तर आडवी आली ती जात.
म्हणजे कसं, तो एक राजा नाही का जो जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरी असं सगळ्यांना वाटत असतं? तस्साच attitude . पण इथे झाला घात.
सोयी-सुविधांनी सज्ज असं समुद्रा - काठचं राज्य. त्यात गाई गुरं , कुत्रे मांजरं , असलेलं , हसतं खेळतं घर. अश्या घरावर स्वारी केली आंतरजातीय विवाहाने.
मग राजे लढले.
लढाईच्या गोष्टी तेवढ्याच मधुर असतात हं , बाकी सगळं कडू.
म्हणजे कल्पना करा , तुम्ही ज्या मुलांना कष्टाने वाढवलं , आपल्या पायावर उभं राहायला शिकवलं , ती मुलं चक्क त्या ज्ञानाचा वापर करू लागली ? काय ते संकट. निर्णय काय घेतात, तार्किक उत्तरं काय देतात .... कैच्याकै !!!
मग करावं काय ते कुणाला कळेना. मग उगीचच 'समाजमान्य' म्हणून घरी सुद्धा मान्य असा नियम झाला. " निर्णय तू घेतलाच आहेस, पण हे लग्न झालं तर या घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद ".
वाटलं यार एकचदा "Alohmora " काम करो. wand हवीय मला. पण नाही. ह्या वेळी स्वतः विश्वकर्मा सुद्धा तिथे माझ्यासाठी उघडणारं दार बनवू शकणार नाही हे मला माहित होतं .
यात काही दिवस, नव्हे काही वर्षं गेलीत. हि गोष्ट त्या वर्षातल्या इमोशनल baggage ची. वरवरच्या हसण्याची. रुतून बसलेल्या संघर्षाची. मऊ मऊ वाळूची. वाईट्ट हरण्याची.खारट वाऱ्याची. सोडलेल्या किनाऱ्याची. आणि किनारा आणि समुद्र दोन्ही मनापासून आवडणाऱ्या होडीची.
वाचने
2265
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलंय
छान.
समकालीन पिढीतील अनंत