शिक्षकांची आठवण!!
नुकताच शाळेचा ब्लॉग वाचला... आणि एकदम शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. मित्र-मैत्रीण आठवले, मैदान आठवलं, आपण केलेली मस्तीही आठवली. पण प्रकर्षाने आठवण आली, ती शिक्षकांची... आपल्या आवडत्या, चांगल्या शिक्षकांची आणि काही विनोदी शिक्षकांची सुद्धा.
आम्हाला पहिली ते चौथी पराडकर बाई वर्गशिक्षिका होत्या. आमच्या वर्गाला चित्रकला सोडून बाकी सगळे विषय त्याच शिकवायच्या. सगळ्यात कमी गृहपाठ देणा-या आणि सगळ्यात कमी मारणा-या या आमच्या लाडक्या बाई होत्या. चित्रकलेला इंदुलकर बाई होत्या. ब वर्गाला मोर्जे बाई होत्या. त्यांच्या हातात कायम पट्टी असायची.
मिसळपाव