जनुक जिन्याची सर्पिल वळणे
अणुगर्भातिल अदम्य लवथव
सूक्ष्माच्या प्रत्येक विभ्रमीे
कल्पिताहुनी अद्भुत वास्तव
अथांगासही क्षुद्र ठरविते
असीम व्याप्ती विश्वाची
प्रकाशवर्षे मोजुनी थकती
स्थलकालाच्या थिट्या मिती
शून्यस्पर्शी अन् अपार- व्यापक
ताणे-बाणे गहनाचे
तरल तलम सूक्ष्माचे तंतू
विणती वस्त्र विराटाचे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10374
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
मस्तच!
सुंदर रचना.
सुंदर !
छान छान
प्रतिसाद
सहजसुंदर मांडणी आणि खोल खोल
खिलजी,
In reply to सहजसुंदर मांडणी आणि खोल खोल by खिलजि
शब्दा योजना आवडली.
आवडली...
यशोधरा, मुवि
खूपच छान
धन्यवाद
तरल तलम सूक्ष्माचे तंतू