क्लास
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे.
मुंबई रेलवे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गांवर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे. 'जवळचं' म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरंच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोड्यासारखं उभं रहाण्यावाचून पर्याय नसतो. घोडाही नीट सरळ उभा रहात असेल पण गर्दीच्या वेळी लोकल मधे सरळ उभं रहाणंही दुरापास्त असतं.
या लोकल मधे दोन 'क्लास' असतात. एक प्रथम दर्जा म्हणजे फर्स्ट क्लास तर दुसरा द्वितीय दर्जा म्हणजे सेकंड क्लास. त्यापैकी फर्स्ट क्लास मधला माझा एक अनुभव आहे. यातील लोकं फर्स्ट क्लास दिसण्यापुरतीच मर्यादित असतात. म्हणजे असं की एकदा नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लासमधून प्रवास होत होता. गर्दी बरीच होती, आणि बसायला सोडाच, उभं रहायलाही जागा नव्हती. माणसं 'सो मच ऑफ क्राउड' 'डिसगस्टिंग' वगैरे म्हणंत चुकचुकत होती. दोन सीटच्या मधील जागेत जाऊन मी उभा राहिलो होतो. एक व्यक्ती पुढील स्टेशन वर उतरण्यासाठी उठला. तेंव्हा जागा रिकामी झाली असं बघून मी बसण्यासाठी सरसावलो. चौथी वाटणारी ती जागा खरं तर तिस-या माणसाची होती. खिडकीजवळची व्यक्ती आणि तिच्या बाजूची व्यक्ती पाय इतके पसरवून बसल्या होत्या की तिसरी जागा केवळ अर्धा फूट उरली होती. मी बसणार हे ताडताच दुस-या बसलेल्या व्यक्तीने पाय अजूनच जरा पसरवले. एकंदरितच माजोरडेपणाचा आव बघून मला तिथे बसणं प्रचंड अपमानास्पद वाटायला लागलं आणि मी तितक्याच शांतपणे पुन्हा उभा राहिलो. बाजूला उभे असलेले एक वृद्ध गृहस्थ मात्र नाईलाजाने त्या चार पाच इंचात स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे पाय दुखत असावेत बहुदा. या ठिकाणी तोंड उघडायची मला इच्छाही न होता त्या आणि त्याच्यासारख्या माणसांची कीव वाटू लागली.
याच उलट एक दिवस सेकंड क्लास मधून प्रवास करत असताना आलेला अनुभव. गर्दी साधारण तितकीच होती. वेळही तीच होती. मी असाच दोन सीट च्या मधे उभा होतो आणि जागा मिळण्याच्या आशेवर होतो. गाडी मुंबई सीएसटी वरून कल्याणला जात होती आणि विक्रोळीच्या आसपास होती. मला ठाण्याला उतरायचं होतं. असं असताना खिडकीजवळची व्यक्ती माझ्याकडे बघून डोळ्याने मला खुणावू लागली. 'काय?' असं विचारलं असता म्हणाली 'बसताय?'. मी म्हटलं, 'नाही ठीक आहे, तुम्ही कुठे उतरणार?' 'मी कल्याणला. पण तुम्ही बसा. मी अत्तापर्यंत बसलोयच की.' हो नाही करताना शेवट तो उठूनच उभा राहिल्यावर मी बसलो. त्याचा माझा काहीही संबंध नव्हता, की मी त्याला सीट मागितली नव्हती. पण तरीही त्याने स्वतःहून देऊ केली.
वर नमूद केलेल्या दोनही अनुभवांसारखे अनुभव अनेकदा आलेले आहेत, त्या त्या 'क्लास' मधे. पण विचार हा करावासा वाटतो, की सेकंड क्लास मधे दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लास मधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? हा महिमा क्लास चा असतो, की आणि कशाचा? क्लासचा परिणाम लोकांच्या वृत्तीवर होतो, की लोकांच्या वृत्तीचा परिणाम क्लास मधे दिसतो? लहान मुलं जशी सगळी खेळणी मीच खेळणार असा हट्ट करून सख्या भावंडालाही देत नाहीत, तो स्वभाव मोठेपणीही कायम रहातो असं मानायचं का?
