नितीमत्ता हा विषय तसा बराच चर्चला गेलेला असला तरी काही अनुभव आले की पुन्हा जाग्रुत होतोच. माझेही आज तसेच झाले.
आटपाट नगरात एक अधिकारी रुजु झाले. यापुर्वीचा त्यांचा अनुभव व तेथील लोकांच्या माहितीनुसार साहेब अतिशय कडक. शिक्षण आणि आरोग्य हे त्यांचे अति जिव्हा़ळ्याचे विषय आहेत हे त्यांनी आल्या आल्या सांगून टाकले. कारण काय तर तिर्थरुप शिक्षक. मंडळी धास्तावली. मागील अनुभव पाहता अशी सुरुवात ही धोक्याची घंटा. आल्या आल्या साहेबांनी भराभर भेटीचा धडाका सुरु केला. प्राथमिक शब्दाला फारच महत्व मग ती शाळा असो की आरोग्य केंद्र. दोन महिन्यात जवळ जवळ सर्व तालुका पिंजला गेला.