Skip to main content

राजकारण

शरद पवारांची महामुलाखत

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी रविवार, 25/02/2018 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच राज ठाकरे ह्यांनी शरद पवारांची २/२.५ तासाची प्रदीर्घ मुलाखत घेतली. पुण्याच्या बी.एम.सी.सी. जेथे पवारांनी शिक्षण घेतले तेथे ही मुलाखत झाली. मिडियातर्फे ही 'महामुलाखत' म्हणून जाहिरात करण्यात येत होती. प्रश्न गोपनीय आहेत असे रा़ज ठाकरे म्हणाले.पवारांना राजकारणाचा राज्य्,राष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ अनुभव असल्याने काहीतरी वेगळे ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती.

ममता दीदींचा RSS शाळांवरील हल्ला

लेखक साहना यांनी गुरुवार, 22/02/2018 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
ममता बॅनर्जी ह्यांनी बंगाल मधील १२५ शाळा रास्वस शी संबंधित आहेत म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१२ पासून ह्या शाळांनी सरकारकडे NOC ची मागणी केली होती जी आज पर्यंत त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळे ह्या शाळा बेकायदेशीर ठरवून बंद करण्याचा ममता ह्यांचा निर्णय कायदेशीर आहे. ह्यातील बहुतेक शाळा मागील २०-३० वर्षां पासून चालू आहेत पण २०१२ मध्ये बंगाल सरकारने प्रत्येक बिगर-अल्पसंख्यांक शाळांना NOC घेणे बंधनकारक केले होते. (अश्या प्रकारचे कायदे सर्वच राज्यांनी RTE नंतर केले आहेत.

ग्राम"पंचायत" लागली..!! - 10

लेखक विशुमित यांनी शनिवार, 27/01/2018 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/41800 मन्या चिंगाट घराकडे सुटला. काही तासच उरले होते. त्याची अस्मिता सकाळी सकाळी पदवीची शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या माहेराला जाणार होती. ती परत दीड महिन्यांनीच येणार होती. मोठा ग्याप पडणार होता. पदवीचा विषय आहे भूगोल. भूगोलसाठी दीड महिना? मी तर आयुष्यात (म्हणजे शाळेत, १० वी पर्यंत) २ तासाच्या वर कधीच अभ्यास केला नाही भोगल्याचा. मला हर्षा भोगले आवडायचा पण भूगोल... ह्या. ती भूगोल घेऊन पुढे काय करणार आहे तो मन्याचं जाणे.

आनंद नगर

लेखक शब्दानुज यांनी सोमवार, 08/01/2018 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा दुर्दैवाने काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा वास्तवाशी बराच संबंध आहे. तो लागल्यास निव्वळ योगायोग समजू नये. आनंदनगरात क्रिकेटची मॅच रंगात आली होती. गणेश ,सुर्याजी विरुद्ध अहमद , सिद्धार्थ असे गट पडले होते. अहमदची विकेट आधीच पडली होती. बॅटिंग करायला सिद्दार्थ उभा होता. या पठ्याला बॅटिंग जमायचीच नाही. या चौघात तो लहान होता. जी अवजड बॅट त्याला उचलायचाच कष्ट पडायचे त्याने खेळणे खुपच लांबची गोष्ट ! गोलंदाजीसाठी सुर्याजी उभा होता. आपल्या खेळीतून त्याने अहमदच्या टिमसमोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान ठेवले होते.

'आप' तो ऐसे ना थे..!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शुक्रवार, 05/01/2018 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
'आप' तो ऐसे ना थे..! सत्ता नावाची गोष्टच अशी असते कि ती भल्याभल्याना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचवत राहते. सत्तेचा उपयोग नीती आणि विवेकाने केला तर तिच्यामुळे माणसातले माणूसपण फुलते. मात्र, हीच सत्ता डोक्यात शिरली कि ती माणसाच्या नैतिक अधःपतनालाही कारणीभूत ठरू शकते. कुणी सत्तेचा वापर जनहितासाठी करतो.. तर कुणी या सत्तेच्या भरवश्यावर आपला स्वार्थ साधून घेतो. सत्ता माणसाला घडवतेही आणि बिघडवतेही. हातात सत्ता असताना नीती नियम आणि तत्तवांचे पालन करून घडलेल्या व्यक्तीची इतिहास नोंद घेतो. तर सत्तेसाठी तत्व सोडून स्वार्थ जपणाऱ्या व्यक्तीला इतिहासही माफ करत नाही, हा सुद्धा एक इतिहास आहे.

निर्दोष घोटाळा !

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 25/12/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
निर्दोष घोटाळा ! देशाच्या अर्थकारणालाच नाही तर राजकारणालाही कलाटणी देण्यास कारणीभूत ठरलेला 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी मंत्री ए. राजा यांच्यासह सर्व १९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. देशात घडलेल्या एकंदर गैरव्यव्हारापैकी 2 जी स्पेक्ट्रम चा गैरव्यवहार सर्वात मोठा समजला जात होता. ‘कॅग’सारख्या संस्थांनी तर यात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याचे अहवाल दिले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश सीबीआय ला दिला.

राजकारणावर बोलू काही!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी सोमवार, 18/12/2017 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
(देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. या निकालाचं पहिलं वाहिलं विश्लेषण..) निकाल लागला !! मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.

मतमोजणीपूर्व धागा: गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुक-२०१७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी मंगळवार, 12/12/2017 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुजरातमध्ये दुसर्‍या टप्प्यात मतदान १४ डिसेंबरला होईल. हिमाचलमध्ये मतदान नोव्हेंबर महिन्यातच पार पडले आहे. दोन्ही राज्यात मतमोजणी १८ डिसेंबरला होईल. एक्झिट पोलचे निकाल १४ (किंवा १५) तारखेला येतील. ते निकाल यायच्या आत नेहमीप्रमाणे मतमोजणीपूर्व धागा प्रकाशित करत आहे. एक्झिट पोलचे निकाल यायच्या आतच हा धागा प्रकाशित करत आहे कारण नाहीतर एक्झिट पोलचे निकाल बघून काही प्रमाणात बायस्ड व्हायची शक्यता आहे. माझ्या मते गुजरातमध्ये भाजप १३० ते १३५ आणि काँग्रेस ४० ते ४५ जागा जिंकेल. तर हिमाचल प्रदेशात भाजप ४० ते ४५ तर काँग्रेस २० ते २५ जागा जिंकेल.

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत.

विसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी मंगळवार, 21/11/2017 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथामिक शिक्षणाच्या दर्जाबाबत यापूवी विविध माध्यमातून बरीच चर्चा झाली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात सुधारणा करण्यासाठी आजवर अनेक नवनवीन धोरणे राबविण्यात आली. निश्चितच काही सकारात्मक बदल यामुळे शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र सततची बदलणारी धोरणे. आणि, उद्देश आणि अंलबजावणी यात झालेली विसंगती, यामुळे सुधारणांपेक्षा संभ्रमाचेचं वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. बदली, बढती, निवृत्ती याबाबत नेहमी बदलणाऱ्या निर्णयांमुळे शिक्षक व्यथित आहे. तर, गुणवत्ता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगामुळे विध्यार्थी गोंधळात..बरं, धोरण ठरविणारं शिक्षण खातं ही ठाम आहे, असं दिसत नाही.