मर्यादा

रौद्र तांडवे अंगे घुसळीत चंद्रमोहीत श्वासा सोडीत युगायुगांचे जीवन पेरीत सांभाळली मर्यादा कोटी कोटी मस्त्य थवे एक दुजांचे जीवन नवे मनुजही घेती थोडे बरवे सांभाळूनी मर्यादा नद्या मुखींचा गाळ गळोरा त्यामधूनी ये विश्व आकारा खाडी बनली मस्त्य धुमारा सांभाळूनी मर्यादा खोल तळाशी भुतल क्रंदन ज्वालांचेही रसमय नर्तन सागर अद्भुत खेळ चिरंतन सांभाळूनी मर्यादा जसा होतसे मानव सक्षम सागर भासू लागे धनसम कसे लुटू दोनच कर मम यंत्रे वाढवू मर्यादा अगडबंबशी जाल रोवीली मस्त्यथव्यांची रास खेचली कोटी तृणागत मृत फ़ेकली उधळण अमर्याद खाडीप्रत जाती मस्त्यथवे धारून अंतरी बीज नवे विषमयी गटारे तेथ मिळे हत्याकांड अमर्

बदलाबदली !

बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

एक गाणे आणि शुभेच्छा

लेखनप्रकार
नमस्कार. सर्व मिपाकराना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या लाडक्या मिपाला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. असो,तर मुळ सांगायचा मुद्दा असा की आत्ता झी टॉकीजवर आयुष्यावर बोलु काही चे पुनःप्रक्षेपण चालु आहे. आणि मगाशीच मी त्यात एक गाणे ऐकले. हे गाणे खरेतर मी काही दिवसापुर्वीच यु नळीवरुन उतरवुन घेतले आहे, व सध्या त्याचे पारायण चालु आहे,अगदी या गाण्याव लिहायचे,त्याचे रसावलोकन का रसग्रहण जे काही म्हणतात ते करायचेच असे ठरवुन मनात लेखही तयार केला होता.

पुण्यातील १५ 'स्वाइन फ्लू' चाचणी केंद्रे

लेखनविषय:
लेखनप्रकार
१.Erandwane:Nalstop Chowk,near padale palace,karve road, pune-4. Contact: Dr. SaritaGanala, Phone:9764000939. २.Anandibai Narhar Gadgil hospital:Near mhatre Bridge,Dattawadi. Contact,Dr.Jyotsna Khole, Phone:9422987953. ३.Balaji Rakhmaji Gaikwad Hospital: Opposite Lingayat Creamatorium,Timber market Ganj Peth. Contact:Dr.Sandhya Bahule. ४.Kalavatibai MavaleHospital: 283,Near Modi Ganpati,Narayan Peth.

रोग प्रतिकारशक्ती

लेखनविषय:
लेखनप्रकार
साथीच्या रोगांमध्ये ज्यांची रोग प्रतिकारशक्ती जास्त असते त्यांना त्याचा कुठेनकुठेतरी फायदा होतच असणार. सध्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांकडे लक्ष दिल्यास त्यात ऍन्टी-ऑक्सिडंट्स, भरपूर प्रथिने असलेले आहार, व्हायटामिन्स (प्रामुख्याने सी), व स्वच्छतेची काळजी (आंतर्बाह्य सुरक्षा) हेच उपाय सुचविलेले दिसत आहेत. प्लेटलेटस काऊंट हा एक ह्या चर्चेशी जोडला जाणारा आणखी एक विषय. लढाई करायची तर सैन्याची जादा कुमक असणे महत्वाचे. सध्या आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने (बहीण, मामेभाऊ) हे सगळे करत आहोत.

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

प्रासंगिक

प्रासंगिक येथ ’पौरुषास अटक’, सांगून गेले जे तिथे । ’कोरडे’ पाहून जगणे, क्रंदू लागती ते तिथे ॥ सुहृदांनो काय सांगू, भावना आमच्या इथे । तेव्हाही होतो ’थक्क’, ’चकीत’ झालो या इथे ॥ १ ॥ जे खुशीने विहरती वा, सुखे संचरती तिथे । तेच वैभव मातृभूचे वाढवू शकती तिथे ॥ खंत खुलवत नांदणे, तिथले बरे ना येथले । नांदा खुशीने तेथ वा, सत्वर निघुनी या इथे ॥ २ ॥ वाहिले लाटेवरी अन्‌ पोहोचले, असती जिथे । ओढ घेऊन जे घराची, पाहती स्वप्ने तिथे ॥ त्यांस सल्ला हाच की, सावरा वल्ही तिथे । सत्वरे ती वल्हवा अन्‌, लवकरी पोहोचा इथे ॥ ३ ॥ भावना तुमच्या समजल्या, आम्हीही व्याकुळ इथे । काय राहणे ते विदेशी, त
Subscribe to राहणी