Skip to main content

मुक्तक

काही शब्द

लेखक Bhakti यांनी सोमवार, 11/01/2021 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
काही शब्द असतात मुके उभे उन्हात जणु पोरके मुले भूतकाळात ना भविष्यात डोकावत सहज वर्तमानाच्या क्षणांत घुटमळत वाटते समोरच्या मनी कराव घर रेंगाळावे उशीशी कोणाच्या रात्रभर पण होतात ह्रदयी कप्प्यात बंद बंद हसतात डायरीच्या पानांतून मंद मंद -भक्ती ११/०१/२०१७

इकडचं तिकडचं

लेखक मालविका यांनी मंगळवार, 05/01/2021 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीची सुरवातीची वर्ष मुंबई पुण्यात घालवली. मग काही वर्ष परदेशात काढली. आता इकडे गावी येऊन सेटल झालेय. पण कधी ना कधी काही घटना घडतात आणि जुन्या आठवणी येतात. आठवणी म्हणण्यापेक्षा ते ठिकाण आठवतं. आणि साहजिकच इकडचं नि तिकडंच असं होत राहतं. आता आजचच घ्या ना. इकडे दोन दिवसापासून मळभ आलय. प्रकाश दिसतो म्हणून सूर्य उगवला म्हणायचा इतकं मळभ येतंय. सकाळी सायकल चालवायला गेले तेव्हा मळभ तर होतच पण हवा पण एकदम कोरडी होती. जरा देखील वारा नाही कि काही नाही. जणू सगळ्या वातावरणाला एक प्रकारची मरगळ आलेय. मला अगदी पटकन परदेशाची आठवण आली. तिकडे ढगाळ वातावरण हे कायमचंच. सनी वेदर म्हणजे लॉटरी.

यमकं बिमकं, कविता बिविता..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 30/12/2020 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास , "यमकंबिमकं, कविता बिविता ऐकून होतो नुसता जाच माझ्यासाठी कधीतरी तुझीमाझी गोष्ट वाच." मला खुदकन् आलं हसू, आपली गोष्ट कशी वाचू? आगा नाही पिछा नाही, गोष्टीला त्या नावही नाही, अशी गोष्ट सांगतात का? आणि कुणी ऐकतात का? समजा जर सांगितली तर तुझं नाव घालू कसं? नावच जर बदललं तर मी पुढं बोलू कसं? तो तिला कुठं भेटला, सांगताना पापणी थरथरेल. कसा हात मागितला?
काव्यरस

दे दे लिंक दे !!

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 21/12/2020 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी काही माहिती सांगायला लागलं कि "लिंक दे" कुणी काही मत मांडले रे मांडले कि "लिंक दे" एखादा विचार मांडायला लागलं, कि (त्याच्या पुष्ट्यर्थ) "लिंक दे" ह्यात ज्ञानोपासनेचा भाग असेलही बापडा !! पण मला पुष्कळ वेळा ऐकू येते ते असे "तुला काही नवीन मुद्दा सापडलाय का , त्याला पुष्ट्यर्थ काही लिंक नसेल तर तू , तुझं बोलणं आणि तुझा मुद्दा व्यर्थ ..." किंवा मग "तु कुणाला काही उद्धृत करू पाहतोयस का ? मग तुझी वायफळ बडबड बंद कर आणि ज्याने कुणी ते मुळात काय म्हटलं आहे ते साल्या तू कुठून वाचलं ते आधी सांग. मी माझं स्वतंत्र बघून माझं मत मी बनवीन.

गावाकडच्या गोष्टी

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 19/12/2020 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
विष्णू सहस्त्रनाम गावात,ब्राम्हणांची वीस बावीस घरे.देशमुख गल्लीतली देशमुखांची पंधरासोळा;पाटील गल्लीत जोशांची चारपाच,जहागिरदार ,कुलकर्णी,देशपांडे, पुराणिक यांची एकेक.वर्षभरातील  नेहमीचे कुलाचार,सणवार प्रत्येक घरी, आपापल्या परीने होत असत.उन्हाळ्यात ,विष्णू सहस्त्र नाम सप्ताहाचे निमित्ताने मात्र सर्वजण एकत्र येत. या विश्वाची उत्पत्ती,स्थिती,आणि विलय,ज्याच्या लीलेने होतो त्या परमेश्वर श्रीविष्णूला,वेदकाळा पासून ,पुराण काळापर्यंत ,ज्या ज्या नावांनी संबोधिले गेले त्या एक हजार नावांचे संकलन असलेले हे संस्कृत श्लोक भिष्माने युधिष्ठीराला सांगितले.महाभारतातील 'अनुशासन पर्वात 'याचा उल्लेख आहे.यात

तोत्तोचान –एका चिमुकलीचे भावविश्व

लेखक Bhakti यांनी बुधवार, 16/12/2020 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षरशः कोरोना काळात या पुस्तकाने एक सुंदर अशी आत्मशांती दिलीये.लहान मुलांचे निरागस भावविश्व सर्वांनाच आवडते.त्यांच्या असंबंध बडबडीने आपला वेळ फुलपाखारांसारखा रंगेबेरंगी होतो. अशा चिमुकल्यांना मात्र शाळा नावाचे दुसरे घर असेच मोकळे पाहिजे तर ती खऱ्या अर्थाने रुजतील.

मन तुझे-माझे

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 15/12/2020 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याशी बोलता मन माझे जणु बेभान होते तुझ्याचं विचारात मन माझे विरते तु जवळ नसता मन तुझ्यासाठीच झुरते विरहात ही मी तुझ्यातच रमते तु कितीही दुर असावा तरी तुझ्या मनाला कधीही माझा विसर न व्हावा कितीही मैलांचे अंतर असले तरी मनाने तु सदैव माझ्या पास असावे तनाने दुर असलो तरी मनाने एकरूप व्हावे! -Dipti Bhagat 4 March, 2019

गुर्हाळ

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 05/12/2020 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
गुर्हाळ...     पन्नास,पंचावन्न वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. गावी पिंपळाचा मळा नावाचे शेतआहे.तिथली जमीन कसदार. विहीरीला मुबलक पाणी असे.ते उपसण्यासाठी किर्लोस्कर इंजीन होते.पाण्यावर ऊस जोमाने वाढे. डिसेंबर मधे उस पूर्ण गोडीला येई.तेव्हा मराठवाड्यात एकही साखर कारखाना नव्हता.होते फक्त पश्चिम महाराष्ट्रात. त्यामूळे उस गाळून गुळ तयार करणे हा एकच पर्याय होता.एक छोटा उद्योगच. गुर्हाळ. तो दरवर्षीचाच असल्याने,मळ्यात एक चुलाण व धूर जाण्यासाठी धुराडे बांधून ठेवले होते.ते पाला पाचोळा घालून बंद केलेले असे.गुर्हाळ सुरू व्हायच्या आधी ते मोकळे करून,सारवून स्वच्छ केले जाई.

नीरव

लेखक सरीवर सरी यांनी शनिवार, 21/11/2020 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य काजव्यांच रान अंधाराला लावला टित सरू नये उरू नये गाणं मर्मभेदी घुसलाय मान तरंगावर पहूडली कात अशी ही नीरव कवनं
काव्यरस