काहीही असलं तरी अशा अनेक अनुभवांतून हे कळत गेलं, की फर्स्ट क्लास मधे उभं रहावं लागलं, तर बसायला मिळण्याची आशा करू नये, आणि सेकंड क्लास मधे बसायला मिळालं तर मात्र समजून उमजून दुस-या उभ्या व्यक्तीला जागा दिली पाहिजे. अर्थात सरतेशेवटी फर्स्ट क्लासशी फारकत घेण्यातच शहाणपण आहे असा निर्णय झाला. 'डिसगस्टिंग' अहंकाराच्या सुटसुटीतपणापेक्षा गर्दीची अप्रिय जवळीक बरी. त्यातही अधून मधून मिळणारी सौजन्याची झलक जो आनंद देते, तो फर्स्ट क्लासमधे होणा-या अपमान आणि मनस्तापापेक्षा कैक पटीने बरा वाटतो.
वाचने
7353
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
सहमत आणि असहमत.....
माज करायच्याबाबतीत 1st क्लास
CLASS आपल्या डोक्यात असतो
In reply to CLASS आपल्या डोक्यात असतो by देशपांडे विनायक
इतकं सरळ नाहीये ते
@ सेकंड क्लास मधे दिसलेलं, हे
कळस...
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
चार नाही तीन तरी?
In reply to चार नाही तीन तरी? by वेल्लाभट
तीन च्या जागेवर तीन तर
In reply to तीन च्या जागेवर तीन तर by काळा पहाड
मराठी नसेल तर ठार मारायलाही
तीनच्या जागी चार
विरार लोकलचा अलिखित नियम जो
In reply to विरार लोकलचा अलिखित नियम जो by शिद
सेम रुल फॉर बदलापूर CST..
In reply to सेम रुल फॉर बदलापूर CST.. by सूड
सहमत
In reply to विरार लोकलचा अलिखित नियम जो by शिद
डहाणु लोकलचा अनुभव मस्त कारण
In reply to डहाणु लोकलचा अनुभव मस्त कारण by NiluMP
स्तुत्य
क्लास लिहिलय,
ल्लेखन आवडले. लोकलचा फारसा
विरार लोकलचा अलिखित नियम जो
In reply to विरार लोकलचा अलिखित नियम जो by विजुभाऊ
बोरिवली-कांदिवली-मालाडवल्यांची दादागिरी.
In reply to बोरिवली-कांदिवली-मालाडवल्यांची दादागिरी. by प्रभाकर पेठकर
याचं खरं कारण भैया लोकांचं
In reply to याचं खरं कारण भैया लोकांचं by काळा पहाड
भजनी मंडळे मराठी लोकांचीच
In reply to भजनी मंडळे मराठी लोकांचीच by टवाळ कार्टा
सहमत आणि एवढा माज करतात की
In reply to सहमत आणि एवढा माज करतात की by शिद
भजन कसलं? बेंबीच्या देठापासून
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणIn reply to भजनी मंडळे मराठी लोकांचीच by टवाळ कार्टा
७० चे दशक.
प्लॅटफॉर्म कुठ्ल्या साईडला येतो त्याचे लॉजीक काय कळत नाय..
In reply to प्लॅटफॉर्म कुठ्ल्या साईडला येतो त्याचे लॉजीक काय कळत नाय.. by बबन ताम्बे
विचारायचं, त्यात काय?
In reply to विचारायचं, त्यात काय? by प्रभाकर पेठकर
हो, ते बरोबर आहे. पण मला लॉजीक समजून घ्यायचेय.
In reply to हो, ते बरोबर आहे. पण मला लॉजीक समजून घ्यायचेय. by बबन ताम्बे
लॉजिक बिजीक काय नाय हो! रोजचं
वेल्लाभट भाऊ,
In reply to वेल्लाभट भाऊ, by बोका-ए-आझम
मध्य रेल्वेचे प्रवासी
मोकळ्या गाड्या...
In reply to मोकळ्या गाड्या... by प्रभाकर पेठकर
हो ना !
In reply to हो ना ! by धर्मराजमुटके
मुंबईतही मोकळ्या गाड्या असतात
In reply to मुंबईतही मोकळ्या गाड्या असतात by मराठे
सहमत
मुंबई लोकल प्रवासाचे २-३ वर्ष
श्री पाडगावकर सरांची माफी