Skip to main content

राजकारण

ताज्या घडामोडी : भाग ५

लेखक गॅरी ट्रुमन यांनी मंगळवार, 11/04/2017 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे. दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता.

भान सुटलेल्या निवेदीतांच्या निवेदनातील (निसटत्या) बाजू

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 07/03/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
देश कसा एकत्र राहील त्या एवजी देश इतिहासात एक कसा नव्हता यावर फोकस करणारी जी काही प्राध्यापक मंडळी गेल्या काही दशकात दिल्लीत एकत्रित जमून त्यांचे तत्वज्ञान गल्ली पर्यंत पोहोचावे असा त्यांचा जोरकस प्रयत्न चालू आहे आणि उथळ माध्यमांची साथ पाहता ते होण्यास खूप कालावधी लागेल असे नव्हे. असो अशा देश विभाजनावर फोकस असलेल्या दिल्लीतील प्राध्यापक मंडळीतील एक नाव म्हणजे निवेदीता मेनन या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील एक प्राध्यापक आहेत.

पंजाब, गोवा, उत्तराखंड विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणीपूर्व धागा

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 05/03/2017 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मतमोजणीपूर्व या दुसर्‍या धाग्यात पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांविषयी भाष्य करणार आहे. याबरोबरच मणीपूर या पूर्वोत्तर भारतातील राज्यातही विधानसभा निवडणुक होत आहे. पण या राज्याच्या राजकारणाविषयी भाष्य करण्याइतकी माहिती मला नाही. त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाचे हे पण मला माहित नाही. कधीकधी आपण पूर्वोत्तर भारतात फार रस घेत नाही आणि त्यातूनच त्या भागातील लोक दुरावले जातात. कळत नकळत माझ्यासारख्याकडूनही तेच होते आणि त्याचे वाईटही वाटते. प्रत्येक वेळी ठरवितो की यापुढे असे करायचे नाही-- इतर सगळ्या राज्यांप्रमाणे उत्तरपूर्वेतील या राज्यांचीही माहिती घ्यायची.

अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 12/02/2017 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
(संदर्भ ग्रथ- अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे, छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर, महात्मा गांधी- धनंजय कीर, अब्राहम लिंकन- फाळणी टाळणारा महापुरुष- वि. ग. कानिटकर, अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन ) कोणतीही लोकशाही शासनव्यवस्था ज्या लोकांचे ती प्रतिनिधित्व करते. त्यांच्या विकासासाठी, त्यांना विकासासाठी समान संधी आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तत्वत: तरी बांधील असते . पण त्याच बरोबर ज्या देशात ती आहे त्या देशाचे सार्वभौमत्व, अखंडत्व ह्याला हि तितकीच किंवा कांकणभर अधिकच बांधील असते.

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

लेखक धर्मराजमुटके यांनी शुक्रवार, 27/01/2017 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.

नोटबंदीचे अभंग

लेखक भारी समर्थ यांनी शुक्रवार, 30/12/2016 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।। कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी। निकडीची रोकड मग। निघतीया।। रांगेत बहु जन। स्वतःचेच धन। घामेजलेले तन। ताटकळ्या।। ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच। शिव्या कचाकच। निघतीया।। ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी। तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।। एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का। 'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।। सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास। काय ३१ डिसेंबरास। करतोया??? - भारी समर्थ!

पुरोगामी - प्रतिगामी

लेखक संदीप ताम्हनकर यांनी रविवार, 11/12/2016 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुरोगामी - प्रतिगामी मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले. पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात.

"कॅश-लेस" आणि "लेस-कॅश" मधिल संभ्रम : खरोखरचा की बनवलेला ???

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 08/12/2016 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
सद्या "कॅश-लेस अर्थव्यवस्था = १००% कॅश-लेस ट्रन्झॅक्शन्स" हे चुकीचे समीकरण सिद्ध करण्यासाठी तथाकथित विचारवंत राजकारणी आणि अर्थतज्ज्ञांमध्ये अहमहमिका चालली आहे. ती इतक्या अतीरेकी स्तरापर्यंत ताणली जात आहे की, त्यामागे असलेला, शाब्दीक विपर्यास करून सामान्य जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जास्त जास्त उघड होत चालला आहे. नकद व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार करण्याला वाव असतो आणि नकद न वापरता केलेल्या व्यवहारांत भ्रष्टाचार करणे फार कठीण असते.

बलुची लोक व बलुचिस्तान : एक संक्षिप्त आढावा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 28/11/2016 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केल्यानंतर त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, जगभरच्या लोकांत, बलुचीस्तानबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षा अनेक पटींनी अज्ञान आहे. तेव्हा माझे अल्पज्ञान इथे मिपाकरांबरोबर वाटून घ्यावे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. असो. स्वानुभव १९८२ ते १९९६ या कालखंडात मी माझ्या एका परदेशी नोकरीत अनेक सामान्य व अधिकारी बलुची लोकांबरोबर १४ वर्षे रोजचे काम केले आहे. सर्वसाधारण बलुची मित्रत्वाचा व्यवहार करणारा, शिस्तप्रिय, कामाला वाघ व विश्वास बसला की जीवाला जीव देणारा असलेला पाहिला आहे.

नगरपालिका निवडणुका २०१६.

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 27/11/2016 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सध्या नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान चालू आहे.२०१४ साली झालेले सत्तांतर ,त्यात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेलेला जनाधार.अच्छे दिनची दाखवलेली स्वप्ने ,या पार्श्वभुमीवर या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या निवडणुका १६४ ठीकाणी होत आहेत ,या निवडणुकांचे निकाल लगेच उद्या लागणार आहेत ,त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.जे मतदार आहेत त्यांनी जरुर आपला मतदानाचा हक्क बजवावा.धन्यवाद.