Skip to main content

राजकारण

आर आर पाटील

लेखक विकास यांनी सोमवार, 16/02/2015 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
R R Patil महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर अर्थात आबा पाटील यांचे आज निधन झाले. वाचल्याप्रमाणे, गेले तीन महीने ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी केल्या गेल्या, करण्याचा प्रयत्न झाला. त्यात सुरवातीच्या काळातील संत गाडगेमहाराज अभियान असोत अथवा नक्षलवादग्रस्त भागात अनेक चांगली कामे तयार करून विश्वास संपादन करणे असोत अथवा डान्सबारबालांवरील बंदी असोत... काही वेळेस ते जनतेच्या टिकेचे धनी देखील झाले, विशेष करून २६/११ च्या हल्ल्यानंतरचे त्यांचे एक(च) पण अनाठायी वक्तव्य...

कर्त्याचे उत्तरदायित्व

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 05/02/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान महोदय, सादर प्रणाम, (हे पत्र २०१२ साली, तत्कालीन पंतप्रधान श्री.मनमोहनसिंग ह्यांना उद्देशून लिहिलेले असले तरी आजही ते संदर्भहीन झाले आहे असे नाही. वाचून सांगा की, याबाबत आपण काय म्हणता?) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज पासष्ट वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी अजूनही, भारतात कर्त्यास त्याचे उचित उत्तरदायित्व सुपूर्त करण्यात आलेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी हे का म्हणत आहे ते आधी स्पष्ट करतो. भारतातील सर्वात प्रमुख व्यवसाय शेतीचा आहे असे मानले जाते. सरकार नागरिकांकडून कर प्राप्त करून त्याचे बळावर शासन-व्यवहार चालवत असते. थेट कराचा मुख्य हिस्सा प्राप्ती कर समजला जातो.

देश कसा बुडवावा

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 02/02/2015 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
देश कसा बुडवावा, तुला ऐकायचं होतं ना ऐक, फार काही करावं लागत नाही मित्रा देशनिंदा अतिशय सोपी गोष्ट आहे देशभक्ती आचरटपणा आ़णि द्रोह करणं फ्याशन आहे तत्परतेने शत्रूची बोट उडवली रे उडवली की सैन्यदलांना नावे ठेव जाब विचार, साधे स्मगलर हो ते दहशतवादी नाहीच्चेत मुळी, अशी कशी उडवली? बघ, देश बुडतो की नाही आपल्याच देशात आपल्याच घरातून हाकललेल्या मारलेल्या, बलात्कारलेल्या, विस्थापित काश्मीरी पंडितांची व्यथा दाबून टाक, दुर्लक्ष कर, मग जोरात कांगावा करुन विचार, काय घंट्याचा त्रास होतो आहे त्यांना? बघ, देश बुडतो की नाही एकदा कुणीतरी सिनेमा काढेल देवळात जाणार्यांना मूर्खात काढेल पण तू मात्र त्याचा उदो

स्वच्छ भारत अभियान की पब्लिसीटी स्टंट ??

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 23/01/2015 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे. मा.

(सोबती)

लेखक स्वप्नज यांनी गुरुवार, 22/01/2015 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- www.misalpav.com/node/30059 मुळ कवीयित्रीची क्षमा मागून तसेच 'तांब्या' संप्रदायाच्या मठाधिपती, महागुरु, सर्व सेवक व भक्त यांना वंदन करुन हे विडंबन सादर करत आहे. जेवणाला मिळतील सोबती खूप सोडायला तुम्ही एकटेच असता कितीही जवळचं वाटलं कोणी शेवटी लांबूनच पाहणारे निघतात ज्याचं त्याला लागतं कुंथावं प्राक्तनात असलेलं चुकत नसतं कुणी किती जरी खाल्ला मऊ घास दैवात कुंथणे टळत नसतं हेच जर आहे चिरंतन सत्य नुसतं कुंथून भागणार नसतं रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत कुंथणं योग्य असत समर्पण- 'तांब्या' संप्रदायातील सर्वांनाच 'त्या' गोष्टीसाठी तांब्या परव

" युवकाच्या देशात युवकांच्या समस्या "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
" ये देश युवाओका है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देशम्हटल तर तेउचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ?या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 15/01/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

माझेच (म्हणणे) खरे

लेखक नाखु यांनी सोमवार, 05/01/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल) वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको. नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-| वि.सू.

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 19/12/2014 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही.