Skip to main content

साहित्यिक

प्रकाशन सोहळा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 16/01/2013 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नमस्कार, माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 14/01/2013 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

चावडीवरच्या गप्पा – रेडी रेकनर

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 03/01/2013 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “नाहीतर काय?

मालवण नगरवाचन मंदीर वाचक स्पर्धा

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 02/01/2013 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
विषय: श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबर्‍या बुधवार दिनांक २६-१२-२०१२. स्थळ: मालवण नगरवाचन मंदीर. मालवण नगरवाचन मंदीर प्रथम ग्रंथपाल श्री. संजय शिंदे यांनी प्रास्ताविकात ग्रंथालयाची ओळख करून दिली. श्री. संजय शिंदे त्यांचे भाषण नीटनेटके आणि छोटेसे आणि त्यामुळे हवेहवेसे वाटणारे होते.

चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 11/12/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत. “आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण

पांडुरंग पांडुरंग

लेखक कौस्तुभ आपटे यांनी रविवार, 09/12/2012 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे...
काव्यरस

गजरा - एक प्रवास

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 06/12/2012 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ऐसीअक्षरे ह्या मराठी संस्थळाच्या दिवाळी अंक 2012 मध्ये पूर्वप्रकाशित) लहान असताना टी.व्ही. ही एक ठराविक वेळी पाहण्याची आणि चॅनल्सचा रतीब न घालणारी एक करमणूकीची सोय होती. त्यावेळी दूरदर्शनवर 'गजरा' नावाचा एक कार्यक्रम यायचा. त्या कार्यक्रमामुळे मला गजरा हा शब्द, तो खराखुरा फुलांचा गजरा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायच्या आधी कळला. त्या कार्यक्रमात सुरुवातीला कॅलिडोस्कोपमधून दिसते तशी वेगवेगळ्या आकारांची हालणारी नक्षी दिसायची. त्यामुळे गजरा ही एक रंगीबेरंगी वस्तू असावी असेच मला वाटायचे.

चावडीवरच्या गप्पा - स्मारक

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 29/11/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “काय मंडळी, कशी काय झाली दिवाळी?”, भुजबळकाका, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत. “ठीक ठाक! महागाईने त्रस्त असलेल्या लोअर मिडलक्लासला परवडेल अशीच झाली.”, नारुतात्या उसने हसू चेहेर्‍यावर आणत. “हो, पण बाळासाहेबांच्या जाण्याने दिवाळीचा आनंद झाकोळला मात्र गेला.

जो आवडे सर्वांना तोचि,

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 27/11/2012 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
देव बोलतो बाल मुखातून' कोणा एका गीतकाराच्या गीतातील वाक्य, याची प्रचीती मला आली ती आमची 'ननु' म्हणजे चुलत भावाची मुलगी बोलायला लागल्यानंतर. तिचे बोबडे बोल, खुदकन गालावर खळी पडून हसणे. तिचे चिमुकले हात ती गळ्यात टाकून मान डोलवत बोलणे सगळेच लाजवाब होते. दिवसभर कितीही काम केले कितीही थकलो तरी ननुच्या नुसत्या जवळ येण्यानेच सारा थकवा दूर व्हायचा. वाड्यातील सर्वच जणांना तिने जणू भुरळ घातली होती. तिच्याबरोबर बोलताना बहुतेक जन आपापली बोबडे बोलण्याची हौस भागवून घ्यायचा. बाकीचे इतर सख्खे , सख्खे चुलत भाऊ देखील स्वताच्या मुलांना कपडे आणताना ननुला देखील कपडे घ्यायचे .

फसवणूक..

लेखक वेणू यांनी शनिवार, 24/11/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही... मग त्याला हवं तसं घडवण्यात वर्षे लोटतात... आता तुम्ही प्रिय असता, कारण तुम्ही जगासारखे असता... मग कधी निवांत क्षणांत, तुमचं खरं रूप हळूच बाहेर येतं, शेजारी येऊन बसतं... ते लाडकं असतं- फक्त तुम्हाला! त्याची आर्त नजर तुम्हाला छेदून जाते.. थोडीशी खूडबूड झाली, की त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार... पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही... (स्फूटंलेखन) -वेणू