लेखनप्रकार
नमस्कार, मी आरती, आता कुणाची विचारू नका :)
हा माझा लिहिण्याचा पहिला प्रयत्न. आमच्याकडे तसे कुणी लिहीत नाही, फक्त बोलतात आणि ते हि खूप जोरात. तर आज खास लिहिण्याचे कारण असे कि ऑफिस मध्ये काही फारसे काम नाही. ( ऑफिस मध्ये कुणालाही मराठी येत नाही ह्याचा हा फायदा) आता असा अलभ्य लाभ वर्षातू कधी तरीच होतो आणि जर हे दान पदरात नाही पाडून घेतलं तर आयुष्यात काय मिळवलं? ( आता साडी आणि पदर नसला तरी भाव महत्वाचा). तर मी आज माझ्या कुकिंग एक्सपिरिमेंट बद्दल लिहिणार आहे. सध्या युट्युब वर कूकिंग चे चॅनेल खूप जोरात चालू आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा चॅनेल आणि आवडो ना आवडो सुरुवातीलाच माझा चॅनेल लाईक करा, शेर करा आणि बेल ची घंटी प्रेस करा. एवढे झाले कि माझी डोक्यात धोख्याच्या घंटा वाजायला लागतात आणि मी लगेच चॅनेल चेंज करते. आता हि पाककला सादर करायचा माझ हक्काच एकमेव स्टेज म्हणजे घर आणि माझे इवले इवले गिनिपिग. म्हणजे नवरा आणि मुलं. यातला कुणी च अंगानं इवलं इवलं नाही फक्त माझी कला पाहून त्यांची तोंडं इवली इवली होतात . तर ह्या वर्षी (नेहमीप्रमाणे) गणेश चतुर्थी ला उकडीचे मोदक करायचे ठरवले. गणपती बसले सोमवारी. बाहेर राहणाऱ्या माणसांना माहिती असेल कि असे सण वीक डेज आले कि कशी ओढाताण होते म्हणून मी सगळ्यांच्या (माझ्या) सोईने शुक्रवारी संध्याकाळी करू असे ठरवले. आदल्या दिवशी चार वेगवेगळ्या बायकांच्या रेसिपी बघून ठेवल्या. गंमत म्हणजे हे,असे मला दर वर्षी करावे लागते. मागच्या वर्षी काय केले होते ते काही केल्या आठवत नाही. बरं कसं केलं हे आठवत नाही हे ठीक आहे पण निदान कुणाची रेसिपि बघून केलं होतं हे तरी आठवायला पाहिजे कि नाही? पण नाही, माझी पाटी पार कोरी झालेली असते. तर लागणारे सामान आधीच आणून ठेवले होते. तरी बरे ऑस्ट्रेलिया मध्ये आता ९० टक्के सांगळे सामान सहज मिळते. फक्त ऑफिस मधून येताना रस्त्यावर ताजी भाजी मिळत नाही, ती हि काही ठिकाणी आता मिळते. ( काही ठिकाणी कुकर च्या शिट्ट्या ऐकायला येतात. आणि शुक्रवारी हमखास खमंग घमघमाट येतो.) शेवटी मनाची आणि ओघानेच खाणार्याच्या मनाची तयारी आहे असे मानून पाणी उकळायला ठेवलं. आणि त्याच बरोबर स्ट्रॉंग कॉफी बनवली. सगळे सोपस्कार व्हिडीओ प्रमाणे पार पडून पीठ मळायला घेतले. दहा मिनिटांच्या प्रयत्नानांतर हात दुखायला लागला म्हणून वाटलं झाले असेल आता तयार. पण हाय रेरे देवा, आता अधर्वट टाकता ही येईना. मग मनाचा हिय्या करून आणखी थोडं पाणी गरम केलं आणि मला हवे तसे छान पीठ मळून घेतले. आणि काय आश्चर्य मोदक अगदी सहज आणि सुबक जमायला लागले. मग काय सगळेच जण आपापली कला दाखवायला पुढे सरसावले. बघता बघता २१ मोदकांचे टार्गेट पूर्ण झाले आणि कन्या रत्नाला स्फुरण चढलं. तिला उरलेल्या पिठाचे डंपलिंग करायचे होते. तिला ढकलून मातुःश्री पुढे सरसावल्या. ( हा आमच्या घरातला ३६ चा आकडा बरका) मी त्यांची जुंपायच्या आत चतुराई ने लेकीचे लक्ष दुसरीकडे गुंतवून मातुश्री ना खुश केले. येवढं होत नाही तर मग क्लयमॅक्स वर असते तशी एन्टरी मारत नवरोबा म्हणतो हे काय एवढेच मोदक? हे कुणाला पुरणार? पक्का देशासाठी कारभार. पण मी हि अशा कॉमेंट्स ना भीक ना घालता आहे तो पसारा उरकला आणि आरतीची तयारी सुरु केली. ( उगाच तुमच्या मनात टांगती तलवार राहू नये म्हणून सांगते कि तेंव्हाचे मोदक अजूनही लोळत आहेत.)
http://mrinmay.simplesite.com
मिसळपाव
रांग
हा!हा!हा!हा!
भारी लिहिलंय.
मस्त!!!
In reply to मस्त!!! by किल्लेदार
हेच बोलतो
In reply to मस्त!!! by किल्लेदार
महेर चा वसा
मस्तच!
छान.
छान आहे. आवडलं लेखन.
बापरे..