मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हाॅकिंगे जे प्रेडिक्टले

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हाॅकिंगे जे प्रेडिक्टले ते म्यां चक्षुर्वै पाहिले कृष्णविवरासी भेदिले आरपार म्यां आजची कृष्णविवराचा चव्हाटा तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा चारी मितींचा उफराटा कोलाहल माजला कार्यकारणाची तर्कटे उलटी पालटी पडती येथे आधी कळस मग पायथे हाची लोच्या येथला कवाडे विभिन्न विश्वांची ठोठाविता उघडती साची अनवट रूपे तयांची जाणे केवळ हाॅकिंग

वाचने 2629 वाचनखूण प्रतिक्रिया 8

कंजूस Fri, 04/06/2018 - 22:34
अनादी अनंत काळाची महती सांगूनी तो गेला साची कृषणविवरे ती लहानमोठी पाहिली आम्ही त्याच्याच डोळी मॅक्सवेल आणि आइनस्टाइन करिती उकल विश्वाची प्रचिती घेणे असाध्य ज्याची मिती वर्तवे तो हॅाकिंग

नाखु Sun, 04/08/2018 - 13:19
सार्थ केले यात्री कविता एकदम खत्री!!! काथ्याकूट कृष्ण विवरापासून दूर असलेला नाखु पत्री