Skip to main content

आली सुमधूर संमोहक दिवाळी

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 02/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी... दूर करून अंधार कृष्णछायेच्या कपाळी ! आशा घेऊन अश्विन सुमंगल सकाळी !! घेऊनी सोनप्रकाश ओजस्वी आश्वासक ओंजळी ! लख्ख करण्यास अनंत आकाशगंगेच्या ओळी !! ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी... समग्र संकट समूळ सारीत ! सर्वसमावेशक सण सोहळा सुशोभित !! अंधार होऊनी निसंशय पराजित ! प्रकाश येऊनी मनात विराजीत !!
लेखनविषय:

वाचने 680
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया