. या महापुरुषाला नम्र अभिवादन. गांधीजी नंतर आपल्या इतिहासावर एवढा परिणाम करणारा नेता अजुन दुसरा कुठला नसेल. या महापुरुषाला माझी आदरांजली

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग दोन

लेखक लाल टोपी यांनी रविवार, 14/04/2013 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
फोर्ट स्टिकिन १२ एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास मुंबईला पोहोचली. मुंबई बंदराच्या जवळच या जहाजाने नांगर टाकला. सकाळी दहाच्या सुमारास या जहाजाला व्हिक्टोरीया बंदरापर्यंत घेऊन जाणारी बोट आली. यावेळी मुंबई बंदरावरील कोणालाही या बोटीत असणा-या धोकादायक अणि संहारक सामुग्री बाबत काहीही कल्पना नव्हती कारण विस्फोटक सामुग्री असणा-या जहाजांना लाल रंगाचा झेंडा बोटीवर फडकवणे आवश्यक असते त्यामुळे आजुबाजूच्या सर्वांनाच जहाजात धोकादायक माल आहे हे समजते मात्र युध्द काळात असा लाल बावटा फडकवत प्रवास करणे म्हणजे शत्रूला हल्ल्यासाठी आमंत्रण देण्यासारखे ठरले असते म्हणुन त्याकाळात ही अट शिथिल करण्यात आली होती.

अनसंग हीरो

लेखक पिंपातला उंदीर यांनी शनिवार, 13/04/2013 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली.