मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास

भीतीच्या भिंती ६: ‘दरी’

आतिवास ·
लेखनप्रकार
भाग ,, , , (विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.) भारतासारख्या बहुभाषिक देशात जगण्याचा एक फायदा असा की, कुठल्याही नव्या भाषेत रूळायला आपल्याला

बस मी आणि बाळ

शब्दानुज ·
लेखनविषय:
बसमध्ये धक्के खात उभा होतो आसनस्थ होण्याचा मार्ग शोधत होतो आसनस्थ झाल्यावर खिडकी शोधु लागलो प्रवासात या अपेक्ष्ांचे सामानही बाळगलो सगळ मिळवुनही धक्के लागतच होते सवयीप्रमाणे डोळे सर्वत्र फिरत होते समोरच्या सिटवर बाळाला हसताना पाहिले पण हसण्याचे कारण नाही गवसले अपेक्ष्ांचे सामान त्याच्यासोबत दिसले नाही म्हणुनच हसण्याला कारणही लागले नाही पुढच्या प्रवासातही धक्के बरेच बसले पण गालावरचे हसु तसेच राहिले.

अंगोर वाट, कंबोडिया

श्रीनिवास टिळक ·
लेखनविषय:
आजच (गुरवार २६ फेब्रुवारी) मी सिएम रीप (अंगोर वाट, कंबोडिया ) येथे पाच दिवसासाठी पर्यटक म्हणून आलो आहे. सुदैवाने मागील आठवड्यातच पुण्याला श्री उदयन इंदुलकर यांचे कंबोडियातील मंदिरे या विषयावर एक व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यात बरीच माहिती मिळाली. मीपावर या विषयावर अधिक माहिती उपलब्ध असल्यास सूज्ञ सभासदांनी त्याबद्दलचे दुवे (links) दयावे हि विनंती.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4 जम्मू श्रीनगर बस प्रवास

1979-80 सुमारास हा प्रदीर्घ प्रवास माझ्याप्रमाणे अनेकांनी अनेकदा केला असेल. पण अरूणच्या शब्दांकनाची हातोटी विलक्षण आहे. त्याचा मासला अनुभवा... ‘सार्वजनिक संडास ही राष्ट्राच्या संकृतीची कसोटी आहे!.’ ... हे पु लंचं चपखल वाक्य नेमकं आठवत उरातील सल पोटाकडे कळ बनून सरकते... लाईन लांब व्हायच्या आत तिथे टॅक्स भरून मोकळा झालो!... तिथला ‘एकांत-वास’ सुद्धा...

The most dangerous eight seconds of the sports !

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी थोडा चक्रावलोच होतो. यावेळी जानेवारीत होणार्‍या आमच्या वार्षिक सेल्स मिटींग्जमध्ये एक संध्याकाळ 'नॅशनल वेस्टर्न स्टॉक शो' साठी राखीव ठेवण्यात आलेली होती. 'वेस्टर्न' हा शब्द ऐकला की त्याबरोबर आम्हाला एकतर 'कल्चर' आठवते नाहीतर 'म्युझिक'. त्यात मी जेव्हा अमेलियाला (एक अमेरिकन सहकारी) जेव्हा या तथाकथीत स्टॉकशो बद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली... इट्स रोडीओज विशाल.... ! दुर्दैवाने (हा दोष तिच्या अमेरिकन उच्चाराचाही आहे म्हणा) आम्ही ते रेडीओज असे ऐकले आणि मनातली 'वेस्टर्न म्युझिक' ही संकल्पना अजुन पक्की झाली. Wow, exciting. Is there any concert or what?

भीतीच्या भिंती:४: खिडकीतून पाहताना..

आतिवास ·
लेखनप्रकार
भाग १, , (नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. स्थळ - काळ हेतूतः मोघम ठेवले आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.) कोणत्याही ठिकाणी गेलं की तिथल्या सर्वसामान्य माणसांशी बोलायचं ही एक नेहमीची सवय.

भीतीच्या भिंती:३ इस्लामिक रिपब्लिक

आतिवास ·
लेखनप्रकार
भाग (नोंद: स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चा, विकिपीडिया आणि तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे.) मी काबूलमध्ये शनिवारी पोचले होते. रविवार निवांत असायला हवा आजवरच्या अनुभवानुसार. पण नाही! रविवार हा कामाचा दिवस. ‘साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार’ ही इस्लामिक राजवटीची प्रमुख खूण. ज्यांना आठवड्यात पाच दिवस काम असतं त्यांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टीचे.

“पडणे” एक कला

दशानन ·
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

क्लास

वेल्लाभट ·
लेखनप्रकार
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे. मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो.