आईना - ए -गजल लेखक डॉक्टर विनय वाईकर/ डॉक्टर जरीना सानी
लेखनप्रकार
गजल ऐकताना काहीवेळा एखादा उर्दू शब्द कानी पडतो, त्याचा अर्थ न समजल्यामुळे तो शेर मनाला भिडत नाही. "डॉक्टर जरीना सानी आणि डॉक्टर विनय वाईकर" यांनी लिहिलेले "आईना -ए -गजल" हे पुस्तक हाताशी असेल तर हा रसभंग टाळता येतो. या पुस्तकात ८५०० पेक्षा जास्त शब्द आणि ५५०० पेक्षा जास्त शेर अर्थासह दिले आहेत. अर्थ मराठी आणि इंग्रजी भाषेत दिले आहेत.
शेर निवडताना लेखक द्वयींनी अभ्यास पूर्ण निवड केली आहे. गजल ऐकताना आपल्याला जो शब्द समजत नाही तो शब्द शोधताना त्या शब्दा खाली नेमका आपण ऐकत असलेला शेर सापडतो असे बरच वेळा घडते.
उदा. गुलाम आली यांची प्रसिद्ध गजल चुपके चुपके या गजल मधील एक शेर
"तुझको जब तन्हा कभी पाना तो "अजराहे लिहाज"
हाले दिल बातोही बातो में जताना याद है ||
हा शेर ऐकताना जर "अजराहे लिहाज" हा शब्द तुम्हाला अडला तर नेमका हाच शेर त्याच्या अर्थासह सापडतो
अजराहे लिहाज = शर्म कि खातीर, लाजेखातर , with due respect and modesty
असे हिंदी, मराठी आणि इंग्रजी मध्ये अर्थ मिळतात.
पुस्तक प्रथम १९८३ ला प्रकाशित झाले. दुर्दैवाने पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वीच डॉक्टर जरीना सानी निर्वतल्या, परंतु त्यांचे पती अब्द्दुल सानी आणि डॉक्टर विनय वाईकर यांनी पुस्तक पूर्ण केले. १९९६ ला या पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली. त्या नंतर काही आवृत्ती निघाली असल्यास माहिती नाही
डॉक्टर विनय वाईकर हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते.
या पुस्तकानंतर त्यांनी "गजल दर्पण" आणि गालिब च्या गजलांवर आणखी एक पुस्तक लिहिले आहे.
M B B S झाल्यावर १० वर्षे आर्मीत नोकरी केली १९६२,१९६५,१९७१ हि तिन्ही युद्धे त्यांनी जवळून अनुभवली या अनुभवांवर आधारित तांचे "रक्तरंग आणि फौजी" हे दोन कथासंग्रह सुद्धा वाचनीय आहेत. उर्दू ,मराठी ,हिंदी, इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आर्मीतील १० वर्षाच्या सेवे नंतर त्यांनी नागपूर मध्ये भूल तज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवली. तरीही त्यांची खरी ओळख 'आईना -ए -गजल मुळेच रसिकांना जास्त आहे. हा ग्रंथ गजल अभ्यासकांना संदभ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.
या व्यतिरिक्त त्यांनी वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लेखन हि केल आहे. "उर्दू गजल एक परीचय" या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली होती. या वर्ष्याच्या सुरवातीस ०२ जानेवारी ला ते स्वर्गवासी झाले.
वाचने
2880
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
उत्तम ओळख
मिपा वरचाच एक सुन्दर धागा
खरच खूप सुंदर आहे पुस्तक
गजलचे आणि माझे कधी जमलेच नाही...
अतिशय उत्तम पुस्तक
In reply to अतिशय उत्तम पुस्तक by मैत्र
पण मिळाले नाही नंतर..
अरे वा! धन्यवाद ह्या
मस्त आठवण!
देवनागरीत गझल
मिर्झा गालिबचे गझल आणि शेर
फारसी मराठी शब्दकोश