Skip to main content

राजकारण

संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग !

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी रविवार, 19/11/2017 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग ! सध्याचा काळ गुलाबी थंडीचा..या काळात सर्वत्र आल्हादायक आणि शांत वातवरण असते. खरीपाचा हंगाम संपून रब्बीची पेरणी झाल्याने शेतकरी ही या काळात काहीसा 'थंड' असतो. नाही म्हणायला खरिपाचा शेतीमाल विक्री आणि कापसासारखं नगदी पीक घरात येण्याचा काळ असल्याने त्याच्याही हातात दोन पैसे खेळू लागलेले असतात. अर्थात, हे चित्र आता इतिहासजमा झाल्यासारखे असल्याने शेतकऱयांची झोप उडालेली आहे. डोक्यावरील वाढता कर्जाचा डोंगर आणि कवडीमोल भावात विकला जाणारा शेतीमाल पाहून गुलाबी थंडीतही शेतकऱयांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

इंदिरा गांधी जन्मशताब्दी

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 19/11/2017 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जन्मशताब्दी आहे.त्याबद्दल त्यांना अभिवादन. 1 या निमित्ताने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात लिहितो. एक भारतीय म्हणून मला वाटते की त्यांची कारकिर्द भारतासाठी संमीश्र होती. म्हणजे त्यांनी देशासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या आणि काही वाईट गोष्टीही. चांगल्या गोष्टींपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी देशाला एक कणखर नेतृत्व दिले.

एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र

लेखक पुंबा यांनी मंगळवार, 14/11/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह!

पुढील लोकसभेसाठी काँग्रेसकडे असलेले पर्याय..

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 27/09/2017 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारणातला माझा अभ्यास दांडगा नाही. पण सध्या देशातले उलट सुलट मतप्रवाह बघितल्यास निदान काही प्रमाणात तरी मोदी सरकार विरोधात जनमत तयार होत आहे असे दिसते आहे (मुद्दे: नोटाबंदी , GST ई). पण या विरोधी जनमताचा फायदा पुढील लोकसभेत पदरात पाडून घ्यायचा असल्यास काँग्रेसला पंतप्रधानपदासाठी सक्षम उमेदवार द्यावा लागेल (म्हणजे लगेच काँग्रेसला बहूमत मिळेल असे मला म्हणायचे नाही, पण निदान असलेल्या जागा टिकवता येतील वा काही प्रमाणात वाढवता येतील ) राहूल गांधींची लोकप्रियता फारशी नाही.

बाप्टिस्ट आणि बुटलेगर : सरकारी नियमनाची एक थेअरी

लेखक साहना यांनी रविवार, 27/08/2017 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्टिस्ट म्हणजे पाद्री आणि बुटलेगर म्हणजे हातभट्टीवाले. ह्या थिअरीचे लेखन अमेरिकेत दारूबंदी होता तेंव्हा अभ्यासकांनी केले म्हणून हे नाव पण आपल्या देशांत किंवा कामाच्या ठिकाणी हा प्रकार आपणाला सर्रास दिसेल. दारू शरीरास कशी अपायकारक आहे हे पाद्री आधी लोकांच्या मनावर बिंबवतो. वर्तमानपत्रातून लिहितो, राजकारणी मंडळींना सांगतो. जे लोक दारू पित नाहीत त्यांना तो जाहीर रित्या दारूबंदीचा पुरस्कार करायला सांगतो. जे लोक पितात ते सुद्धा जाहीर रित्या ह्याच्या विरोधांत बोलत नाहीत. राजकारणी मंडळी आपली पोळी भाजून घेण्यासाठी जनहितार्थ म्हणून दारूबंदी लावतात. आता दारू पिणारे लोक हातभट्टीवाल्या कडे जातात.

तीन तलाक : सुप्रीम कोर्ट ने नक्की काय म्हटले

लेखक साहना यांनी मंगळवार, 22/08/2017 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय कोर्टे म्हणजे हल्ली विनोद झाली आहेत. काही दिवस मागे हाई कोर्टचा निर्णय सुप्रीम कोर्ट ने रद्द ठरवला कारण जजमेंट मध्ये जजला नक्की काय म्हणायचे आहे हे सुप्रीम कोर्टच्या जज ना समजले नाही. त्या निवाड्यातील एक परिसच्छेद खाली दिलेला आहे . [१] http://imgur.com/a/euxgg तर तीन तलाक च्या निवाड्याचे सुद्धा काही तरी तसेच झाले, नक्की निवाडा काय म्हणतो हेच काही वकिलांना सुद्धा समजले नाही. ३९५ पानाची जी जजमेंट लोक इतक्या लवकर वाचतील तरी कशी ? http://imgur.com/P6sT7QG निवाड्यातील काही मुद्दे असे आहेत १.

महाराष्ट्रातले मजेशीर राजकारण

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 31/07/2017 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
४ मुख्य पक्ष भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे सरकार पडणे अवघड आहे पण १) शिवसेना पुढे विकास पावेल का ? २) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ? ३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?

ताज्या घडामोडी: भाग ८

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 27/07/2017 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join… या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली.

शिवसेना भवितव्य ?

लेखक वाल्मिकी यांनी रविवार, 16/07/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
तसा विजू भाऊंचा धागा असला तरी माझे प्रश्न वेगळे आहेत १) सत्तेत असून पण विरोधकांची भूमिका मतदार लोकांना पटणार नाही ,ह्याचा पुढच्या निवडणुनीत परिणाम होऊ शकतो ? २) भाजप मध्ये पण घोटाळे झाले जसे चिक्की घोटाळा ,व्यापम ,ह्यावेळी शिवसेना गप्प होती का ? ३) विखे पाटील ह्यांना शिवसेनेने मंत्री केले होते तर का बिनसले व नुकत्याच घुमजाव प्रकरणाचं सेना भांडवल का नाही करत ? ४) लोक आता केजरीवाल शी तुलना करत आहेत हे बरे वाटतेय का ? ५) शिवसेने ने ३ वर्षात सत्तेत राहून काय केले ?

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 16/07/2017 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
सिक्कीम भारतात सामील झाला कसा ? (संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन) गेले काही दिवस भारत आणि चीन मधले संबंध परत ताणले गेले आहेत. दोन्ही देशात परत एखाद्या युद्धाला सुरुवात होते कि काय अशी अवस्था निर्माण झाली. आता काय होणार हे तर कालच ठरवेल परंतु ह्यावेळच्या कात्कातीचे कारण ठरला तो सिक्कीम-आपल्या सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेला डोकाला ( ला म्हणजे खिंड)ह्या भागात चीन ने घुसखोरी करत सुरु केलेले रस्त्याचे बांधकाम आणि भारताने घेतलेला आक्षेप.साधारण गेले महिनाभर भारत आणि चीनी सैन्यात ह्यावरून तणाव आहे .